काठ्या बाळगून पथसंचलन : सरसंघचालकांना न्यायालयाची नोटीस

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: November 15, 2018 08:02 PM2018-11-15T20:02:05+5:302018-11-15T20:02:54+5:30

काठ्या बाळगून पथसंचलन करण्यासंदर्भातील प्रकरणामध्ये सत्र न्यायालयाने बुधवारी राष्ट्रीय स्वयंसेवक संघाचे सरसंघचालक मोहन भागवत, पथसंचलन व्यवस्था प्रमुख अनिल भोकारे व कोतवाली पोलीस निरीक्षक यांना नोटीस बजावून येत्या ११ डिसेंबरपर्यंत उत्तर दाखल करण्याचे निर्देश दिलेत. अतिरिक्त सत्र न्यायाधीश व्ही. एम. वैद्य यांच्यासमक्ष प्रकरणावर सुनावणी झाली.

Parade with sticks: Court notice to Sangh Chief | काठ्या बाळगून पथसंचलन : सरसंघचालकांना न्यायालयाची नोटीस

काठ्या बाळगून पथसंचलन : सरसंघचालकांना न्यायालयाची नोटीस

Next
ठळक मुद्देनागपूर सत्र न्यायालयात मोहनीश जबलपुरे यांच्या पुनर्विचार अर्जावर सुनावणी

लोकमत न्यूज नेटवर्क
नागपूर : काठ्या बाळगून पथसंचलन करण्यासंदर्भातील प्रकरणामध्ये सत्र न्यायालयाने बुधवारी राष्ट्रीय स्वयंसेवक संघाचे सरसंघचालक मोहन भागवत, पथसंचलन व्यवस्था प्रमुख अनिल भोकारे व कोतवाली पोलीस निरीक्षक यांना नोटीस बजावून येत्या ११ डिसेंबरपर्यंत उत्तर दाखल करण्याचे निर्देश दिलेत. अतिरिक्त सत्र न्यायाधीश व्ही. एम. वैद्य यांच्यासमक्ष प्रकरणावर सुनावणी झाली.
या प्रकरणाचा तपास करून दोषी व्यक्तींविरुद्ध एफआयआर नोंदविला जावा याकरिता सामाजिक कार्यकर्ते मोहनीश जबलपुरे यांनी सत्र न्यायालयात रिव्हिजन अर्ज दाखल केला आहे. २८ मे २०१८ रोजी पथसंचलन करण्यासाठी राष्ट्रीय स्वयंसेवक संघाला पोलीस उपायुक्तांनी २६ मे २०१८ रोजी परवानगी दिली होती. ही परवानगी देताना कार्यक्रमात काठ्या, घातक शस्त्रे, ज्वलनशील पदार्थ व स्फोटके बाळगायची नाहीत, शस्त्रांचे प्रदर्शन करायचे नाही, आतषबाजी करायची नाही यासह विविध अटी ठेवण्यात आल्या होत्या. तसेच, अटींचे उल्लंघन केल्यास कार्यक्रमातील प्रत्येक सदस्यावर कायद्यानुसार कारवाई केली जाईल असे स्पष्ट करण्यात आले होते. असे असताना राष्ट्रीय स्वयंसेवक संघाने सार्वजनिक रस्त्यांवर काठ्यांसह पथसंचलन केले. संघाची ही कृती समाजामध्ये दहशत पसरविणारी आहे असे जबलपुरे यांचे म्हणणे आहे.
१२ आॅक्टोबर २०१८ रोजी प्रथम श्रेणी न्याय दंडाधिकारी न्यायालयाने त्यांचा अर्ज खारीज केला. संघाने कायदा व सुव्यवस्थेला बाधा पोहोचविण्यासाठी किंवा शस्त्र म्हणून वापरण्यासाठी काठ्या बाळगल्या नाहीत असे निरीक्षण त्या निर्णयात नोंदविण्यात आले. परिणामी, जबलपुरे यांनी सत्र न्यायालयात रिव्हिजन अर्ज दाखल करून या निर्णयाला आव्हान दिले आहे.

 

Web Title: Parade with sticks: Court notice to Sangh Chief

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.