संघटन कौशल्याने यशस्वी झाले सेवाग्राम मंथन : राहुल गांधींनी साऱ्यांनाच जिंकले

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: October 4, 2018 01:08 AM2018-10-04T01:08:50+5:302018-10-04T01:09:35+5:30

गेल्या चार वर्षांपासून भाजपाच्या प्राबल्यापुढे विदर्भात काँग्रेस कमजोर होते की काय असे कयास लावले जात असताना प्रदेशाध्यक्ष खा. अशोक चव्हाण यांनी मात्र संघटन बांधणीवर, कार्यकर्ते जोडण्यावर भर दिला. दर दुसऱ्या महिन्यात त्यांनी विदर्भातील कोणत्या ना कोणत्या जिल्ह्यात तळ ठोकून संघटन मजबूत करण्यावर भर दिला. त्याचेच फलित २ आॅक्टोबर रोजी वर्धा येथे झालेल्या काँग्रेस अध्यक्ष राहुल गांधी यांच्या सभेत दिसून आले. चव्हाण यांनी सेवाग्रामच्या काँग्रेस कार्यसमितीची बैठक व वर्धेच्या सभेसाठी केलेले नियोजन, त्यासाठी दिवसरात्र घेतलेले परिश्रम पाहून पदाधिकारी व कार्यकर्त्यांनाही ऊर्जा मिळाली व वर्धेची सभा काँग्रेस नेत्यांच्या अपेक्षेहूनही यशस्वी ठरली.

Organization skill successfull Sevagram Manthan: Rahul Gandhi won a whole lot of people | संघटन कौशल्याने यशस्वी झाले सेवाग्राम मंथन : राहुल गांधींनी साऱ्यांनाच जिंकले

