चंद्रपुरातील वाढत्या प्रदूषणावर हायकोर्टात याचिका दाखल

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: January 17, 2018 08:10 PM2018-01-17T20:10:50+5:302018-01-17T20:12:01+5:30

चंद्रपुरातील प्रदूषणावर मुंबई उच्च न्यायालयाच्या नागपूर खंडपीठात जनहित याचिका दाखल करण्यात आली आहे. न्यायमूर्तीद्वय भूषण धर्माधिकारी व स्वप्ना जोशी यांनी बुधवारी प्रतिवादींना नोटीस बजावून यावर ७ मार्चपर्यंत उत्तर सादर करण्याचे निर्देश दिले.

Petition filed in the High Court on rising pollution in Chandrapur | चंद्रपुरातील वाढत्या प्रदूषणावर हायकोर्टात याचिका दाखल

चंद्रपुरातील वाढत्या प्रदूषणावर हायकोर्टात याचिका दाखल

Next
ठळक मुद्देशासनाला नोटीस : उत्तर सादर करण्याचे निर्देश

लोकमत न्यूज नेटवर्क
नागपूर : चंद्रपुरातील प्रदूषणावर मुंबई उच्च न्यायालयाच्या नागपूर खंडपीठात जनहित याचिका दाखल करण्यात आली आहे. न्यायमूर्तीद्वय भूषण धर्माधिकारी व स्वप्ना जोशी यांनी बुधवारी प्रतिवादींना नोटीस बजावून यावर ७ मार्चपर्यंत उत्तर सादर करण्याचे निर्देश दिले.
मधुसूदन रुंगटा असे याचिकाकर्त्याचे नाव असून, ते चंद्रपूर एमआयडीसी इंडस्ट्रिज असोसिएशनचे अध्यक्ष आहेत. त्यांनी वेकोलिच्या कोळसा खाणी व चंद्रपूर सुपर थर्मल पॉवर स्टेशनमुळे चंद्रपुरातील प्रदूषणाची पातळी झपाट्याने वाढत असल्याचा आरोप केला आहे. दोन्ही कंपन्या शासकीय असूनही नियमानुसार कार्य करीत नाही. कोळसा खाणीतून सूक्ष्म कण व मिथेन, सल्फर डायआॅक्साईड, आॅक्साईड आॅफ नायट्रोजन हे धोकादायक वायू वातावरणात मिसळतात. पॉवर स्टेशनमधील फ्लाय अ‍ॅशमध्ये सल्फर डायआॅक्साईड, कार्बन मोनॉक्साईड, नायट्रस आॅक्साईड इत्यादी धोकादायक घटक असतात; परंतु केवळ ४५ टक्के फ्लाय अ‍ॅशचा उपयोग केला जातो. उर्वरित फ्लाय अ‍ॅश साठविली जाते. ती हवेने उडून वातावरणात मिसळते  असे याचिकाकर्त्याचे म्हणणे आहे. याचिकेत ऊर्जा व पर्यावरण विभागाचे सचिव, चंद्रपूर जिल्हाधिकारी, केंद्रीय पर्यावरण विभागाचे प्रधान सचिव, महाराष्ट्र प्रदूषण नियंत्रण मंडळ, महाजनको, चंद्रपूर सुपर थर्मल पॉवर स्टेशन व वेकोलि यांना प्रतिवादी करण्यात आले आहे. याचिकाकर्त्यातर्फे अ‍ॅड. हरीश ठाकूर यांनी बाजू मांडली.

Web Title: Petition filed in the High Court on rising pollution in Chandrapur

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.