नक्षली साहित्य सापडले म्हणून कारवाई नाही : मुख्यमंत्र्यांनी गज्वी यांना केले आश्वस्त

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: February 23, 2019 09:32 PM2019-02-23T21:32:43+5:302019-02-23T23:08:02+5:30

कुणा कडेही नक्षलवादाचं साहित्य सापडलं तर अटक करण्याची आवश्यकता नाही, अशी अटक करायची वेळ आलीच तर सर्वप्रथम मलाच करावी लागेल, कारण मी सुद्धा तसे साहित्य वाचलेले आहे. परंतु ज्यावेळी देशविरोधी कृत्याचे पुरावे मिळतील तर त्याच्यावर कारवाई करण हे आपले राष्ट्रीय कर्तव्य आहे. भारतीय संविधानाने ते अधिकार दिलेले आहे. कुठल्याही परिस्थितीत हे सरकार संविधानाच्या विरोधात जाऊन काम करणार नाही. स्वत:च्या वैयक्तिक स्वार्थासाठी किंवा विचारासाठी संविधानाच्या विरोधात काम करणार नाही, असे आश्वासन देत मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी शनिवारी मराठी नाट्य संमेलनाचे अध्यक्ष प्रेमानंद गज्वी यांना आश्वस्त केले.

No action was taken as naxalite material was found: CM assured that Gajvi | नक्षली साहित्य सापडले म्हणून कारवाई नाही : मुख्यमंत्र्यांनी गज्वी यांना केले आश्वस्त

नक्षली साहित्य सापडले म्हणून कारवाई नाही : मुख्यमंत्र्यांनी गज्वी यांना केले आश्वस्त

Next
ठळक मुद्देमात्र देशविरोधी कृत्याचे पुरावे मिळाल्यास कारवाई

लोकमत न्यूज नेटवर्क
नागपूर : कुणा कडेही नक्षलवादाचं साहित्य सापडलं तर अटक करण्याची आवश्यकता नाही, अशी अटक करायची वेळ आलीच तर सर्वप्रथम मलाच करावी लागेल, कारण मी सुद्धा तसे साहित्य वाचलेले आहे. परंतु ज्यावेळी देशविरोधी कृत्याचे पुरावे मिळतील तर त्याच्यावर कारवाई करण हे आपले राष्ट्रीय कर्तव्य आहे. भारतीय संविधानाने ते अधिकार दिलेले आहे. कुठल्याही परिस्थितीत हे सरकार संविधानाच्या विरोधात जाऊन काम करणार नाही. स्वत:च्या वैयक्तिक स्वार्थासाठी किंवा विचारासाठी संविधानाच्या विरोधात काम करणार नाही, असे आश्वासन देत मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी शनिवारी मराठी नाट्य संमेलनाचे अध्यक्ष प्रेमानंद गज्वी यांना आश्वस्त केले.
९९ व्या अखिल भारतीय मराठी नाट्य संमेलनाच्या दुसऱ्या दिवशी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी भेट दिली. रेशिमबाग मैदानावरील राम गणेश गडकरी नाट्य नगरी येथे आयोजित कार्यक्रमात ते बोलत होते. यावेळी केंद्रीय सामाजिक न्याय राज्यमंत्री रामदास आठवले, अ.भा. मराठी नाट्य संमेलनाचे अध्यक्ष प्रेमानंद गज्वी, नाट्य परिषदेचे अध्यक्ष प्रसाद कांबळी, माजी संमेलनाध्यक्षा कीर्ती शिलेदार, प्रफुल्ल फरकासे उपस्थित होते.
मुख्यमंत्री फडणवीस म्हणाले, अभिव्यक्तीच्या स्वातंत्र्यावर सातत्याने चर्चा होते. ती चर्चा होत राहावी. या देशाच्या मुळ रक्तातच सहिष्णुता आहे. या देशाच्या रक्तातून सहिष्णुता कुणीही काढू शकत नाही. सहिष्णुता हा आमचा विचार आहे. आचार आहे. जगाचा पाठीवर इतका सहिष्णू देश ज्यांच्यावर इतकी आक्रमणे झाली. ती आम्ही पचवले. त्यांना आमच्या संस्कृतीत सामाहून घेतले. जगाच्या पाठीवरून ज्यांना हाकलल्यात आले. त्यांना आम्ही स्थान दिले. जगाने ज्यांना बहिष्कृत केले त्यांनाही सामाहून घेण्याची आमची संस्कृती आहे. त्यामुळे म्हणून अभिव्यक्ती स्वातंत्र्याची फार काळजी करण्याची आवश्यकता नाही. या देशामध्ये एकदाच १९७५ साली अभिव्यक्ती च्या स्वातंत्र्यावर हल्ला करण्याचा प्रयत्न झाला. त्यावेळी देशाने इतक्या जोरात त्याला प्रत्युत्तर दिलं. त्यावेळी सर्वात बलाढ्य शक्ती देखील उलथवून टाकण्याच काम या देशातील लोकांनी केलं. मराठी भूमीने नाट्यपरंपरा ज्याप्रमाणे जोपासली ती वाखाणण्याजोगी आहे. कालांतराने काही कला लुप्त होतात. परंतु मराठी रंगकर्मी आणि मराठी रसिकप्रेमींनी मराठी रंगभूमीचा प्रभाव कुठेही कमी होऊ दिला नाही. उलट ती समृद्ध केली. विदर्भाची भूमी ही नाट्यपरंपरेला नेहमीच दाद देणारी भूमी आहे. असे सांगतात की, पूर्वीच्या काळी जेव्हा जेव्हा एखादे नाटक मंडळ आर्थिक डबघाईस यायचे त्या-त्या वेळी ते विदर्भाच्या दौºयावर यायचे. विदर्भाने त्यांना भरभरून दिले आहे आणि ही भूक आजही कायम असल्याचे मुख्यमंत्री म्हणाले. 
 १०० व्या संमेलनाचे जाहीर निमंत्रण
 यावेळी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी पुढच्या वर्षीच्या अ.भा. मराठी नाट्य संमेलनाचे जाहीर निमंत्रणही देऊन टाकले. ते म्हणाले, नाट्य संमेलन कोणत्या शहरात घ्यायचे हा आपला अधिकार आहे, परंतु १०० व्या अ.भा. मराठी नाट्य संमेलन नागपुरात घ्यायचे असल्यास आपले स्वागत करायला आम्ही तयार आहोत. 

Web Title: No action was taken as naxalite material was found: CM assured that Gajvi

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.