स्मिता देशपांडे ग्राहक पंचायतच्या विदर्भ प्रांत अध्यक्ष

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: August 30, 2018 12:17 AM2018-08-30T00:17:07+5:302018-08-30T00:18:13+5:30

अखिल भारतीय ग्राहक पंचायतच्या विदर्भ प्रांत अध्यक्षपदी अ‍ॅड. स्मिता देशपांडे यांची निवड तीन वर्षांसाठी करण्यात आली. ६ आणि ७ आॅक्टोबरला होणाऱ्या राष्ट्रीय कार्यकारी परिषदेच्या तयारीच्या पार्श्वभूमीवर झालेल्या सभेत स्मिता देशपांडे यांची घोषणा करण्यात आली. ग्राहक पंचायतच्या इतिहासात महिला अध्यक्ष म्हणून त्यांची पहिल्यांदा निवड झाली आहे.

Smita Deshpande Consumer Panchayat Vidhwa Pradesh President | स्मिता देशपांडे ग्राहक पंचायतच्या विदर्भ प्रांत अध्यक्ष

स्मिता देशपांडे ग्राहक पंचायतच्या विदर्भ प्रांत अध्यक्ष

googlenewsNext
ठळक मुद्देग्राहक पंचायतच्या इतिहासात पहिल्याच महिला अध्यक्ष

लोकमत न्यूज नेटवर्क
नागपूर : अखिल भारतीय ग्राहक पंचायतच्या विदर्भ प्रांत अध्यक्षपदी अ‍ॅड. स्मिता देशपांडे यांची निवड तीन वर्षांसाठी करण्यात आली. ६ आणि ७ आॅक्टोबरला होणाऱ्या राष्ट्रीय कार्यकारी परिषदेच्या तयारीच्या पार्श्वभूमीवर झालेल्या सभेत स्मिता देशपांडे यांची घोषणा करण्यात आली. ग्राहक पंचायतच्या इतिहासात महिला अध्यक्ष म्हणून त्यांची पहिल्यांदा निवड झाली आहे.
अन्य पदाधिकाऱ्यांमध्ये विदर्भ प्रांत संघटनमंत्री गजानन पांडे, उपाध्यक्षद्वयांमध्ये नारायण मेहेरे (यवतमाळ), डॉ. अजय गाडे (अमरावती), सुधीर मिसार (चंद्रपूर), संध्या पुनियानी, सहसंघटन मंत्री तृप्ती आकांत व अभय खेडकर (वाशिम), सचिव संजय धर्माधिकारी, कोषाध्यक्ष श्रीपाद भट्टलवार, सहकोषाध्यक्ष श्रीपाद हरदास, कार्यालय सचिव नरेंद्र कुळकर्णी, सहसचिव नितीन काकडे (भंडारा), डॉ. प्रीती बैतुले (सिंदेवाही), अविनाश जोशी (भद्रावती), हेमंत जकाते (अकोला), प्रचार व प्रसिद्धी प्रमुख विनायक इंगळे, सहप्रचार प्रसिद्धी प्रमुख पंकज अग्रवाल (परतवाडा), संपर्क प्रमुख विनोद देशमुख, महिला प्रमुख प्रा. अनुपमा दाते (पुसद), गीता चांदवडकर (अकोला), छाया कावळे (भंडारा), अ‍ॅड. विभा देशमुख (वर्धा), कार्यकारिणी सदस्य गजानन साळी (वाशिम), गोपालकृष्ण पुराणिक (चंद्रपूर), प्रकाश पाटील (गडचिरोली), दिनेश पाटेकर (गोंदिया), भय्यासाहेब मामू (अकोला), प्रा. जयश्री सातोकर (भंडारा), डॉ. अशोक काबरा (बुलडाणा) आणि निमंत्रित सदस्यांमध्ये अशोक त्रिवेदी, गौरी चांद्रायण आणि जयप्रकाश पाटील (अकोला) यांचा समावेश आहे.

 

Web Title: Smita Deshpande Consumer Panchayat Vidhwa Pradesh President

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.