नागपूर -मुंबई समृद्धी महामार्गासाठी ३५१८ कोटींचा निधी; सार्वजनिक बांधकाम मंत्री एकनाथ शिंदे यांची माहिती

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: December 12, 2017 06:21 PM2017-12-12T18:21:44+5:302017-12-12T18:22:29+5:30

नागपूर-मुंबई समृद्धी महामार्गासाठी राष्ट्रीयकृत बँका व हुडकोमार्फत सुमारे ३५१८ कोटीचा निधी मंजूर करण्यात आला आहे. अशी माहिती सार्वजनिक बांधकाम (सार्वजनिक उपक्रम) मंत्री एकनाथ शिंदे यांनी मंगळवारी विधान परिषदेत प्रश्नाच्या लेखी उत्तरात दिली.

Rs. 3518 crores fund for Nagpur- Mumbai highway; Minister Eknath Shinde | नागपूर -मुंबई समृद्धी महामार्गासाठी ३५१८ कोटींचा निधी; सार्वजनिक बांधकाम मंत्री एकनाथ शिंदे यांची माहिती

नागपूर -मुंबई समृद्धी महामार्गासाठी ३५१८ कोटींचा निधी; सार्वजनिक बांधकाम मंत्री एकनाथ शिंदे यांची माहिती

Next
ठळक मुद्देद. कोरियासोबत करार

आॅनलाईन लोकमत
नागपूर : नागपूर-मुंबई समृद्धी महामार्गासाठी राष्ट्रीयकृत बँका व हुडकोमार्फत सुमारे ३५१८ कोटीचा निधी मंजूर करण्यात आला आहे. अशी माहिती सार्वजनिक बांधकाम (सार्वजनिक उपक्रम) मंत्री एकनाथ शिंदे यांनी मंगळवारी विधान परिषदेत प्रश्नाच्या लेखी उत्तरात दिली.
महाराष्ट्र सम्द्धी महामार्ग बांधण्यासाठी ८ मार्च व १३ सप्टेंबर २०१७ रोजी बँका व वित्तीय संस्थांच्या बैठकी घेण्यात आल्या. या प्रकल्प उभारण्याच्या अनुषंगाने चर्चा करण्यात आली. दक्षिण कोरियाच्या शासनासोबत द्विपक्षीय करारनामा करण्यात आला आहे. निधी उपलब्धतेच्या अनुषंगाने चर्चा करण्यात येत आहे.
वांद्रे-वर्सोवा सेतू, मुंबई-पुणे दु्रतगती महार्गावरील खंडाळा घाटातील मिसिंग लिंकचे बांधकाम, भिवंडी-कल्याण शिळफाटा रस्त्याचे सहापदरीकरण, ठाणे खाडीवरील तिसरा पूल, ठाणे-घोडबंदर उन्नतमार्ग या प्रकलपास मंत्रिमंडळ पायाभूत सुुविधा समितीने मान्यता प्रदान केली आहे. महामंडळामार्फत निधी उभारण्याचे काम प्रगतीपथवार असल्याची माहिती शिंदे यांनी लेखी उत्तरात दिली. अ‍ॅड. निरंजन डावखरे, जनार्दन चांदूरकर, शरद रणपिसे आदींनी हा प्रश्न उपस्थित केला होता.

Web Title: Rs. 3518 crores fund for Nagpur- Mumbai highway; Minister Eknath Shinde

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.