नागपूरचे सुपर स्पेशालिटी हॉस्पीटल; नावाचेच ‘सुपर’

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: April 19, 2019 10:05 AM2019-04-19T10:05:55+5:302019-04-19T10:06:49+5:30

अतिविशेषोपचार (सुपर स्पेशालिटी) करणारे महाराष्ट्रातील नागपूरचे सुपर स्पेशालिटी रुग्णालय हे पहिलेच आणि एकमेव शासकीय रुग्णालय आहे.

Nagpur Super Specialty Hospital; The only name is 'super' | नागपूरचे सुपर स्पेशालिटी हॉस्पीटल; नावाचेच ‘सुपर’

नागपूरचे सुपर स्पेशालिटी हॉस्पीटल; नावाचेच ‘सुपर’

googlenewsNext
ठळक मुद्देमंजूर ५२५ पदांपैकी १५७ पदे रिक्त

सुमेध वाघमारे ।
लोकमत न्यूज नेटवर्क
नागपूर : अतिविशेषोपचार (सुपर स्पेशालिटी) करणारे महाराष्ट्रातील नागपूरचे सुपर स्पेशालिटी रुग्णालय हे पहिलेच आणि एकमेव शासकीय रुग्णालय आहे. रुग्णालयातून चांगल्या दर्जाची सेवा मिळत असल्याने, रुग्णांच्या संख्येत गेल्या चार वर्षांत एक लाखाने लक्षणीय वाढ झाली आहे. परंतु त्यातुलनेत मंजूर असलेली ५२५ पदे तोकडी पडत आहेत. यातही १५७ पदे रिक्त आहेत. याचा फटका रुग्णसेवेला बसत आहे. नावाचेच ‘सुपर’ असल्याचे बोलले जात आहे.
शासकीय वैद्यकीय महाविद्यालय व रु ग्णालयाशी संलग्न असलेल्या सुपर स्पेशालिटी हॉस्पिटल १९९८ साली रुग्णसेवेत सुरू झाले. सध्या या हॉस्पिटलमधून हृदय शल्यचिकित्सा, (सीव्हीटीएस), हृदयरोग (कार्डिओलॉजी), मेंदूरोग (न्यूरोलॉजी), मज्जातंतूची शल्यक्रिया (न्यूरोसर्जरी), मूत्रपिंड विकार (नेफ्रालॉजी), मूत्ररोग (यूरोलॉजी), पोटाचे विकार (गॅस्ट्रोएन्ट्रोलॉजी) व ‘एन्डोक्रेनॉलॉजी’ अशा आठ विभागातून रुग्णसेवा दिली जाते. परंतु सकाळ, दुपार आणि सायंकाळ या तीन पाळीत रुग्णांना सांभाळणारे डॉक्टर, परिचारिका, तंत्रज्ञ, कर्मचाऱ्यांची वानवा आहे. अशा बिकट अवस्थेत रुग्णांची संख्या दिवसेंदिवस वाढत आहे. बाह्यरुग्ण विभागासोबतच आंतररुग्णातही वाढ झाली आहे.
विशेष म्हणजे, रुग्णालयातील मंजूर खाटांची संख्या १२० वरून १८० वाढविण्यात आली.
आता यात यूरोलॉजी विभागात ३०, न्यूरोलॉजी विभागात २० तर एन्डोक्रेनॉलॉजी विभागात २० खाटांची भर पडणार आहे. त्यातुलनेत वर्ग १ ते वर्ग ४ ची पदे मानकानुसार कमी पडत आहेत. अशा बिकट अवस्थेत हॉस्पिटलची ‘सुपर’ रुग्णसेवा सापडली आहे.

चार वर्षांत एक लाखाने वाढले रुग्ण
सुपर स्पेशालिटी हॉस्पिटलच्या बाह्यरुग्ण विभागात २०१४ मध्ये ४६,२०९ रुग्ण, २०१५ मध्ये ४१,०८८ रुग्ण, २०१६ मध्ये ८१,१८० रुग्ण, २०१७ मध्ये १,२३,८६९ रुग्ण तर २०१८ मध्ये १,५४,२३८ रुग्णांनी उपचार घेतले. गेल्या चार वर्षांत यात एक लाख आठ हजार २९ रुग्णांची संख्या वाढली आहे. आंतररुग्ण विभागातही रुग्णांची संख्या चारपटीने वाढली आहे.

२०१६ मध्ये वाढलेली पदे भरलीच नाहीत
रुग्णांची वाढती संख्या लक्षात घेऊन शासनाने २०१६ मध्ये १३५ वाढीव पदांना मंजुरी दिली. यामुळे जुनी ३९० मंजूर पदे ५२५वर पोहचली. मात्र दोन वर्षे होऊनही नव्याने मंजूर केलेली पदेच भरण्यात आलेली नाही. यामुळे १५७ पदे आजही रिक्त आहेत. यात सर्वात जास्त पदे वर्ग एक ते तीन आणि वरीष्ठ निवासी डॉक्टरांची आहेत. ३५ काल्पनिक मंजूर पदापैकी एकही पद भरण्यात आलेले नाहीत.

Web Title: Nagpur Super Specialty Hospital; The only name is 'super'

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.

टॅग्स :Healthआरोग्य