संघटन कौशल्याने यशस्वी झाले सेवाग्राम मंथन : राहुल गांधींनी साऱ्यांनाच जिंकले

googlenewsNext
ठळक मुद्दे प्रदेशाध्यक्षांचे परिश्रम फळाला


लोकमत न्यूज नेटवर्क
नागपूर : गेल्या चार वर्षांपासून भाजपाच्या प्राबल्यापुढे विदर्भात काँग्रेस कमजोर होते की काय असे कयास लावले जात असताना प्रदेशाध्यक्ष खा. अशोक चव्हाण यांनी मात्र संघटन बांधणीवर, कार्यकर्ते जोडण्यावर भर दिला. दर दुसऱ्या महिन्यात त्यांनी विदर्भातील कोणत्या ना कोणत्या जिल्ह्यात तळ ठोकून संघटन मजबूत करण्यावर भर दिला. त्याचेच फलित २ आॅक्टोबर रोजी वर्धा येथे झालेल्या काँग्रेस अध्यक्ष राहुल गांधी यांच्या सभेत दिसून आले. चव्हाण यांनी सेवाग्रामच्या काँग्रेस कार्यसमितीची बैठक व वर्धेच्या सभेसाठी केलेले नियोजन, त्यासाठी दिवसरात्र घेतलेले परिश्रम पाहून पदाधिकारी व कार्यकर्त्यांनाही ऊर्जा मिळाली व वर्धेची सभा काँग्रेस नेत्यांच्या अपेक्षेहूनही यशस्वी ठरली.
आजवर विदर्भात काँग्रेसच्या एखाद दुसºया नेत्याची मोठी जाहीर सभा व्हायची. मात्र, राहुल गांधी, सोनिया गांधी, मनमोहन सिंग यांच्यासह ५०हून अधिक दिग्गज काँग्रेस नेते सेवाग्राम व वर्धा येथे एकत्र येण्याची ही अलीकडच्या काळातील पहिलीच वेळ होती. या भव्य सोहळ्याकडे काँग्रेससह सर्वच राजकीय पक्षांचे तसेच देशभरातील राजकीय तज्ज्ञांचे लक्ष लागले होते. त्यामुळे साहजिकच प्रदेशाध्यक्ष म्हणून खा. अशोक चव्हाण यांच्यावर अप्रत्यक्ष दबाव होता. मात्र, चव्हाण यांनी हे आव्हान स्वीकारत त्यात यशस्वी होण्याची रणनीती आखली. कार्यक्रमाच्या नियोजनासाठी चव्हाण गेल्या १५ दिवसांपासून दिवसाची रात्र करीत होते. नागपूर, वर्धा, सेवाग्राम येथे एकामागून एक बैठका घेत त्यांनी नेते, पदाधिकाºयांना एकत्र केले. वर्धा येथील सभेत काँग्रेसचे सर्वच गट सहभागी झाले. मात्र, राहुल गांधी यांच्या पदयात्रेत किंवा सभेत कुठलीही गटबाजी दिसली नाही. विदर्भातील ११ ही जिल्ह्यातील प्रमुख नेते, पदाधिकारी सभेला उपस्थित होते. कार्यकर्त्यांमध्येही जोश होता. हे अशोक चव्हाण यांचे यश मानावे लागेल.
३० सप्टेंबर रोजी रविवारी चव्हाण यांनी सकाळी नागपुरात देवडिया काँग्रेस भवनात बैठक घेतली. यानंतर ते थेट वर्धा येथे गेले. वर्धा, सेवाग्राम येथील स्थळांची पाहणी केली. त्यानंतर वर्धा येथे पदाधिकाऱ्यांची बैठक घेतली. याच वेळी त्यांनी महाराष्ट्र प्रभारी मल्लिकार्जुन खरगे यांच्यासह दिल्लीतून आलेल्या प्रमुख नेत्यांशीही चर्चा केली. यानंतर ते रात्रीच नागपुरातील निवडक पदाधिकाऱ्यांची बैठक घेण्यासाठी वर्धेहून निघाले. रात्री ११.३० वाजता नागपुरात पोहचले व रात्री १.३० पर्यंत बैठक घेतली. सोमवारी (१ आॅक्टोबर) सकाळी ८ वाजता पुन्हा ते सक्रिय झाले. प्रमुख नेत्यांच्या आगमनाची माहिती घेतली. स्थानिक पदाधिकाऱ्यांवर नेत्यांच्या स्वागताच्या जबाबदाऱ्या निश्चित केल्या. सोबत चंद्रपूर, गडचिरोली, भंडारा, गोंदिया या जिल्ह्यातील प्रमुख पदाधिकाऱ्यांची बैठक घेत त्यांच्याही जबाबदाऱ्या निश्चित केल्या. प्रत्येक नेत्याच्या आगमनावर तसेच एकूणच घडामोडींवर चव्हाण यांचे बारीक लक्ष होते. १ आॅक्टोबर रोजी दुपारी १ वाजताची रणदीप सुरजेवाला यांची पत्रकार परिषद आटोपून ते लगेच वर्धेला रवाना झाले. वर्धेतही त्यांनी पुन्हा एकदा प्रमुख नेते, पदाधिकाऱ्यांची बैठक घेतली. त्यांची ही अविरत काम करण्याची शैली कार्यकर्त्यांना प्रोत्साहित करणारी ठरली.

प्रत्येक जिल्ह्यातून जमली गर्दी
 राहुल गांधी यांच्या सभेसाठी वर्धा जिल्ह्यासह विदर्भातील इतर जिल्ह्यातूनही मोठ्या प्रमाणात नेते, पदाधिकारी व कार्यकर्ते यावे यासाठी चव्हाण यांनी जिल्हानिहाय नियोजन आखून दिले होते. तशा आवश्यक सूचनाही पदाधिकाऱ्यांना दिल्या होत्या. चव्हाण यांच्या कार्यप्रणालीची जाणीव असल्यामुळे पदाधिकाऱ्यांनीही त्यांचे निर्देश गांभीर्याने घेतले. याचाच परिणाम म्हणजे वर्धेच्या सभेला काँग्रेस नेत्यांच्या अपेक्षेच्या दुप्पट गर्दी जमली.

आग्रही भूमिका कामी आली
 सेवग्राम आश्रममध्ये बापु कुटीसमोर झालेली सर्वधर्मसमभाव प्रार्थना तसेच सर्व सेवा संघाच्या महादेव भवन येथे झालेल्या काँग्रेसच्या कार्यसमितीची बैठकीसाठीही चव्हाण यांनी आग्रही भूमिका घेतली होती. सेवाग्राम आश्रमाच्या पदाधिकाऱ्यांच्या चव्हाण यांनी स्वत: जाऊन भेटी घेतल्या व सातत्याने संपर्कातही होते. त्यामुळे सेवाग्राम आश्रमाकडूनही सहकार्य मिळाले.

Web Title: Organization skill successfull Sevagram Manthan: Rahul Gandhi won a whole lot of people

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.