नागपुरात नायलॉन मांजा विक्रेत्यांची धरपकड

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: January 15, 2019 12:05 AM2019-01-15T00:05:26+5:302019-01-15T00:07:16+5:30

नायलॉन मांजाची विक्री करून नागरिकांच्या जीवाशी खेळणाऱ्यांविरोधात नागपूर पोलिसांनी मोहीम सुरू केली आहे. पोलिसांनी महिलेसह आठ जणांना नायलॉन मांजाच्या अवैध विक्रीप्रकरणी अटक केली व त्यांच्याकडून पावणेदोन कोटींचा मांजा जप्त केला. या कारवाईमुळे नायलॉन मांजा विक्रेत्यांमध्ये खळबळ माजली आहे. नंदनवन पोलिसांनी ही कारवाई केली.

Police arrested Nylon Manza dealers in Nagpur | नागपुरात नायलॉन मांजा विक्रेत्यांची धरपकड

नागपुरात नायलॉन मांजा विक्रेत्यांची धरपकड

googlenewsNext
ठळक मुद्देमहिलेसह आठ जणांना अटक : पावणेदोन कोटींचा माल जप्त

लोकमत न्यूज नेटवर्क
नागपूर : नायलॉन मांजाची विक्री करून नागरिकांच्या जीवाशी खेळणाऱ्यांविरोधात नागपूर पोलिसांनी मोहीम सुरू केली आहे. पोलिसांनी महिलेसह आठ जणांना नायलॉन मांजाच्या अवैध विक्रीप्रकरणी अटक केली व त्यांच्याकडून पावणेदोन कोटींचा मांजा जप्त केला. या कारवाईमुळे नायलॉन मांजा विक्रेत्यांमध्ये खळबळ माजली आहे. नंदनवन पोलिसांनी ही कारवाई केली.
२४ वर्षीय रोहिना बी मो.युनूसचे हसनबाग येथे किराणा दुकान आहे. येथे नायलॉन मांजाची विक्री होत असल्याची पोलिसांना माहिती मिळाली. याआधारावर पोलीस निरीक्षक विनायक चव्हाण, एपीआय पंकज धाडगे यांच्या मार्गदर्शनात पीएसआय एच.एस.थोरात, स्नेहलता जायेभाये, महादेव थोटे, श्रीकांत साबळे यांनी दुकानावर धाड टाकली व १ लाख २६ हजार रुपयांचा नायलॉन मांजा जप्त केला. दुकानात ७५६ बंडल होती. पोलिसांनी रोहिनाला अटक केली. सक्करदरा पोलिसांनी पवन अनिल महाजन (२२) सरस्वतीनगर, अतुल कोठीराम देवगडे (२४) कामठी, अब्दुल नईम अब्दुल गनी (५१) सरताज कॉलनी तसेच जकीर हैदर अली खान (२८) आझाद कॉलनी, ताजाबाद यांना अटक केली व साडेपाच हजार रुपयांचा नायलॉन मांजा जप्त केला. मानकापूर पोलिसांनी महादेव विठोबाजी राऊत (५७) गीतानगर याला अटक केली व ३ हजार ३०० रुपयांचा मांजा जप्त केला.
याच पद्धतीने झोन पाचचे पोलीस उपायुक्त हर्ष पोद्दार यांच्या विशेष दलाने सोमवारी दोन युवकांना नायलॉन मांजासह अटक केली. पोलिसांनी यशोधरा ठाणे परिसरात मोटरसायकलवरील ललित सावतकर (२५) कोलबास्वामी कॉलनी याला पकडले. त्याच्याकडे नायलॉन मांजाच्या चार चक्री सापडल्या. ललितच्या घरीच पतंगांचे दुकान आहे. कळमना येथील गुलशननगरात राहणाऱ्या रिकेश शंकर पारशिवनीकर यालादेखील अटक करण्यात आली. त्याने नायलॉन मांजाच्या चार चक्री घरी लपवून ठेवल्या होत्या.
कठोर कारवाई करणार : पोलीस आयुक्त
नागरिकांनी नायलॉन मांजाचा वापर करू नये, असे आवाहन पोलीस आयुक्त डॉ.भूषणकुमार उपाध्याय यांनी केले आहे. नायलॉन मांजामुळे अपघात होऊ शकतात. निष्पाप लोकांचा जीव जाऊ शकतो. याचा वापर झाला तर कठोर कारवाई करण्यात येईल. नागरिकांनी पतंग उडविताना शांती भंग होणार नाही याची काळजी घ्यावी, असेदेखील त्यांनी सांगितले.

Web Title: Police arrested Nylon Manza dealers in Nagpur

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.