The slaughtered animals are saved | कत्तलखान्याच्या मार्गावर असलेली गुरे वाचविली
कत्तलखान्याच्या मार्गावर असलेली गुरे वाचविली

ठळक मुद्दे८ जनावरांना जीवनदान, १५ लाखांचे मांस जप्त : पाचपावली पोलिसांची कामगिरी

लोकमत न्यूज नेटवर्क
नागपूर : पाचपावलीतील खंतेनगरात सुरू असलेल्या अवैध कत्तलखान्यावर छापा मारून पाचपावली पोलिसांनी तेथून आठ गुरांची मुक्तता केली. त्याचप्रमाणे १० टन मांस जप्त केले.
खंतेनगरातील अहसान कुरेशी याने त्याच्या घराच्या जागेत अवैध कत्तलखाना सुरू केला असून, तेथे मोठ्या प्रमाणात गुरांची कत्तल केली जात असल्याची माहिती पाचपावली पोलिसांना मिळाली. त्यावरून सोमवारी दुपारी १ च्या सुमारास पाचपावली पोलिसांनी खंतेनगरात छापा मारला. पोलीस आल्याचे पाहून आरोपी कुरेशी आणि त्याचे सहा साथीदार नाल्यात उडी मारून पळून गेले. पोलिसांनी तेथे एका वाहनात निर्दयीपणे डांबून ठेवलेली आठ जनावरे मुक्त केली. त्यांना कत्तलखान्यात आणले होते. पोलिसांच्या कारवाईमुळे त्यांना जीवनदान मिळाले. पोलिसांनी तेथून दोन लाखांचे वाहन, गुरे तसेच १० टन मांस असा एकूण १८ लाख ७१ हजारांचा मुद्देमाल जप्त केला. याप्रकरणी अहसान कुरेशी आणि त्याच्या साथीदारांविरुद्ध गुन्हा दाखल करण्यात आला.

 

 


Web Title: The slaughtered animals are saved
Get Latest Marathi News & Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and local news from all cities of Maharashtra.