विदर्भात अवकाळी पाऊस; धानपिकासह हरभरा आणि तुरीला फटका

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: December 10, 2018 09:37 AM2018-12-10T09:37:57+5:302018-12-10T09:38:26+5:30

नागपूरसह विदर्भाच्या बहुतेक सर्व जिल्ह्यात सोमवारी पहाटे कोसळलेल्या अवकाळी पावसाने धानपिकासह अन्य पिकांचे अतोनात नुकसान केले आहे. 

Rainfall in Vidarbha; The gram and rice in trouble | विदर्भात अवकाळी पाऊस; धानपिकासह हरभरा आणि तुरीला फटका

विदर्भात अवकाळी पाऊस; धानपिकासह हरभरा आणि तुरीला फटका

Next
ठळक मुद्देआणखी एक दिवस पावसाची शक्यता

लोकमत न्यूज नेटवर्क
नागपूर: नागपूरसह विदर्भाच्या बहुतेक सर्व जिल्ह्यात सोमवारी पहाटे कोसळलेल्या अवकाळी पावसाने धानपिकासह अन्य पिकांचे अतोनात नुकसान केले आहे. 
नागपूर जिल्ह्यात रविवारी व सोमवारी पहाटे अशा दोन्ही दिवशी पाऊस बरसला. भंडारा जिल्ह्यात सकाळी कोसळलेल्या पावसाने काढणीला आलेल्या उच्च प्रतीच्या धानपिकासह भाजीपाल्याचे मोठे नुकसान झाले. सकाळी ६.३० पासून शहर व जिल्ह्यात तासभर जोरदार पाऊस झाला. गेल्या आठवड्यापासूनच विदर्भात ढगाळ वातावरण आहे. रविवारी सकाळी या अवकाळी पावसाने प्रथमच हजेरी लावली होती.
यवतमाळ जिल्ह्यात तासभर जोरदार पाऊस बरसला. कापूस व तूर पिकांना जोरदार फटका बसला असून दाट धुक्यामुळे हरभराही रोगराईच्या सावटात असल्याचे सांगितले जाते. गोंदियात पावसाने जोरदार हजेरी लावली. गडचिरोली जिल्ह्यात मध्यरात्री पावसाची एक सर येऊन गेली. मात्र नंतर पाऊस बरसला नाही. अजून एक दिवस पाऊस येण्याची शक्यता हवामान खात्याने वर्तविली आहे.

Web Title: Rainfall in Vidarbha; The gram and rice in trouble

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.

टॅग्स :Rainपाऊस