आरोपी अरविंद सिंगच्या घरून काहीही जप्त झाले नाही

By Admin | Published: August 7, 2015 02:36 AM2015-08-07T02:36:41+5:302015-08-07T02:36:41+5:30

आरोपी अरविंद सिंग याचे घर ३ सप्टेंबर २०१४ पासून कुलूपबंद होते. त्याच्या घरून काहीही जप्त करण्यात आले नव्हते, ...

Nothing was recovered from the house of accused Arvind Singh | आरोपी अरविंद सिंगच्या घरून काहीही जप्त झाले नाही

आरोपी अरविंद सिंगच्या घरून काहीही जप्त झाले नाही

googlenewsNext

तीन बचाव साक्षीदारांची साक्ष
नागपूर : आरोपी अरविंद सिंग याचे घर ३ सप्टेंबर २०१४ पासून कुलूपबंद होते. त्याच्या घरून काहीही जप्त करण्यात आले नव्हते, अशी साक्ष बचाव पक्षाच्या तीन साक्षीदारांनी प्रमुख जिल्हा व सत्र न्यायाधीश किशोर सोनवणे यांच्या न्यायालयात युग चांडक अपहरण -खून खटल्याच्या सुनावणी दरम्यान दिली.
या तीन साक्षीदारांपैकी हरिभाऊ डहाके हे निवृत्त पोलीस अधिकारी आहेत. घटनेच्या वेळी अरविंद सिंग हा त्यांच्या नारा रोड ओमनगर येथील घरी भाड्याने राहत होता. कुसुम चंदेल ही दुसरी साक्षीदार अरविंदच्या शेजारी राहत होती तर तिसरा साक्षीदार अभिलाषसिंग हा अरविंदचा वडील आहे. गुरुवारी एकूण चार साक्षीदार तपासण्यात आले. चौथे साक्षीदार त्र्यंबक पाटणसावंगीकर हे शिकवणी वर्गाचे शिक्षक आहेत. त्यांनी आपल्या साक्षीत सांगितले की, अरविंद सिंग याने आपणाकडे वाणिज्य विषयाची शिकवणी लावली होती. घटनेच्या वेळी दोन्ही दिवस सायंकाळी वर्गात उपस्थित होता. २ सप्टेंबर २०१४ रोजी पोलिसांनी त्याला वर्गातून अटक केली होती, असेही त्यांनी साक्षीत सांगितले. या सर्व साक्षीदारांनी सरकारी वकिलाने उलटतपासणी घेतली.
न्यायालयात सरकारच्या वतीने अतिरिक्त सरकारी वकील ज्योती वजानी, फिर्यादी डॉ. मुकेश चांडक यांचे वकील अ‍ॅड. राजेंद्र डागा, अ‍ॅड. मनोज दुल्लरवार, आरोपींच्या वतीने अ‍ॅड. मनमोहन उपाध्याय, अ‍ॅड. प्रदीप अग्रवाल, अ‍ॅड. राजेश्री वासनिक यांनी काम पाहिले. (प्रतिनिधी)

Web Title: Nothing was recovered from the house of accused Arvind Singh

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.