पीएनबी : ४१४ कोटी रुपयाच्या गैरव्यवहार प्रकरणी ईडीतर्फे चौकशी सुरू

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: July 17, 2018 09:50 PM2018-07-17T21:50:00+5:302018-07-17T21:51:16+5:30

बँकेची ४१४ कोटी रुपयाने फसवणूक केल्याप्रकरणी पंजाब नॅशनल बँकेने दाखल केलेल्या तक्रारीवरून मे. विन्सम डायमंड अ‍ॅण्ड ज्वेलरी लि. कंपनीविरुद्ध सीबीआय मुंबई येथे गुन्हे दाखल करण्यात आले आहे. तसेच या प्रकरणाचची ईडी (अंमलबजावणी संचालनालय)तर्फे चौकशी सुरु अहे. अशी माहिती मुख्यमंत्री देवेंद्र् फडणवीस यांनी मंगगळवारी विधानसभेत उपस्थित एका प्रश्नाच्या लेखी उत्तरात दिली.

PNB: Inquiries by ED Rs 414 crores in connection with fraud | पीएनबी : ४१४ कोटी रुपयाच्या गैरव्यवहार प्रकरणी ईडीतर्फे चौकशी सुरू

पीएनबी : ४१४ कोटी रुपयाच्या गैरव्यवहार प्रकरणी ईडीतर्फे चौकशी सुरू

Next
ठळक मुद्देविधानसभेत मुख्यमंत्री देवेंद्र् फडणवीस यांनी दिली माहिती

लोकमत न्यूज नेटवर्क
नागपूर : बँकेची ४१४ कोटी रुपयाने फसवणूक केल्याप्रकरणी पंजाब नॅशनल बँकेने दाखल केलेल्या तक्रारीवरून मे. विन्सम डायमंड अ‍ॅण्ड ज्वेलरी लि. कंपनीविरुद्ध सीबीआय मुंबई येथे गुन्हे दाखल करण्यात आले आहे. तसेच या प्रकरणाचची ईडी (अंमलबजावणी संचालनालय)तर्फे चौकशी सुरु अहे. अशी माहिती मुख्यमंत्री देवेंद्र् फडणवीस यांनी मंगगळवारी विधानसभेत उपस्थित एका प्रश्नाच्या लेखी उत्तरात दिली.
अमित झनक, विजय वडेट्टीवाार, अमर काळे, अस्लम शेख, अमिन पटेल आदींनी यबाबतचा प्रश्न उपस्थित केला होता. यावर आपल्या लेखी उत्तरात मुख्यमंत्र्यांनी सांगितले की, मे. विन्सम डायमंड अ‍ॅण्ड ज्वेलरी लि. कंपनीचे माजी अध्यक्ष जतीन मेहता व इतर संचालकांनी स्टॅण्डर्ड चार्टर्ड बँकेकडून प्राप्त केलेल्या ४१४ कोटी रुपयाच्या कर्ज सुविधेचा गैरवापर करून बँकेची फसवणूक केल्याचे तपसात निष्पन्न झाले आहे. यााप्र्रकरणी बीकेसी पाोलीस ठाणे ययेथे भादंवि कलम १२० (ब), ४२० अन्वये गुन्हा दाखल करण्यात आला आहे. पुढील तपसासाठी आर्थिक गुन्हे विभाग मुंबई यांच्याकडे प्रकरण वर्ग करण्यात आले आहे. तसेच पंजाब नॅशनल बँकेनेही यसंदर्भाात तक्रार केली असून सीबीआय मुंबईने देखील गुन्हे दााखल केले आहे.

Web Title: PNB: Inquiries by ED Rs 414 crores in connection with fraud

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.