राजीव गांधी हे तंत्रज्ञानाचे महामेरू 

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: August 20, 2018 10:57 PM2018-08-20T22:57:41+5:302018-08-20T23:02:33+5:30

माजी पंतप्रधान राजीव गांधी यांनी वयाची १८ वर्षे पूर्ण करणाऱ्या युवकांना मतदानाचा अधिकार दिला. विकास कामांमध्ये स्त्री-पुरुषांना सारखा अधिकार देण्यात यावा आणि ग्रामीण भागातील यंत्रणा अधिक सक्षम करण्यासाठी त्यांनी पावले उचललेली होती. इतकेच नव्हे तर १९८७ ला राजीव गांधी यांनी पंचायत राज धोरणांच्या माध्यमातून अनेक अलौकिक व समाजोपयोगी कामे केली. भारतातील अनेक राज्यांत शहरी ते ग्रामीण पातळीवर तंत्रज्ञानाला विकसित करणारे, तंत्रज्ञानाचे महामेरू होते, अशा शब्दात मान्यवरांनी राजीव गांधी यांना श्रद्धांजली अर्पण केली.

Rajiv Gandhi was the master of technology | राजीव गांधी हे तंत्रज्ञानाचे महामेरू 

राजीव गांधी हे तंत्रज्ञानाचे महामेरू 

googlenewsNext
ठळक मुद्देशहर काँग्रेसतर्फे आदरांजली : विविध संस्था, संघटनांतर्फे नमन

लोकमत न्यूज नेटवर्क
नागपूर : माजी पंतप्रधान राजीव गांधी यांनी वयाची १८ वर्षे पूर्ण करणाऱ्या युवकांना मतदानाचा अधिकार दिला. विकास कामांमध्ये स्त्री-पुरुषांना सारखा अधिकार देण्यात यावा आणि ग्रामीण भागातील यंत्रणा अधिक सक्षम करण्यासाठी त्यांनी पावले उचललेली होती. इतकेच नव्हे तर १९८७ ला राजीव गांधी यांनी पंचायत राज धोरणांच्या माध्यमातून अनेक अलौकिक व समाजोपयोगी कामे केली. भारतातील अनेक राज्यांत शहरी ते ग्रामीण पातळीवर तंत्रज्ञानाला विकसित करणारे, तंत्रज्ञानाचे महामेरू होते, अशा शब्दात मान्यवरांनी राजीव गांधी यांना श्रद्धांजली अर्पण केली.
माजी पंतप्रधान भारतरत्न राजीव गांधी यांची ७४ वी जयंती नागपूर शहर काँग्रेस कमिटीतर्फे साजरी करण्यात आली. शहर अध्यक्ष विकास ठाकरे यांच्या अध्यक्षतेखाली झालेल्या कार्यक्रमात माजी केंद्रीय राज्यमंत्री विलास मुत्तेमवार यांनी राजीव गांधी यांच्या प्रतिमेला पुष्पहार अर्पण केला. यावेळी अ‍ॅड.अभिजित वंजारी, अतुल कोटेचा, उमाकांत अग्निहोत्री, विशाल मुत्तेमवार, रामगोविद खोब्रागडे, सरचिटणीस डॉ.गजराज हटेवार,माजी विरोधी पक्षनेता संजय महाकाळकर, प्रशांत धवड, रमण पैगवार, जयंत लुटे, प्रा.दिनेश बानाबाकोडे, संदेश सिंगलकर, विवेक निकोसे आदी उपस्थित होते. यावेळी ज्येष्ठ सामाजिक कार्यकर्ते उमेशबाबू चौबे व केरळ पुरात मृत झालेल्यांना श्रद्धांजली वाहण्यात आली. केरळच्या पूरग्रस्तांना मदत करणार असल्याचे विकास ठाकरे यांनी जाहीर केले. कार्यक्रमाला वीणा बेलगे, अ‍ॅड.अक्षय समर्थ, रवी गाडगे, राजेश नंदनकर, नरेश शिरमवार, पवन शर्मा, चंद्रकांत गोहणे, वासुदेव ढोके, गीता काळे, उज्ज्वला बनकर, रमेश पुणेकर, रश्मी धुर्वे, संदीप सहारे, इरशाद अली, वासुदेव ढोके, बॉबी दहीवाले, इरशाद मलिक, धरम पाटील आदी उपस्थित होते.
नागपूर सुधार प्रन्यास
 माजीप्रधानमंत्री राजीव गांधी यांची जयंती सद्भावना दिवस म्हणून साजरी करण्यात आली. यानिमित्त प्रतिज्ञा घेण्यात आली. स्टेशन रोड मार्गस्थित नासुप्र मुख्यालयाच्या छत्रपती शिवाजी महाराज सभागृह येथे आयोजित कार्यक्रमात महाव्यवस्थापक अजय रामटेके यांनी राजीव गांधी यांच्या प्रतिमेस पुष्पहार अर्पण करून अभिवादन केले. यावेळी रामटेके यांनी उपस्थित अधिकारी व कर्मचाºयांना सद्भावनेची प्रतिज्ञा दिली. याप्रसंगी कार्यकारी अधिकारी प्रशांत भांडारकर, सचिव-२ योगिराज अवधूत यांच्यासह नासुप्रचे अधिकारी व कर्मचारी उपस्थित होते.

राष्ट्रवादी काँग्रेस
राष्ट्रवादी काँग्रेसतर्फे राजीव गांधी चौक वर्धा रोड येथे स्थापन केलेल्या राजीव गांधी यांच्या पूर्णाकृती पुतळ्याला माजी आमदार दीनानाथ पडोळे व माजी शहर अध्यक्ष दिलीप पनकुले यांनी आदरांजली अर्पण केली. यावेळी विभागीय अध्यक्ष देवीदास घोडे, तात्या मते, अशोक राऊत, भाई मोहोड, सोपानराव शिरसाट, संजय शेवाळे, विजय मसराम, वसंत घटाटे, प्रमोद जोंधळे, विकास गेडाम, विक्रांत तांबे, ईश्वर दहिकर, बबलू चौहान, विलास पोटफोडे, रामभाऊ धुर्वे, बबलू चौहान, राजेश टेंभुर्णे आदी उपस्थित होते. .

Web Title: Rajiv Gandhi was the master of technology

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.