नागपूर जिल्ह्यातील बहादुरा ग्रा.पं.मध्ये राजकीय भूकंप

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: June 19, 2018 09:48 AM2018-06-19T09:48:58+5:302018-06-19T09:49:05+5:30

सरपंचपदाच्या निवडणुकीत पक्ष नेतृत्वाचे आदेशाला नाकारून, स्वतंत्र गट तयार केल्यामुळे बहादुरा ग्रा.पं.च्या ११ सदस्यांवर भाजपाने निलंबनाची कारवाई केली आहे.

Political earthquake in Nagpur district | नागपूर जिल्ह्यातील बहादुरा ग्रा.पं.मध्ये राजकीय भूकंप

नागपूर जिल्ह्यातील बहादुरा ग्रा.पं.मध्ये राजकीय भूकंप

Next
ठळक मुद्देभाजपने ११ सदस्यांना केले निलंबित सरपंच आणि उपसरपंचाचाही समावेश

लोकमत न्यूज नेटवर्क
नागपूर : सरपंचपदाच्या निवडणुकीत पक्ष नेतृत्वाचे आदेशाला नाकारून, स्वतंत्र गट तयार केल्यामुळे बहादुरा ग्रा.पं.च्या ११ सदस्यांवर भाजपाने निलंबनाची कारवाई केली आहे. पक्षाने स्वत:चे ११ सदस्य निलंबित केल्याने राजकीय चर्चेला वेग आला आहे. यात बहादुरा ग्रा.पं.चे नवनिर्वाचित सरपंच राजकुमार वंजारी, उपसरपंच दिलीप चापेकर यांचाही समावेश आहे.
नागपूर तालुक्यात बहादूर ग्रा.पं. सर्वात मोठी ग्रामपंचायत आहे. १७ सदस्य असलेल्या या ग्रा.पं.वर भाजपाचा झेंडा आहे. अडीच वर्षापूर्वी नरेंद्र नांदूरकर यांच्या गळ्यात सरपंचपदाची तर पुष्पा पांडे यांच्या गळ्यात उपसरपंचपदाची माळ पडली होती. ग्रा.पं. निवडणुकीनंतर ‘अडीच-अडीच’ वर्षाचा फॉर्म्युला अमलात आला होता. अडीच वर्ष पूर्ण झाल्यामुळे भाजपाच्या वरिष्ठांच्या आदेशानुसार सरपंच नांदूकर व उपसरपंच पांडे यांनी पदाचा राजीनामा दिला. त्यानंतर १७ सदस्यांमध्ये वंजारी व कुरळकर असे दोन गट पडले. भाजप पक्षश्रेष्ठींनी सरपंचपदासाठी कुरळकर यांचे नाव सामोर केले. तर दुसऱ्या गटाने वंजारी यांना समर्थन दिले. वंजारी यांना ११ सदस्यांचा तर कुरळकर यांना ६ सदस्यांचा पाठिंबा होता. पक्षश्रेष्ठींचे न ऐकता राजकुमार वंजारी यांनी सरपंचपदासाठी तर उपसरपंचपदासाठी दिलीप चापेकर यांनी अर्ज दाखल केला. ५ मे रोजी झालेल्या निवडणुकीत राजकुमार वंजारी यांना ११ तर भोला कुरळकर यांना ६ मते पडली. तर उपसरपंच पदासाठी दिलीप चापेकर यांना १४ मते पडली.

निलंबित सदस्य
राजकुमार वंजारी (सरपंच), दिलीप चापेकर (उपसरपंच), पार्वता गुजरकर, सिद्धार्थ नगरारे, एजाज घाणीवाला, राजू लल्लन अंसारी, सुमन कुंभरे, गीता सूर्यवंशी, राधिका ढोमणे, विजय नाखले, वनिता उरकुडकर.

ग्रा.पं. सदस्यांना भोला कुरळकर हे चालत नव्हते. त्यामुळे ११ सदस्यांनी मला पाठिंबा दिला. निवडणुकीतही ११ सदस्यांनी माझ्या बाजूने मत दिलीत. पक्ष श्रेष्ठींच्या विरोधात गेलो असलो तरी, आम्ही भाजपाचे निष्ठावान कार्यकर्ता आहोत. निलंबनाची कारवाई केल्यामुळे आम्ही नाराज आहोत. आमच्यावरील निलंबनाची कारवाई रद्द करावी.
- राजकुमार वंजारी,
नवनिर्वाचित सरपंच

Web Title: Political earthquake in Nagpur district

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.

टॅग्स :Governmentसरकार