तर मी हिंदू धर्माचा त्याग करेन..! मायावती यांचा इशारा

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: December 11, 2017 04:32 AM2017-12-11T04:32:11+5:302017-12-11T04:32:35+5:30

भाजपा व आरएसएस देशात हिंदुत्ववादी व जातीयवादी अजेंडा राबवित आहेत. देशात दलित, आदिवासी, मुस्लीम व मागासवर्गीयांवर अन्याय अत्याचार वाढले असून असाच अन्याय सुरु राहिला तर मी लाखो समर्थकांसह हिंदू धर्माचा त्याग करेन, असा इशारा उत्तर प्रदेशच्या माजी मुख्यमंत्री मायावती यांनी रविवारी नागपुरात दिला.

 So I will give up the Hindu religion ..! Mayawati's signal | तर मी हिंदू धर्माचा त्याग करेन..! मायावती यांचा इशारा

तर मी हिंदू धर्माचा त्याग करेन..! मायावती यांचा इशारा

Next

लोकमत न्यूज नेटवर्क
नागपूर : भाजपा व आरएसएस देशात हिंदुत्ववादी व जातीयवादी अजेंडा राबवित आहेत. देशात दलित, आदिवासी, मुस्लीम व मागासवर्गीयांवर अन्याय अत्याचार वाढले असून असाच अन्याय सुरु राहिला तर मी लाखो समर्थकांसह हिंदू धर्माचा त्याग करेन, असा इशारा उत्तर प्रदेशच्या माजी मुख्यमंत्री मायावती यांनी रविवारी नागपुरात दिला.
बहुजन समाज पक्षाच्या कार्यकर्ता मेळाव्यात त्या बोलत होत्या. यावेळी कार्यकर्त्यांच्यावतीने मायावती यांना सोन्याचा मुकुट, चांदीचा हत्ती व तलवार भेट देण्यात आली. यावेळी पक्षाचे राष्ट्रीय उपाध्यक्ष आनंद कुमार, राष्ट्रीय महासचिव सतीशचंद्र मिश्रा, प्रदेश प्रभारी खा. वीरसिंग, प्रदेशाध्यक्ष विलास गरुड आदी उपस्थित होते.
मायावती म्हणाल्या, डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांनी धर्मांतराची घोषणा केली होती. त्यावेळी त्यांनी हिंदू धर्मात सुधारणा घडवून आणण्यासाठी एक संधी दिली होती. तशीच संधी आपण सुद्धा देत आहोत. यानंतरही दलित समाजाबद्दल आणि त्यांच्या नेत्यांबद्दल अशीच मानसिकता कायम राहिली तर आपण योग्य वेळी लाखो समर्थकांह बौद्ध धम्माची दीक्षा घेणार, असेही त्यांनी यावेळी जाहीर केले.
भाजप सरकार हे दलितांच्या द्वेषाचे राजकारण करत आहे. त्यामुळेच मी राज्यसभेचा राजीनामा दिला. राजीनामा दिल्यानंतर मी दलितांसोबतच, आदिवासी, मुस्लिम आणि इतर मागासवर्गीय लोकांच्या उत्थानासाठी देशव्यापी दौरे करून काम सुरू केले आहे.

राममंदिरापासून बहुजनांनी दूर राहावे

राममंदिराचा मुद्दा पुन्हा तापवला जात आहे. राममंदिर झाले अथवा नाही झाले तरी दलित-बहुजनांचा काही फायदा-तोटा नाही. त्यामुळे बहुजनांनी यापासून दूर राहावे. तसेच डॉ. बाबासाहेब आंबेडकरांच्या विचारांतून आपली सत्ता हस्तगत करावी, असे आवाहन मायावती यांनी केले.

Web Title:  So I will give up the Hindu religion ..! Mayawati's signal

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.