रेल्वेच्या जनाहारला एक लाखाचा दंड : बालकांना निकृष्ट भोजन पुरविले

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: March 27, 2019 10:06 PM2019-03-27T22:06:10+5:302019-03-27T22:11:18+5:30

नागपूर रेल्वे स्थानकावरील जनाहार रेस्टॉरंटमधून मुलांना निकृष्ट दर्जाचे भोजन पुरविल्यामुळे मध्य रेल्वे नागपूर प्रशासनाने जनाहारवर एक लाखाचा दंड केला आहे. सोबतच जनाहारमध्ये ड्रेनेज लाईन फुटल्यामुळे ते काम पूर्ण होईपर्यंत जनाहार बंद ठेवण्याचे निर्देश दिले आहेत.

One lakh rupees fine on Janaahar of the Railways: Providing poor food to the children | रेल्वेच्या जनाहारला एक लाखाचा दंड : बालकांना निकृष्ट भोजन पुरविले

बालकांना निकृष्ट भोजन पुरविल्यामुळे रेल्वेच्या अधिकाऱ्यांनी जनाहारला १ लाख रुपये दंड केला. जनाहारमधील ड्रेनेज लाईन फुटल्यामुळे ती दुरुस्त होईपर्यत हे रेस्टॉरन्ट बंद ठेवण्याचे आदेश अधिकाऱ्यांनी दिले. त्यामुळे बुधवारी दिवसभर जनाहार बंद होते.

googlenewsNext
ठळक मुद्देड्रेनेजचे काम पूर्ण होईपर्यंत बंद ठेवण्याचे निर्देश

लोकमत न्यूज नेटवर्क
नागपूर : नागपूररेल्वे स्थानकावरील जनाहार रेस्टॉरंटमधून मुलांना निकृष्ट दर्जाचे भोजन पुरविल्यामुळे मध्य रेल्वे नागपूर प्रशासनाने जनाहारवर एक लाखाचा दंड केला आहे. सोबतच जनाहारमध्ये ड्रेनेज लाईन फुटल्यामुळे ते काम पूर्ण होईपर्यंत जनाहार बंद ठेवण्याचे निर्देश दिले आहेत.
मंगळवारी रेल्वे सुरक्षा दलाने बालमजुरांची तस्करी होत असल्यामुळे २६ बालकांना ताब्यात घेतले होते. या मुलांना आरपीएफच्या ठाण्यात आणल्यानंतर त्यांची चौकशी करताना ते उपाशी असल्याचे समजले. त्यांच्यासाठी प्लॅटफार्म क्रमांक १ वरील आयआरसीटीसीच्या जनाहारमधून भोजन मागविण्यात आले होते. परंतु दोन घास खाल्ल्यानंतर मुलांनी भोजनाकडे पाठ फिरविली. भोजन न करण्याचे कारण विचारले असता, त्यांनी त्यातून दुर्गंधी येत असल्याचे सांगितले. त्यानंतर रेल्वे सुरक्षा दलाच्या जवानांनी भोजनाची तपासणी केली असता, ते निकृष्ट दर्जाचे असल्याचे लक्षात आले. यामुळे जनाहार रेस्टॉरंटमधून प्रवाशांना निकृष्ट दर्जाचे भोजन पुरविण्यात येत असल्याचे स्पष्ट झाले. ही बाब मध्य रेल्वेच्या नागपूर विभागातील वाणिज्य विभागाने गंभीरतेने घेतली. बुधवारी जनाहार रेस्टॉरंटचे संचालन करणाऱ्या खासगी कंपनीला एक लाख रुपये दंड करण्यात आला. सोबतच भोजनाची दुर्गंधी येत असल्याचे कारण जाणून घेतले असता, जनाहारमधील ड्रेनेज लाईन फुटल्याचे आढळले. अशास्थितीत ड्रेनेज लाईनचे काम पूर्ण होईपर्यंत जनाहार बंद ठेवण्याचे निर्देश अधिकाऱ्यांनी दिले.
बाटलीबंद पाणी प्रकरणात अहवाल पाठविला
आयआरसीटीसीने दानापूर-सिकंदराबाद एक्स्प्रेसमध्ये वेगवेगळ्या कंपन्यांच्या बॉटलमध्ये साधे पाणी विकण्यात येत असल्याच्या तक्रारीवर कारवाई करीत, मंगळवारी या गाडीच्या पेन्ट्रीकारमधून पाण्याच्या बॉटलचे ७० बॉक्स जप्त केले होते. या प्रकरणात आयआरसीटीसीसह मध्य रेल्वेच्या वाणिज्य नियंत्रण कक्षाने अहवाल तयार केला आहे. हा अहवाल दक्षिण मध्य रेल्वे, सिकंदराबादला पाठविण्यात आला आहे. या अहवालाच्या आधारे दक्षिण पूर्व रेल्वे पेन्ट्रीकारच्या कंत्राटदारावर कारवाई करणार आहे.

 

Web Title: One lakh rupees fine on Janaahar of the Railways: Providing poor food to the children

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.