नो मेनू, नो कूक

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: September 22, 2017 01:40 AM2017-09-22T01:40:28+5:302017-09-22T01:40:43+5:30

राष्ट्रपती रामनाथ कोविंद आज, शुक्रवारी नागपुरात येत आहेत. राष्ट्रपतींचा दौरा म्हटले की राजभवनात त्यांच्या निवासापासून तर भोजनापर्यंतची विशेष व्यवस्था केली जाते.

No menu, no cook | नो मेनू, नो कूक

नो मेनू, नो कूक

Next
ठळक मुद्देराष्ट्रपती कोविंद घेणार साधे भोजन : वरण, भात, भाजी, पोळीचा समावेश

लोकमत न्यूज नेटवर्क
नागपूर : राष्ट्रपती रामनाथ कोविंद आज, शुक्रवारी नागपुरात येत आहेत. राष्ट्रपतींचा दौरा म्हटले की राजभवनात त्यांच्या निवासापासून तर भोजनापर्यंतची विशेष व्यवस्था केली जाते. यावेळी मात्र, राष्ट्रपती कोविंद यांचा मुक्काम अगदी साधेपणाचा असणार आहे. राष्ट्रपतींच्या भोजनासाठी कुठल्याही मेनूची यादी त्यांच्या कार्यालयाने पाठविलेली नाही. दिल्लीहून त्यांचा विशेष कूकही येणार नाही. वरण, भात, भाजी, पोळी असे साधे जेवण राष्ट्रपती घेणार आहेत.
राष्ट्रपतींच्या दौºयासाठी पोलीस बंदोबस्त, सुरक्षा व्यवस्था सर्वत्र कडेकोट असते. राष्ट्रपती हे सर्वोच्च संवैधानिक पद असल्यामुळे राजशिष्टाचाराच्या बºयाच गोष्टी त्यात असतात. विशेषत: राष्ट्रपती जेथे थांबणार, जेवण करणार त्या गोष्टींबाबत प्रशासन दक्ष असते. त्याची विशेष काळजी घेतली जाते. राष्ट्रपती कोविंद हे २२ सप्टेंबर रोजी पहिल्यांदाच नागपुरात येत असल्यामुळे या गोष्टी स्वाभाविकपणे येणारच. परंतु, राष्ट्रपतींच्या या दौºयाकरिता त्यांचे येथील अधिकृत निवासस्थान असलेल्या राजभवनात तीन दिवसांपूर्वी निरोप आला आणि साºयांनाच आश्चर्याचा सुखद धक्का बसला. एरव्ही राष्ट्रपतींच्या दौºयात त्यांचा विशेष खानसामा असतो. कोविंद यांनी त्या प्रथेलाही फाटा दिला. तुम्ही जे बनवाल तेच राष्ट्रपतींना चालेल. तिखट, तेलकट, तुपकट नाही. एवढीच माफक अपेक्षा राष्ट्रपती भवनातून राजभवनला आलेल्या दिशानिर्देशात व्यक्त केली आहे. राष्ट्रपती राजभवनात दुपारी २.३० नंतर येतील. तेथेच भोजन घेतील. त्यानंततर अर्धा तास विश्रांती घेतील व नंतर अर्धा तास नागरिकांना भेटतील.
दिल्लीहून येणाºया ताफ्यातही कपात
राष्ट्रपतींचा दौरा असला की ५० अधिकारी, कर्मचाºयांचा ताफा दिल्लीहून येतो. यात डॉक्टर, स्वीय सहायक, कार्यालयीन कर्मचाºयांचा समावेश असतो. मात्र, यावेळी फक्त २३ कर्मचारी येत आहेत.
 

Web Title: No menu, no cook

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.