जागतिक संत्रा महोत्सवाचे जानेवारीत आयोजन

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: December 4, 2018 01:11 AM2018-12-04T01:11:10+5:302018-12-04T01:12:21+5:30

लोकमत न्यूज नेटवर्क नागपूर : नागपूरच्या संत्र्याला आंतरराष्ट्रीय स्तरावर व्यासपीठ मिळवून देणाऱ्या जागतिक संत्रा महोत्सवाचे जानेवारी २०१९ मध्ये आयोजन ...

Organized in January of the World Orange Festival | जागतिक संत्रा महोत्सवाचे जानेवारीत आयोजन

जागतिक संत्रा महोत्सवाचे जानेवारीत आयोजन

Next
ठळक मुद्देलोकमतचा पुढाकार : आंतरराष्ट्रीय तज्ज्ञ येणार : पालकमंत्र्यांनी घेतली बैठक

लोकमत न्यूज नेटवर्क
नागपूर : नागपूरच्या संत्र्याला आंतरराष्ट्रीय स्तरावर व्यासपीठ मिळवून देणाऱ्या जागतिक संत्रा महोत्सवाचे जानेवारी २०१९ मध्ये आयोजन करण्यात येणार आहे. लोकमत समूहाच्या पुढाकाराने मागील वर्षीपासून सुरू केलेल्या या वर्ल्ड आॅरेंज फेस्टिव्हलची जागतिक स्तरावर दखल घेण्यात आली आहे. मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस आणि केंद्रीय मंत्री नितीन गडकरी यांच्या भक्कम पाठिंब्याने विदर्भातील संत्रा उत्पादकांच्या समृद्धीत भर घालणाऱ्या या उपक्रमाबद्दल शेतकऱ्यांमध्ये प्रचंड उत्सुकता आहे. त्या अनुषंगाने नागपूर जिल्ह्याचे पालकमंत्री चंद्रशेखर बावनकुळे यांनी सोमवारी महोत्सवाच्या आयोजनासंदर्भात एक बैठक घेतली. बैठकीला महापौर, जिल्हाधिकारी यांच्यासह विविध विभागाचे अधिकारी उपस्थित होते.
नागपूरच्या संत्र्याला जागतिक व्यासपीठ मिळवून देताना संत्रा उत्पादक शेतकऱ्यांना नवीन विकसित तंत्रज्ञानाची माहिती व्हावी, संत्रा या फळाला बाजारपेठेसोबत प्रक्रिया उद्योगाला चालना देण्यासाठी जागतिक संत्रा महोत्सवाचे आयोजन करण्यात येते. महोत्सवाच्या माध्यमातून शेतकऱ्यांना राष्ट्रीय व आंतरराष्ट्रीय स्तरावरील तंत्रज्ञानाची माहिती उपलब्ध होणार असल्याची माहिती पालकमंत्री चंद्रशेखर बावनकुळे यांनी यावेळी दिली.
राज्यात विभागनिहाय प्रमुख सहा महोत्सव आयोजित करण्यात येणार असून या अंतर्गत नागपूर येथे जागतिक संत्रा महोत्सवाचे आयोजन येत्या १८ ते २१ जानेवारीदरम्यान सुरेश भट सभागृहात करण्यात येणार आहे. या महोत्सवानिमित्त विविध उपक्रमांचे आयोजन होत असल्यामुळे महोत्सवाचा लाभ संत्रा उत्पादक शेतकऱ्यांना होणार आहे. या महोत्सवात विविध देशांचे प्रतिनिधी उपस्थित राहतील. तसेच देशाच्या विविध भागातील संत्रा उत्पादक संस्था व प्रक्रिया उद्योगांचे प्रतिनिधींना सुद्धा महोत्सवात निमंत्रित करण्यात आले आहे. संत्र्याचे ब्रॅण्डिंग आणि प्रमोशन करणे हा महोत्सवाचा उद्देश आहे. महोत्सवाच्या माध्यमातून पर्यटकांना आकर्षित करणे, तसेच संत्रा उत्पादक शेतकऱ्यांना उत्पादनासोबतच विक्री, व्यवस्थापनाची माहिती देण्यात येणार आहे. यासाठी आवश्यक तांत्रिक ज्ञान देण्यासाठी शेतकऱ्यांना निमंत्रित करण्यात येणार आहे. संत्रा उत्पादक शेतकऱ्यांसाठी स्वतंत्र कार्यशाळेचे आयोजन करण्यात येणार असून कृषी विभागामार्फत आवश्यक सुविधा उपलब्ध करून द्याव्यात, अशा सूचनाही पालकमंत्री चंद्रशेखर बावनकुळे यांनी दिल्या. संत्रा महोत्सवाच्या आयोजनासाठी सर्व विभागांचा समन्वय राहावा यासाठी जिल्हास्तरावर नोडल अधिकाऱ्यांची नियुक्ती करावी व आयोजनासाठी महानगरपालिकेसह सर्व विभागांनी सहकार्य करावे, अशा सूचना यावेळी देण्यात आल्या.
बैठकीला महापौर नंदा जिचकार, जिल्हाधिकारी अश्विन मुदगल, मनपाचे अप्पर आयुक्त रवींद्र ठाकरे, उपजिल्हाधिकारी रवींद्र कुंभारे, महाआॅरेंजचे श्रीधर ठाकरे, कृषी सहसंचालक रवींद्र भोसले, एमटीडीसीचे रिजनल मॅनेजर प्रशांत सवई, लोकमत समूहाचे उपाध्यक्ष अनिरुद्ध हजारे, लोकमतचे सहायक उपाध्यक्ष नीलेश सिंग, लोकमतचे निवासी संपादक गजानन जानभोर आदी उपस्थित होते. यावेळी अनिरुद्ध हजारे यांनी सादरीकरणाद्वारे महोत्सवाच्या विविध उपक्रमाविषयी माहिती दिली.

Web Title: Organized in January of the World Orange Festival

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.