नागपूरच्या ज्योती पटेलांची इंडिया गेट ते गेट वे आॅफ इंडिया मोहिम फत्ते

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: January 9, 2018 10:23 AM2018-01-09T10:23:26+5:302018-01-09T10:23:45+5:30

स्थानिक प्रतिभावान सायकलपटू ज्योती पटेल यांनी आपल्या कामगिरीने आणखी एक मानाचा तुरा शिरपेचात रोवला आहे. जीटूजी मोहिमेअंर्तगत ज्योती यांनी दिल्लीतील इंडिया गेट ते मुंबईतील गेट वे आॅफ इंडिया असा १४६० किमी सायकल प्रवास सहा दिवसांत पूर्ण केला.

Nagpur's Jyoti Patel's India Gate to Get Way of the India Campaign successful | नागपूरच्या ज्योती पटेलांची इंडिया गेट ते गेट वे आॅफ इंडिया मोहिम फत्ते

नागपूरच्या ज्योती पटेलांची इंडिया गेट ते गेट वे आॅफ इंडिया मोहिम फत्ते

googlenewsNext
ठळक मुद्देसहा दिवसांत १४६० किमी सायकल प्रवास

लोकमत न्यूज नेटवर्क
नागपूर : स्थानिक प्रतिभावान सायकलपटू ज्योती पटेल यांनी आपल्या कामगिरीने आणखी एक मानाचा तुरा शिरपेचात रोवला आहे. जीटूजी मोहिमेअंर्तगत ज्योती यांनी दिल्लीतील इंडिया गेट ते मुंबईतील गेट वे आॅफ इंडिया असा १४६० किमी सायकल प्रवास सहा दिवसांत पूर्ण केला.
३८ वर्षांच्या ज्योती व्यवसायाने इंटेरियर डिझायनर आहेत. मागच्यावर्षी १६ डिसेंबर रोजी मोहिमेला दिल्लीतून सुरुवात केल्यानंतर सहाव्या दिवशी त्यांनी मुंबई गाठली. या प्रवासात त्यांच्यासमवेत अन्य पाच महिला सायकलपटू होत्या. दररोज त्यांनी २५० किमी सायकल प्रवास केला. या कालावधीत जयपूर, भीलवाडा, खेरवडा (राजस्थान), बडोदा (गुजरात), तालश्री (महाराष्ट्र) येथे रात्रीचा मुक्काम केला. २१ डिसेंबर रोजी सायंकाळी त्या गेट वे आॅफ इंडिया येथे दाखल झाल्या.
जीटूजी सायकल मोहिमेचे आयोजन दिल्ली रँडोनियर क्लबने केले होते. या मोहिमेचा मुख्य हेतू बालश्रम तसेच पायी चालणाऱ्यांच्या सुरक्षेबद्दल जागरुकता निर्माण करणे हा होता.
सायकलिंगमध्ये एका कॅलेंडर वर्षांत २००, ३००, ४००, ६०० असा एकूण १५०० किमी सायकल प्रवास करणाऱ्यांना ‘सुपर रँडोनियर’ असे संबोधण्यात येते.
ज्योती या एका कॅलेंडर वर्षांत ३००० किमी अंतर पूर्ण करणाऱ्या मध्य भारतातील पहिल्या सुपर रँडोनियर ठरल्या आहेत. यादरम्यान त्यांनी देशातील रायपूर, हैदराबाद, विजयवाडा, पचमढी अशा विविध ठिकाणी सायकल चालविली. डिसेंबर २०१६ मध्ये त्यांनी नागपूर-रायपूर हे ६०० किमी अंतर न थांबता विक्रमी वेळेत गाठले होते. यंदा छत्तीसगड पर्यटन मंत्रालयाच्यावतीने २६ ते ३० जानेवारीदरम्यान ४०० किमी सायकल स्पर्धेचे आयोजन करण्यात येत असून ज्योती या स्पर्धेत सहभागी होणार आहेत. ‘रेस अ‍ॅक्रॉस अमेरिका’ या सायकल प्रवासातील अनुभवी खेळाडू डॉ. अमित समर्थ हे ज्योती यांचे प्रशिक्षक आहेत.

‘‘महिला कुठल्याही क्षेत्रात मागे नाहीत. क्रीडा क्षेत्रातही महिलांना अनेक संधी आहेत. वायू प्रदूषण, वाहतूक समस्या, पार्किंग समस्या, आरोग्याचे प्रश्न आदी समस्यांवर तोडगा म्हणून सायकलचा वापर बहुपयोगी आहे.’’
- ज्योती पटेल, सायकलपटू.

Web Title: Nagpur's Jyoti Patel's India Gate to Get Way of the India Campaign successful

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.

टॅग्स :Sportsक्रीडा