नवीन सीएंनी अद्ययावत राहावे

By admin | Published: February 12, 2016 03:26 AM2016-02-12T03:26:59+5:302016-02-12T03:26:59+5:30

ज्ञान आणि कामाच्या संदर्भात नवीन सीएंनी स्वत:ला निरंतर अद्ययावत ठेवण्याची गरज आहे. याशिवाय संस्थेतील वरिष्ठ सहकाऱ्यांच्या अनुभवापासून शिकण्यासाठी त्यांनी तत्पर राहावे,

New Ceyonce | नवीन सीएंनी अद्ययावत राहावे

नवीन सीएंनी अद्ययावत राहावे

Next

नितीन खारा यांचे आवाहन : सीएंसाठी माहितीपर कार्यक्रम
नागपूर : ज्ञान आणि कामाच्या संदर्भात नवीन सीएंनी स्वत:ला निरंतर अद्ययावत ठेवण्याची गरज आहे. याशिवाय संस्थेतील वरिष्ठ सहकाऱ्यांच्या अनुभवापासून शिकण्यासाठी त्यांनी तत्पर राहावे, असे आवाहन कॉन्फिडेन्स समूहाचे चेअरमन नितीन खारा यांनी येथे केले.
कॅम्पस ओरिएन्टेड कार्यक्रमाचे आयोजन द इन्स्टिट्यूट आॅफ चार्टर्ड अकाऊंटंट आॅफ इंडियाच्या इंडस्ट्रीमध्ये असलेल्या सदस्यांच्या समितीच्या वतीने आणि आयसीएआयच्या नागपूर सीए संस्थेच्या सहकार्याने नुकतेच करण्यात आले. चार्टर्ड अकाऊंटंटची निष्ठा, समर्पण आणि जबाबदारीमुळे कोणत्याही कंपनीचा विकास वेगाने होऊ शकतो, असे खारा यांनी स्पष्ट केले.
यावेळी नागपूर सीए संस्थेच्या अध्यक्षा कीर्ती अग्रवाल, आरसीएम जुल्फेश शाह, अभय अग्रवाल, एसएमएस एन्व्होकेअर लि.चे हेमंत लोढा, सुप्रिया पॅकेजिंगचे व्यवस्थापकीय संचालक सुरेश राठी आणि गिरीश देवधर यांच्यासह संस्थेचे माजी अध्यक्ष स्वप्नील अग्रवाल, सचिव संदीप जोतवानी उपस्थित होते. कीर्ती अग्रवाल म्हणाल्या, सीए कोर्सचे प्रशिक्षण आणि तांत्रिक ज्ञान युवा सीएंना अधिक सक्षम बनविते. नवीन सीएंनी कार्यरत असलेल्या कंपनीप्रति एकनिष्ठ असावे. व्यवसाय सांभाळायचा की वैयक्तिक विकास साधायचा, असे पर्याय त्यांच्यासमोर आहेत. आर्थिक विकासात नवीन सदस्यांनी नेहमीच तत्पर आणि अद्ययावत राहावे. जुल्फेश शाह म्हणाले, नवीन सदस्यांना कॉर्पोरेट क्षेत्रात प्रचंड संधी असून, त्यांनी यशासाठी एका कंपनीत जास्त काळ काम करावे आणि अनुभव प्राप्त करावा.
प्रारंभी स्वप्नील अग्रवाल यांनी कार्यक्रमाची माहिती दिली. संदीप जोतवानी यांनी आभार मानले. यावेळी स्वप्नील घाटे, उमंग अग्रवाल, सुरेन दुरगकर, किरीट कल्याणी, संजय अग्रवाल, साकेट बागडिया, जितेन सागलानी आणि १२० पेक्षा जास्त युवा सीए उपस्थित होते.(प्रतिनिधी)

Web Title: New Ceyonce

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.