प्रसन्ना कुमार जेना रामटेकसाठी केंद्रीय निवडणूक निरीक्षक

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: March 29, 2019 01:25 AM2019-03-29T01:25:14+5:302019-03-29T01:26:18+5:30

निवडणूक आयोगाने ओडिशा कॅडरचे वरिष्ठ प्रशासकीय अधिकारी प्रसन्ना कुमार जेना यांची रामटेक लोकसभा मतदारसंघासाठी केंद्रीय निवडणूक निरीक्षक म्हणून नियुक्ती केली आहे. प्रसन्ना कुमार जेना हे ओडिशा कॅडरच्या २००५ बॅचचे आयएएस अधिकारी आहेत. रामटेक लोकसभा मतदारसंघात मुक्त वातावरणात निवडणुका घेण्याच्या दृष्टीने मतदारांसाठी त्या रविभवन येथे उपलब्ध राहणार आहेत.

Prasanna Kumar Jena Central election observer for Ramtek | प्रसन्ना कुमार जेना रामटेकसाठी केंद्रीय निवडणूक निरीक्षक

प्रसन्ना कुमार जेना रामटेकसाठी केंद्रीय निवडणूक निरीक्षक

Next
ठळक मुद्देरविभवन येथे मतदारांसाठी उपलब्ध

लोकमत न्यूज नेटवर्क
नागपूर : निवडणूक आयोगाने ओडिशा कॅडरचे वरिष्ठ प्रशासकीय अधिकारी प्रसन्ना कुमार जेना यांची रामटेक लोकसभा मतदारसंघासाठी केंद्रीय निवडणूक निरीक्षक म्हणून नियुक्ती केली आहे. प्रसन्ना कुमार जेना हे ओडिशा कॅडरच्या २००५ बॅचचे आयएएस अधिकारी आहेत. रामटेक लोकसभा मतदारसंघात मुक्त वातावरणात निवडणुका घेण्याच्या दृष्टीने मतदारांसाठी त्या रविभवन येथे उपलब्ध राहणार आहेत. लोकसभा मतदारसंघाच्या निवडणूकसंदर्भात त्यांनी वरिष्ठ अधिकाऱ्यांसोबत आढावा घेतला. निवडणूक निरीक्षक प्रसन्ना कुमार जेना यांचा मुक्काम रविभवन कॉटेज क्रमांक ९ येथे असून त्यांचा भ्रमण ध्वनिक्रमांक ९०२२२०७०९० असा आहे. सर्व मतदारांना ते सकाळी ११ ते १ या वेळेत रवीभवन येथे उपलब्ध आहेत.
विनोद कुमार केंद्रीय निवडणूक खर्च निरीक्षक
निवडणूक आयोगाने भारतीय रेव्हेन्यू सेवेचे वरिष्ठ अधिकारी विनोद कुमार यांची नागपूर लोकसभा मतदार संघासाठी केंद्रीय निवडणूक निरीक्षक (खर्च) म्हणून नियुक्ती केली आहे. विनोद कुमार हे आर.आय.एस. २००५ या बॅचचे अधिकारी आहेत.
नागपूर लोकसभा मतदार संघात मुक्त वातावरणात निवडणुका घेण्याच्यादृष्टीने मतदारांसाठी रविभवन कॉटेज क्रमांक सी-७ येथे सकाळी ११ ते १ या कालावधीत उपलब्ध राहणार आहेत. त्यांचा दूरध्वनी क्रमांक ०९९६९२३५०९९ हा आहे. व रविभवन कॉटेज येथील दूरध्वनी क्रमांक ०७१२-२५२२८६३ असा आहे.
दिनेश कुमार यादव केंद्रीय पोलीस निवडणूक निरीक्षक
निवडणूक आयोगाने भारतीय पोलीस सेवेचे वरिष्ठ अधिकारी दिनेश कुमार यादव यांची रामटेक व वर्धा लोकसभा मतदार संघासाठी केंद्रीय पोलीस निवडणूक निरीक्षक म्हणून नियुक्ती केली आहे. दिनेश कुमार यादव हे आय.पी.एस. १९९८ या बॅचचे अधिकारी आहेत. रामटेक लोकसभा मतदार संघात मुक्त वातावरणात निवडणुका घेण्याच्यादृष्टीने मतदारांसाठी रविभवन कॉटेज क्रमांक ३ येथे सकाळी १० ते ११ या कालावधीत उपलब्ध राहणार आहेत. त्यांचा दूरध्वनी क्रमांक ९०२२२२३६९७, ९६३५००५२६२ असा आहे.

 

Web Title: Prasanna Kumar Jena Central election observer for Ramtek

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.