भाजपाचा विजय रथ कुणीही रोखू शकत नाही

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: March 17, 2018 09:14 PM2018-03-17T21:14:01+5:302018-03-17T21:17:23+5:30

भाजपाने या पाच वर्षात जेवढे विजय मिळविले तेवढे विजय गेल्या ७० वर्षात कुणालाही मिळविता आले नाहीत. माजी पंतप्रधान इंदिरा गांधी यांच्या काळातही ते शक्य झाले नाही. भाजपाने ८० टक्के निवडणुका जिंकून विक्रम केला आहे. अशात एखादी पोटनिवडणूक हरलो म्हणून भाजपाची हवा उतरली असे होत नाही. कार्यकर्त्यांनो आत्मविश्वास ठेवा. भाजपाचा विजयरथ कुणीही रोखू शकत नाही, अशा शब्दात मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी पक्षाच्या पदाधिकारी व कार्यकर्त्यांमध्ये आत्मविश्वास भरला.

Nobody can chase the victory of the BJP chariot | भाजपाचा विजय रथ कुणीही रोखू शकत नाही

भाजपाचा विजय रथ कुणीही रोखू शकत नाही

Next
ठळक मुद्देमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांचा दावा : एखादी पोटनिवडणूक हरल्याने फरक पडत नाही

लोकमत न्यूज नेटवर्क 
नागपूर : भाजपाने या पाच वर्षात जेवढे विजय मिळविले तेवढे विजय गेल्या ७० वर्षात कुणालाही मिळविता आले नाहीत. माजी पंतप्रधान इंदिरा गांधी यांच्या काळातही ते शक्य झाले नाही. भाजपाने ८० टक्के निवडणुका जिंकून विक्रम केला आहे. अशात एखादी पोटनिवडणूक हरलो म्हणून भाजपाची हवा उतरली असे होत नाही. कार्यकर्त्यांनो आत्मविश्वास ठेवा. भाजपाचा विजयरथ कुणीही रोखू शकत नाही, अशा शब्दात मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी पक्षाच्या पदाधिकारी व कार्यकर्त्यांमध्ये आत्मविश्वास भरला.
भाजपाच्या स्थापना दिनानिमित्त ६ एप्रिल रोजी मुंबई येथे पक्षाचा महामेळावा आयोजित करण्यात आला आहे. या मेळाव्याच्या तयारीसाठी शनिवारी देशपांडे सभागृहात पूर्व विदर्भातील पदाधिकारी व कार्यकर्त्यांचा मेळावा घेण्यात आला. यावेळी खासदार अशोक नेते, रामदास तडस, डॉ. विकास महात्मे, आमदार सुधाकरराव देशमुख, सुधाकर कोहळे, अनिल सोले, डॉ. परिणय फुके, विकास कुंभारे, कृष्णा खोपडे, डॉ. मिलिंद माने यांच्यासह लोकप्रतिनिधी, पदाधिकारी व प्रमुख कार्यकर्ते उपस्थित होते. मेळाव्याच्या समारोपात मुख्यमंत्री फडणवीस म्हणाले, मध्यप्रदेश विधानसभेच्या पोटनिवडणुकीत दोन जागा हरलो. त्या जागा भाजपाच्या नव्हत्याच. त्यावेळी विरोधी वातावरण निर्माण करण्याचा प्रयत्न झाला. मात्र, ज्या त्रिपुरामध्ये ९० टक्के लोक ख्रिश्चन आहेत, तेथे भाजपाने लाल बावटाची २५ वर्षांची सत्ता उलथून फेकली. दोन वर्षांपूर्वी त्रिपुरामध्ये अमित शहांच्या स्वागतासाठी विमानतळावर सहा लोक अले होते. तेथे परिश्रम घेतल्याने कमळ फुलले. मात्र, उत्तर प्रदेशात लोकसभेच्या दोन जागा हरताच पुन्हा चर्चा सुरू झाली. तेथे बसपा व सपा एकत्र आल्याने अनपेक्षित निकाल आला.पण चिंतेचे कारण नाही. त्याच गोरखपूरमध्ये भाजपाचा महापौरही जिंकला आहे, असे सांगत त्यांनी कार्यकर्त्यांमध्ये आत्मविश्वास भरला.
राज्यात आपण नगर परिषदांपासून ते ग्राम पंचायतीपर्यंत जिंकलो आहोत. राज्यात भाजपाचे नगरसेवक २७२ वरून २००० झाले आहेत. जिल्हा परिषद व पंचायत समितीमध्ये १२०० सदस्य झाले आहेत. थेट सरपंचाच्या निवडणुकीत भाजपाचे तब्बल १० हजार सरपंच विजयी झाले आहेत. मुळात आपण या यशाचा उत्सवच साजरा केला नाही. त्यामुळे अधूनमधून होणारा एखादा पराभव चिंतेचे वातावरण निर्माण करतो. आता पक्षाच्या स्थापना दिनी मुंबईत उत्सव साजरा करू. महामेळाव्यात गर्दी करून असे विराट दर्शन घडवा की ते पाहून कार्यकर्ते आपोआप कामाला लागतील, असेही त्यांनी सांगितले. राज्यात ९७ हजार पैकी ८४ हजार बूथ स्थापन करण्यात आले आहेत व यापैकी ८१ हजार बूथची पडताळणी पूर्ण झाली आहे. राज्यात पक्षाचे एवढे मोठे संघटन उभारण्यात आले आहे. स्थापना दिवसासाठी प्रत्येक जिल्ह्याने पाच हजार कार्यकर्ते आणण्याचे टार्गेट स्वीकारले आहे. खरे तर हा आकडा कमीच आहे. जेव्हा कुठलीही व्यवस्था नव्हती तेव्हा देखील भाजपाने लाखोंचे मोर्चे काढले आहेत. त्यामुळे आता प्रत्येक बूथवरून किमान १० लोक यावेत, तेव्हाच मुंबईत विराट दर्शन घडेल, असेही मुख्यमंत्री म्हणाले.

Web Title: Nobody can chase the victory of the BJP chariot

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.