महावितरणच्या १३ वरिष्ठ अधिकाऱ्यांवर दंडात्मक कारवाई

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: March 3, 2018 08:09 PM2018-03-03T20:09:06+5:302018-03-03T20:09:18+5:30

महावितरणच्या नागपूर परिक्षेत्रातील तीन कार्यकारी अभियंत्यांसह वित्त व लेखा विभागातील दहा अधिकारी अश्या एकूण १३ वरिष्ठांना त्यांच्या दैंनंदिन कामात अनियमिततेचा ठपका ठेवीत त्यांचेकडून मार्च २०१८ या महिन्याच्या त्यांच्या स्थूल पगारापैकी एकतृतियांश रक्कम दंड स्वरूपात वसुल करण्याचे आदेश प्रादेशिक संचालक भालचंद्र खंडाईत यांनी दिले आहेत.

Penal action on the 13 senior officers of MSEDCL | महावितरणच्या १३ वरिष्ठ अधिकाऱ्यांवर दंडात्मक कारवाई

महावितरणच्या १३ वरिष्ठ अधिकाऱ्यांवर दंडात्मक कारवाई

Next
ठळक मुद्देबिलींगकडे दुर्लक्ष : थकबाकीचे वाढते प्रमाण भोवले

लोकमत न्यूज नेटवर्क 
नागपूर : महावितरणच्या नागपूर परिक्षेत्रातील तीन कार्यकारी अभियंत्यांसह वित्त व लेखा विभागातील दहा अधिकारी अश्या एकूण १३ वरिष्ठांना त्यांच्या दैंनंदिन कामात अनियमिततेचा ठपका ठेवीत त्यांचेकडून मार्च २०१८ या महिन्याच्या त्यांच्या स्थूल पगारापैकी एकतृतियांश रक्कम दंड स्वरूपात वसुल करण्याचे आदेश प्रादेशिक संचालक भालचंद्र खंडाईत यांनी दिले आहेत.
पाच हजारापेक्षा अधिक थकबाकी असलेल्या वीज ग्राहकांच्या यादीतील ग्राहकांकडून विहीत मुदतीत थकबाकी भरुण घेणे अथवा त्यांचा वीजपुरवठा खंडित करण्याच्या सुचना कार्यकारी अभियंता यांना देण्यात आल्या होत्या, या सुचनांची अंमलबजावणी करण्यात अपयशी ठरलेल्या तीन कार्यकारी अभियंत्यांसह महावितरणच्या वित्त व लेखा विभागात कार्यरत दहा व्यवस्थापक आणि उपव्यवस्थापक यांचेवरही दंडात्मक कार्यवाही करण्यात आली असून त्यांच्या दैंनंदिन कामांत प्रामुख्याने समावेश असलेल्या वीज ग्राहकांकडील सामान्य बिलींग, नादुरुस्त मिटरचे बिलींग, सरासरी बिलींग याकडे दुर्लक्ष सोबतच वसुली कार्यक्षमता कमी होऊन थकबाकीच्या प्रमाणात वाढ होणे, याशिवाय मीटर रिडींग एजन्सीच्या चुकांकडे डोळेझाक करणे, चुकीचे मीटर वाचन करणाऱ्या एजन्सीविरोधात किंवा एजन्सीच्या संबंधीत मीटर वाचकावर कार्यवाही करण्याचे टाळणे आदी अनियमिततेचा ठपका ठेवित या अधिकाऱ्यांना कारणे दाखवा नोटीस बजाविण्यात आली होती.
यापैकी ३ कार्यकारी अभियंते आणि वित्त व लेखा विभागातील दहा अधिकाऱ्यांनी दिलेले स्पष्टीकरण असमाधानकारक आढळल्याने त्यांचेवर शिस्तभंग कार्यवाहीच्या अनुषंगाने त्यांच्या मार्च २०१८ या महिन्याच्या स्थूल पगारापैकी एकतृतियांश रक्कम दंड स्वरूपात वसुल करण्याचे आदेश प्रादेशिक संचालक भालचंद्र खंडाईत यांनी निगर्मित केले आहेत. दंडात्मक कार्यवाही करण्यात आलेल्या अधिकाऱ्यांमध्ये पुसद, बुलढाणा, वाशिम, अकोला, पांढरकवडा, वर्धा, अचलपूर, खामगाव, आलापल्ली, नागपूर ग्रामिण, मौदा आणि हिंगणघाट या कार्यालयांतर्गत असलेल्या कार्यकारी अभियंता आणि वित्त व लेखा अधिकाऱ्यांचा समावेश आहे. याशिवाय अश्या चुकांची पुनरावृत्ती होऊ नये अशी सक्त ताकीद तीन अधिकाऱ्यांना देण्यात आली आहे.

Web Title: Penal action on the 13 senior officers of MSEDCL

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.