नागपूर विद्यापीठ : प्राध्यापकांची ४४ टक्के पदे रिक्त

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: August 30, 2018 10:47 PM2018-08-30T22:47:53+5:302018-08-30T22:49:11+5:30

राष्ट्रसंत तुकडोजी महाराज नागपूर विद्यापीठाच्या पदव्युत्तर विभागांतील प्राध्यापकांवर कामाचा ताण वाढला आहे. प्रत्येक प्राध्यापकावर दोन जणांच्या कामाचे ओझे आहे. राज्य शासनाच्या उदासीन धोरणामुळे पदभरतीला अद्यापही हिरवा ‘सिग्नल’ मिळालेला नाही. सद्यस्थितीत विद्यापीठातील ४४ टक्के प्राध्यापकांची पदे रिक्त आहे. अशा स्थितीत ‘एनआयआरएफ’मध्ये (नॅशनल इन्स्टिट्यूट रॅकिंग फ्रेमवर्क) पहिल्या शंभरात स्थान कसे मिळेल, असा प्रश्न उपस्थित होत आहे.

Nagpur University: 44% posts of Professors vacant | नागपूर विद्यापीठ : प्राध्यापकांची ४४ टक्के पदे रिक्त

नागपूर विद्यापीठ : प्राध्यापकांची ४४ टक्के पदे रिक्त

Next
ठळक मुद्देकसे मिळणार पहिल्या शंभरात ‘रॅकिंग’ ?

लोकमत न्यूज नेटवर्क
नागपूर : राष्ट्रसंत तुकडोजी महाराज नागपूर विद्यापीठाच्या पदव्युत्तर विभागांतील प्राध्यापकांवर कामाचा ताण वाढला आहे. प्रत्येक प्राध्यापकावर दोन जणांच्या कामाचे ओझे आहे. राज्य शासनाच्या उदासीन धोरणामुळे पदभरतीला अद्यापही हिरवा ‘सिग्नल’ मिळालेला नाही. सद्यस्थितीत विद्यापीठातील ४४ टक्के प्राध्यापकांची पदे रिक्त आहे. अशा स्थितीत ‘एनआयआरएफ’मध्ये (नॅशनल इन्स्टिट्यूट रॅकिंग फ्रेमवर्क) पहिल्या शंभरात स्थान कसे मिळेल, असा प्रश्न उपस्थित होत आहे.
नागपूर विद्यापीठात गेल्या अनेक वर्षांपासून प्राध्यापकांची पदभरती झालेली नाही. दुसरीकडे दरवर्षी विविध विभागांतील प्राध्यापक सेवानिवृत्त होत आहेत. त्यामुळे विद्यार्थी व प्राध्यापक यांच्यातील गुणोत्तर असंतुलित झाले आहे. याचा फटका विभागांमधील शैक्षणिक व संशोधन कार्याला बसतो आहे. नागपूर विद्यापीठात ३३४ प्राध्यापकांची पदे मंजूर आहेत. त्यापैकी ४४ टक्के म्हणजे १४८ पदे रिक्त आहेत. केवळ १८५ प्राध्यापक कार्यरत आहेत.
यात २४ ‘प्रोफेसर’, ४२ सहयोगी प्राध्यापक व ११९ सहायक प्राध्यापकांचा समावेश आहे.

शासनाचे घोडे अडले कुठे ?
राज्याचे उच्च व तंत्रशिक्षणमंत्री विनोद तावडे यांनी मुंबईत सर्व कुलगुरूंची बैठक घेतली होती. तेव्हा राज्यातील काही विद्यापीठांमधील रिक्त पदांवर भरतीला मंजुरी देण्यात येईल, असे आश्वासन त्यांनी दिले होते. मात्र, त्यानंतर राज्य सरकारकडून कोणताही निर्णय घेण्यात आलेला नाही. परिणामी विद्यापीठाला आता कंत्राटी शिक्षक नेमण्याचा निर्णय घ्यावा लागला आहे.

पुण्यात ६८६ प्राध्यापक कार्यरत
नागपूर विद्यापीठ माघारलेले का असा प्रश्न शासकीय पातळीवरून अनेकदा उपस्थित करण्यात येतो. मात्र सद्यस्थितीत नागपूर विद्यापीठात अवघे १८५ प्राध्यापक कार्यरत आहेत. दुसरीकडे पुणे विद्यापीठात हीच संख्या ६८६ इतकी आहे. अशा स्थितीत पुणे विद्यापीठाशी स्पर्धा कशी होऊ शकेल, असा प्रश्न काही विभागप्रमुखांनी उपस्थित केला.

राज्याकडे मागणी का नाही ?
नागपूर विद्यापीठात प्राध्यापकांप्रमाणे शिक्षकेतर कर्मचाऱ्यांची पदेदेखील मोठ्या प्रमाणावर रिक्त आहेत. गोंडवाना विद्यापीठात पदभरतीसाठी शासनाने विशेष परवानगी दिली. नागपूर विद्यापीठानेदेखील यासंदर्भात प्रस्ताव तयार करावा व राज्याकडे भरतीसाठी विशेष परवानगी मागावी, अशी मागणी करण्यात येत आहे. मात्र प्रशासनाने यासाठी पाऊल का उचलले नाही, असा प्रश्न उपस्थित होत आहे.

कंत्राटी पदभरतीवरून व्यवस्थापन परिषद तापली
दरम्यान, नागपूर विद्यापीठातर्फे विविध पदव्युत्तर विभागात ९२ कंत्राटी प्राध्यापकांची पदभरती करण्यात येणार आहे. या पदभरतीसंदर्भात गुरुवारी झालेल्या व्यवस्थापन परिषदेच्या बैठकीत मुद्दा उपस्थित करण्यात आला. नितीन कोंगरे व आर.जी.भोयर यांनी प्रश्नांच्या फैरी झाडल्या व नियमानुसार पदभरती होत नसल्याचे म्हटले. मात्र विद्यापीठ सार्वजनिक अधिनियमातील तरतुदींनुसारच पदभरती होत असल्याचे प्रशासनाने स्पष्ट केले. ही पदभरती होणारच असल्याचे कुलगुरू डॉ.सिद्धार्थविनायक काणे यांनी स्पष्ट केले.

 

Web Title: Nagpur University: 44% posts of Professors vacant

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.