नागपूरच्या कुख्यात हिरणवार टोळीचा हॉटेलमध्ये हैदोस

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: May 26, 2018 01:16 AM2018-05-26T01:16:56+5:302018-05-26T01:17:08+5:30

कुख्यात हिरणवार टोळीने बजाजनगरातील एका हॉटेलमध्ये मोठा हैदोस घातला. एकाला शिवीगाळ करून मारहाण केली तर मध्यस्थी करायला गेलेल्या हॉटेल मालकावर हिरणवार टोळीतील गुंडांनी प्राणघातक हल्ला चढवून त्यांना गंभीर जखमी केले. हॉटेलमध्येही तोडफोड केली. या प्रकारामुळे परिसरात दहशत पसरली होती. गुरुवारी रात्री ८ च्या सुमारास बैठक रेस्टॉरेंटमध्ये ही घटना घडली.

Riots up by Notorious Hiranwar gang at Nagpur's hotel | नागपूरच्या कुख्यात हिरणवार टोळीचा हॉटेलमध्ये हैदोस

नागपूरच्या कुख्यात हिरणवार टोळीचा हॉटेलमध्ये हैदोस

Next
ठळक मुद्देहॉटेलमालकावर प्राणघातक हल्ला : तोडफोड करून दहशत पसरवली

लोकमत न्यूज नेटवर्क
नागपूर : कुख्यात हिरणवार टोळीने बजाजनगरातील एका हॉटेलमध्ये मोठा हैदोस घातला. एकाला शिवीगाळ करून मारहाण केली तर मध्यस्थी करायला गेलेल्या हॉटेल मालकावर हिरणवार टोळीतील गुंडांनी प्राणघातक हल्ला चढवून त्यांना गंभीर जखमी केले. हॉटेलमध्येही तोडफोड केली. या प्रकारामुळे परिसरात दहशत पसरली होती. गुरुवारी रात्री ८ च्या सुमारास बैठक रेस्टॉरेंटमध्ये ही घटना घडली.
बंटी हिरणवार, साहिल शेंद्रे, करण शेंडे, शक्ती यादव, मोन्या आणि पवन हिरणवार अशी आरोपींची नावे असून ते सर्व चामडिया, काचीपुरा येथील रहिवासी आहे.
अभिषेक राजेश पटेल (वय २४) हा बुधवारी रात्री ८ च्या सुमारास बजाजनगरातील बैठक रेस्टॉरेंटमध्ये बसून होता. तेवढ्यात तेथे आरोपी बंटी, पवन हिरणवार आपल्या टोळीतील गुंडांसोबत आला. ‘तू शत्रूसोबत जाऊन भेटला. आमच्याशी गद्दारी केली’, असे म्हणत हे गुंड पटेलसोबत वाद घालून त्याला शिवीगाळ करू लागले. हॉटेलमध्ये वाद होत असल्याचे पाहून हॉटेलमालक डोनॉल्ड बाबाराव ढोमणे मध्यस्थी करायला गेले. त्यांनी आरोपींची समजूत काढण्याचे प्रयत्न केले असता आरोपींनी त्यांना कशाला शहाणपण करतो, असे म्हणत खुर्ची टेबल, दगड, व हाथबुक्कीने बेदम मारहाण करून गंभीर दुखापत केली. हॉटेलमध्ये खुर्च्या, टेबल तसेच इतर साहित्याची तोडफोड करून दहशत निर्माण केली. त्यामुळे हॉटेलमध्ये जेवण घ्यायला आलेली मंडळी बाहेर पळून गेली. गंभीर जखमी झालेल्या ढोमणे यांना खासगी इस्पितळात दाखल करण्यात आले. तेथे त्यांच्यावर उपचार सुरू आहे. पटेल याने दिलेल्या तक्रारीवरून बजाजनगर पोलिसांनी आरोपींविरुद्ध विविध कलमानुसार गुन्हा नोंदविला. आरोपींचा शोध घेतला जात आहे.

Web Title: Riots up by Notorious Hiranwar gang at Nagpur's hotel

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.