‘जिल्हे नागपूर’ पुस्तिकेचे मुख्यमंत्र्यांच्या हस्ते प्रकाशन

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: July 20, 2018 12:07 AM2018-07-20T00:07:24+5:302018-07-20T00:09:26+5:30

जिल्ह्याच्या ऐतिहासिक व सांस्कृतिक माहितीसह समृद्ध परंपरेच्या वाटचालीचा तसेच विकासाची संपूर्ण माहिती असलेल्या जिल्हा माहिती कार्यालयाने शब्दबद्ध केलेल्या ‘जिल्हे नागपूर’ या पुस्तकाचे प्रकाशन मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या हस्ते गुरुवारी विधानभवनातील मंत्री परिषद सभागृहात झाले. शासनाच्या विविध कल्याणकारी योजना समाजाच्या प्रत्येक घटकापर्यंत पोहोचविण्यासाठी हे पुस्तक उपयुक्त असल्याचे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी यावेळी सांगितले.

Publication at the hands of Chief Minister of 'Districts Nagpur' book | ‘जिल्हे नागपूर’ पुस्तिकेचे मुख्यमंत्र्यांच्या हस्ते प्रकाशन

‘जिल्हे नागपूर’ पुस्तिकेचे मुख्यमंत्र्यांच्या हस्ते प्रकाशन

Next
ठळक मुद्देजिल्हा माहिती कार्यालयाचा उपक्रम : ऐतिहासिक परंपरा, विकासाचा आढावा

लोकमत न्यूज नेटवर्क
नागपूर : जिल्ह्याच्या ऐतिहासिक व सांस्कृतिक माहितीसह समृद्ध परंपरेच्या वाटचालीचा तसेच विकासाची संपूर्ण माहिती असलेल्या जिल्हा माहिती कार्यालयाने शब्दबद्ध केलेल्या ‘जिल्हे नागपूर’ या पुस्तकाचे प्रकाशन मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या हस्ते गुरुवारी विधानभवनातील मंत्री परिषद सभागृहात झाले. शासनाच्या विविध कल्याणकारी योजना समाजाच्या प्रत्येक घटकापर्यंत पोहोचविण्यासाठी हे पुस्तक उपयुक्त असल्याचे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी यावेळी सांगितले.
यावेळी महसूल मंत्री चंद्रकांत पाटील, ग्राम विकास मंत्री पंकजा मुंडे, पालकमंत्री चंद्रशेखर बावनकुळे, आ. सुधाकर देशमुख, आ. सुधाकर कोहळे, आ. विकास कुंभारे, आ. कृष्णा खोपडे, आ. डॉ. मिलिंद माने, आ. सुधीर पारवे, आ.डी. मल्लिकार्जुन रेड्डी, आ.आशिष देशमुख, आ. समीर मेघे, मुख्यमंत्र्यांचे अतिरिक्त मुख्य सचिव प्रवीण परदेशी तसेच विविध विभागाचे अतिरिक्त मुख्य सचिव, प्रधान सचिव, विभागीय आयुक्त अनुप कुमार, जिल्हाधिकारी अश्विन मुदगल, महापालिका आयुक्त वीरेंद्र्र सिंह, जिल्हा परिषदेचे मुख्य कार्यपालन अधिकारी संजय यादव, जिल्हा पोलीस अधीक्षक शैलेश बलकवडे आदी उपस्थित होते.
माहिती व जनसंपर्क महासंचालनालयाचे सचिव तथा महासंचालक ब्रिजेश सिंह यांच्या संकल्पनेतून तसेच नागपूर-अमरावती विभागाचे संचालक राधाकृष्ण मुळी यांचे मार्गदर्शनात या पुस्तकाची निर्मिती जिल्हा माहिती अधिकारी अनिल गडेकर यांनी केली आहे. ८४ पानाच्या या पुस्तकात जिल्ह्यातील इतिहास, कला, संस्कृती आदी माहितीसह विविध शासकीय योजनांची मागील साडेतीन वर्षातील विकास योजनांची माहिती छायाचित्रासह देण्यात आली आहे.

Web Title: Publication at the hands of Chief Minister of 'Districts Nagpur' book

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.