पादचाºयांसाठी सीताबर्डीत फूटपाथवर दोर बांधला

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: November 7, 2017 12:26 AM2017-11-07T00:26:08+5:302017-11-07T00:26:32+5:30

सीताबर्डी परिसरातील मोरभवन बसस्थानक ते इंटरनिटी मॉल दरम्यानच्या फूटपाथवर हॉकर्सचे अतिक्रमण असल्याने पादचाºयांना फू टपाथवरून चालता येत नाही.

For pedestrians, cords on the footpath in citbird are built | पादचाºयांसाठी सीताबर्डीत फूटपाथवर दोर बांधला

पादचाºयांसाठी सीताबर्डीत फूटपाथवर दोर बांधला

Next
ठळक मुद्देहॉकर्सचे अतिक्रमण हटविले : व्हेरायटी चौक ते झाशी राणी चौक परिसरात कारवाई

लोकमत न्यूज नेटवर्क
नागपूर : सीताबर्डी परिसरातील मोरभवन बसस्थानक ते इंटरनिटी मॉल दरम्यानच्या फूटपाथवर हॉकर्सचे अतिक्रमण असल्याने पादचाºयांना फू टपाथवरून चालता येत नाही. वाहतुकीला अडथळा होतो. याची दखल घेत वाहतूक पोलिसांनी सोमवारी येथील अतिक्रमण हटवून पादचाºयांना फूटपाथचा वापर करता यावा यासाठी या दरम्यानच्या फूटपाथवर दोर बांधला.
अतिक्रमण कारवाईनंतरही हॉकर्स अतिक्रमण करतात. यामुळे नागरिकांना फूटपाथवरून चालता येत नाही. फूटपाथवर चपला, बॅग व अन्य साहित्याची विक्री करणाºयांनी अतिक्रमण केले आहे. त्यामुळे नागरिकांना रस्त्यावरून चालावे लागते. वाहनांची वर्दळ व बसस्थानकातून निघणाºया बसेस व आॅटोचालकांची गर्दी यामुळे वाहतूक विस्कळीत होत असल्याने पोलिसांनी फूटपाथ मोकळा केला आहे.
तसेच झाशी राणी चौक ते उत्तर अंबाझरी मार्गावर मेट्रो रेल्वेचे काम सुरू असल्याने मार्ग अरुंद झाला आहे. परंतु मातृसेवा संघ ते हिंदी मोरभवन या दरम्यानच्या फूटपाथवर कपडे विक्रेत्यांचे अतिक्रमण असल्याने नागरिकांना फूटपाथवरून चालता येत नाही.
नागरिकांची गैरसोय होत असल्याने पोलीस आयुक्त डॉ. के. वेंकटेशम् यांच्या निर्देशानुसार वाहतूक पोलीस उपायुक्त रवींद्रसिंग परदेशी, वरिष्ठ पोलीस निरीक्षक जयेश भंडारकर यांच्या निगराणीखाली वाहतूक विभागाच्या पथकाने अतिक्रमण हटविण्याची कारवाई केली.
अतिक्र्रमण हटविल्यानंतर पोलिसांनी मोरभवन ते इंटरनिटी मॉल या दरम्यानच्या फूटपाथवर दोर बांधला. दोराच्या आतील भागाने चालण्याचे आवाहन नागरिकांना केले आहे.


पादचाºयांनी फूटपाथचा वापर करावा
फूटपाथवर अतिक्रमण असल्याने नागरिक वर्दळीच्या रस्त्यांवरून चालतात. यामुळे मोरभवन परिसरात अपघात होतात. नागरिकांनी फूटपाथचा वापर करावा, असे आवाहन वाहतूक पोलीस उपायुक्त रवींद्रसिंग परदेशी यांनी केले आहे. हा प्रयोग यशस्वी झाल्यास महापालिका आयुक्तांना पत्र देऊन फूटपाथवर कायमस्वरूपी बॅरिकेडस् लावण्यात येणार आहेत.

फूटपाथ संघटनेचे
अपर आयुक्तांना निवेदन
सीताबर्डी परिसरातील फूटपाथच्या कडेला व्यवसाय करण्यासाठी महापालिकेच्या फेरीवाला समितीने नोंदणी असलेल्या हॉकर्सला परवानगी दिलेली आहे. महापालिकेने हॉकर्स झोन घोषित केले आहेत. सर्वोच्च न्यायालयाच्या निर्देशानुसार हा निर्णय घेण्यात आला आहे. असे असतानाही वाहतूक पोलिसांकडून हॉकर्सवर कारवाई केली जात आहे. यासंदर्भात नागपूर फेरीवाला फू टपाथ दुकानदार संघटनेचे महामंत्री रज्जाक कुरेशी यांच्या नेतृत्वातील शिष्टमंडळाने सोमवारी महापालिकेचे अपर आयुक्त रवींद्र कुंभारे यांना निवेदन सादर करून चर्चा केली. कारवाईदरम्यान हॉकर्सचे होणारे नुकसान टाळावे. आकारण्यात येणारा दंड अन्यायकारक असल्याचे त्यांच्या निदर्शनास आणले. शिष्टमंडळात संदीप गुहे, इम्तीयाज शाहीद, जुगल थोरात, संजू गुप्ता, शब्बीर शेख, दिलीप शाहू, राकेश ठाकूर, अकबर मिनाज, अफरोज आलम आदींचा समावेश होता.

Web Title: For pedestrians, cords on the footpath in citbird are built

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.