नागपूरचे शुद्धोदन सांभाळणार दिल्लीतील डॉ. आंबेडकर इंटरनॅशनल सेंटर

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: April 13, 2019 09:04 PM2019-04-13T21:04:34+5:302019-04-13T21:06:47+5:30

डॉ. बाबासाहेब आंबेडकर इंटरनॅशनल सेंटरच्या उपक्युरेटरपदी शुद्धोदन वानखेडे यांची नेमणूक करण्यात आली आहे. ते मूळचे नागपूरचे आहेत. केंद्रीय सामाजिक न्याय व अधिकारिता मंत्रालयाच्या डॉ.आंबेडकर फाऊंडेशनअंतर्गत येथील १५ जनपथ रोडवर उभारण्यात आलेल्या भव्य डॉ. आंबेडकर इंटरनॅशनल सेंटरच्या उपक्युरेटरपदी वानखेडे यांची प्रतिनीयुक्ती तत्त्वावर नेमणूक करण्यात आली आहे.

Nagpur's Shudhodan will take care Delhi's Ambedkar International Center | नागपूरचे शुद्धोदन सांभाळणार दिल्लीतील डॉ. आंबेडकर इंटरनॅशनल सेंटर

नागपूरचे शुद्धोदन सांभाळणार दिल्लीतील डॉ. आंबेडकर इंटरनॅशनल सेंटर

Next
ठळक मुद्देउपक्युरेटरपदी शुद्धोदन वानखेडे यांची नियुक्ती

लोकमत न्यूज नेटवर्क
नागपूर : डॉ. बाबासाहेब आंबेडकर इंटरनॅशनल सेंटरच्या उपक्युरेटरपदी शुद्धोदन वानखेडे यांची नेमणूक करण्यात आली आहे. ते मूळचे नागपूरचे आहेत. केंद्रीय सामाजिक न्याय व अधिकारिता मंत्रालयाच्या डॉ.आंबेडकर फाऊंडेशनअंतर्गत येथील १५ जनपथ रोडवर उभारण्यात आलेल्या भव्य डॉ. आंबेडकर इंटरनॅशनल सेंटरच्या उपक्युरेटरपदी वानखेडे यांची प्रतिनीयुक्ती तत्त्वावर नेमणूक करण्यात आली आहे.
वानखेडे हे केंद्रीय आदिवासी विकास मंत्रालयात १९९१ पासून आर्टिस्ट पदावर कार्यरत आहेत. त्यांनी नागपूर येथील शासकीय चित्रकला महाविद्यालयातून चित्रकलेची पदवी संपादन केली आहे. पुढे मध्य प्रदेशातील नरसिंहपूर जिल्ह्यातील योहानी येथील नवोदय विद्यालयात चित्रकला शिक्षक म्हणून ते कार्यरत होते. आदिवासी विकास मंत्रालयाच्यावतीने आयोजित राष्ट्रीय व आंतरराष्ट्रीय कार्यशाळांमध्ये सहभाग घेतला आहे.
वानखेडे हे विविध निमंत्रण पत्राचे डिझाईन करतात, वृत्तपत्रांमध्येही त्यांनी विविध कलात्मक कामे केली आहेत. त्यांनी तयार केलेले माजी राष्ट्रपती के. आर. नारायणन यांच्यावरील ‘मॅन आॅफ द मिलेनियम’ हे कॅरीकेचर विशेष गाजले होते. ‘अजिंठा भित्तीचित्रातील अलंकारिक रेषा’ या विषयांवर त्यांनी लघुशोध प्रबंध सादर केला आहे. दिल्लीस्थित आॅल इंडिया सिद्धार्थ वेल्फेअर सोसायटीचे सामाजिक सचिव म्हणूनही त्यांनी जबाबदारी सांभाळली आहे.

Web Title: Nagpur's Shudhodan will take care Delhi's Ambedkar International Center

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.