नागपूरच्या मानकापूर उड्डाण पुलाला तुकडोजी महाराजांचे नाव

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: June 14, 2018 11:26 PM2018-06-14T23:26:56+5:302018-06-14T23:27:10+5:30

राष्ट्रसंत तुकडोजी महाराजांचे विचार समाजाला दिशा देणारे असून त्यांचे नाव मानकापूर उड्डाण पुलाला देण्याची मागणी स्वागतार्ह आहे. त्यामुळे आजच या उड्डाण पुलाला त्यांच्या नावाची पाटी लावा, अशी सूचना केंद्रीय भुपृष्ठ वाहतूक व जहाजबांधणी मंत्री नितीन गडकरी यांनी केली.

The name of Tukdoji Maharaj of Mankapur flyover in Nagpur | नागपूरच्या मानकापूर उड्डाण पुलाला तुकडोजी महाराजांचे नाव

नागपूरच्या मानकापूर उड्डाण पुलाला तुकडोजी महाराजांचे नाव

Next
ठळक मुद्देनितीन गडकरींची घोषणा : झिंगाबाई टाकळीत सिमेंट रस्त्याच्या बांधकामाचे भूमिपूजन


लोकमत न्यूज नेटवर्क
नागपूर : राष्ट्रसंत तुकडोजी महाराजांचे विचार समाजाला दिशा देणारे असून त्यांचे नाव मानकापूर उड्डाण पुलाला देण्याची मागणी स्वागतार्ह आहे. त्यामुळे आजच या उड्डाण पुलाला त्यांच्या नावाची पाटी लावा, अशी सूचना केंद्रीय भुपृष्ठ वाहतूक व जहाजबांधणी मंत्री नितीन गडकरी यांनी केली.
केंद्रीय मार्ग निधी अंतर्गत नागपूर जिल्हा व तालुक्यातील झिंगाबाई टाकळी, गोधनी (रेल्वे) बोकारा ते कोराडी रस्ता (राज्य महामार्ग ६९) सिमेंटकॉँक्रिट रस्त्याच्या बांधकामाचे भूमिपूजन प्रसंगी झिंगाबाई टाकळीच्या पांडुरंग सभागृहात ते बोलत होते. अध्यक्षस्थानी ऊर्जा तथा पालकमंत्री चंद्रशेखर बावनकुळे होते. व्यासपीठावर आ. सुधाकर देशमुख, आ. समीर मेघे, आ. जोगेंद्र कवाडे, आ. सुधाकर कोहळे, नगरसेवक आणि नासुप्रचे विश्वस्त भूषण शिंगणे, नगरसेवक संदीप जाधव, संगीता गिºहे, अर्चना पाठक उपस्थित होत्या. या वेळी गडकरी म्हणाले, शहरातील मुलांना शिक्षण, क्रीडांगण आणि सांस्कृतिक कार्यासाठी संधी मिळणे आवश्यक असून नागपुरात सर्व प्रकारच्या सोयीसुविधा उपलब्ध करून देण्यात येत आहेत. काटोल-वर्धा, भंडारा, कोराडी, सावनेर-वर्धा अशी ब्रॉडगेज मेट्रो चालविण्यात येणार असून यामुळे गोधनीवरून १० मिनिटात नागपूर, अजनी रेल्वेस्थानकावर पोहोचता येईल. २०२२ पर्यंत ५० हजार जणांना घरे देण्याची योजना असून यात ४०७ फुटांच्या घरात डबल बेड पलंग, पंखा, एलईडी लाईट आणि सोलर सिस्टीम मोफत देण्यात येईल. तेलंखेडी गार्डनमध्ये म्युझिकल फाऊंटेन सुरु करणार असून त्यासाठीचे फाऊंटेन फ्रान्स, पॅरिसवरून आणण्यात आले आहेत. रेल्वेस्थानकासमोरील उड्डाण पूल तोडून जयस्तंभ चौकातील वाहतुकीची कोंडी दूर करण्यात येईल. शहरात ३५० खेळाची मैदाने विकसित करण्यात येतील. प्रत्येक मतदार संघातील उद्यानात ज्येष्ठ नागरिकांसाठी विरंगुळा करण्याची योजना आहे. बेरोजगारांना ५ वर्षात ५० हजार रोजगार पुरविण्याची योजना असल्याची माहिती त्यांनी यावेळी दिली. पालकमंत्री बावनकुळे यांनी १२ मिनिटात विमानतळावर पोहोचता येईल, असा रस्ता गडकरींमुळे मिळाल्याचे सांगून अन्न न मिळणाऱ्या २.९० लाख परिवारांना अन्न पुरविण्याची तसेच नाल्यावरील सर्वांना घरे मिळणार असल्याची माहिती दिली. आ. देशमुख यांनी पश्चिम नागपूर मतदार संघातील विकासकामांसाठी गडकरींनी २ हजार कोटी तर नागपूरला ५६ हजार कोटी दिल्याचे सांगितले. प्रास्ताविक कार्यकारी अभियंता जनार्धन भानुसे यांनी केले.

असा राहील रस्ता
झिंगाबाई टाकळी-गोधणी (रेल्वे)
बोकारा ते कोराडी सिमेंट काँक्रिट रस्ता
कंत्राटदाराचे नाव : जेपीई ऊर्जा इन्फ्रा.
कामाची किंमत : ३५.७४ कोटी
सिमेंट रस्त्याची लांबी : ४ किलोमिटर
डांबरी रस्त्याची दोन्ही बाजूची लांबी : ४ किलोमिटर
रस्त्याच्या दोन्ही बाजूला सिमेंट काँक्रिट नालीची लांबी : ४ किलोमिटर
सेवा वाहिन्यांची दोन्ही बाजूची लांबी : ४ किलोमिटर

Web Title: The name of Tukdoji Maharaj of Mankapur flyover in Nagpur

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.