Now the shops in the entire state will continue throughout the week | आता संपूर्ण राज्यातील दुकाने आठवडाभर सुरू राहणार

ठळक मुद्देकामगारांना एक दिवस साप्ताहिक सुटी देणे बंधनकारक


आॅनलाईन लोकमत

नागपूर : महाराष्ट्र दुकाने व आस्थापना (नोकरीचे व सेवाशर्तीचे विनियमन) अधिनियम १९ डिसेंबरपासून संपूर्ण राज्यात लागू करण्यात आला आहे. त्यामुळे दुकाने व आस्थापनांना आठवडाभर व्यवसाय करण्याची मुभा देण्यात आली आहे. मात्र, तेथील कामगारांना आठवड्यातून एक दिवस साप्ताहिक सुटी देणे बंधनकारक राहणार आहे. लघु व छोट्या उद्योजकांना याचा फायदा होणार आहे.
अधिनियमांतर्गत १० पेक्षा कमी कामगार असणाऱ्या आणि लघु व छोट्या आस्थापनांना नोंदणी करण्याची आवश्यकता नाही. त्या ऐवजी त्यांनी व्यवसाय सुरू केल्याबाबत केवळ विहित कागदपत्रासंह व्यवसाय सुरू केल्याची आॅनलाईन सूचना द्यायची आहे. त्या अर्जाची पोहोच पावती आॅनलाईन उपलब्ध होईल.
माहिती व तंत्रज्ञान क्षेत्रात होणाऱ्या प्रगतीमुळे आॅनलाईन व्यवसाय २४ तास कार्यरत असतात. त्यामुळे आॅफलाईन व्यवसाय करणाऱ्या  व्यावसायिकांना त्यांच्याशी सकारात्मक स्पर्धा करता यावी म्हणून हा अधिनियम लागू करण्यात आला आहे.


Get Latest Marathi News & Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and local news from all cities of Maharashtra.