नागपूर आरटीओ :प्रवासी वाहनांना लोकेशन ट्रॅकिंग बंधनकारक

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: January 6, 2019 01:06 AM2019-01-06T01:06:36+5:302019-01-06T01:07:45+5:30

प्रवाशांच्या सुरक्षेसाठी सार्वजनिक प्रवासी वाहनांना ‘व्हेईकल लोकेशन ट्रॅकिंग डिव्हाईस’ व आपत्कालीन बटन बसविणे बंधनकारक करण्यात आले आहे. ही दोन्ही उपकरणे असल्याशिवाय वाहनांना नोंदणी किंवा तपासणी करतेवेळी योग्यता प्रमाणपत्र दिले जाणार नाही. १ जानेवारीपासून याच्या अंमलबजावणीला तिन्ही प्रादेशिक परिवहन कार्यालयांनी (आरटीओ) सुरुवात केली आहे.

Nagpur RTO: For Passenger Vehicles Location Tracking compulsory | नागपूर आरटीओ :प्रवासी वाहनांना लोकेशन ट्रॅकिंग बंधनकारक

नागपूर आरटीओ :प्रवासी वाहनांना लोकेशन ट्रॅकिंग बंधनकारक

Next
ठळक मुद्दे १ जानेवारीपासून अंमलबजावणी

लोकमत न्यूज नेटवर्क
नागपूर : प्रवाशांच्या सुरक्षेसाठी सार्वजनिक प्रवासी वाहनांना ‘व्हेईकल लोकेशन ट्रॅकिंग डिव्हाईस’ व आपत्कालीन बटन बसविणे बंधनकारक करण्यात आले आहे. ही दोन्ही उपकरणे असल्याशिवाय वाहनांना नोंदणी किंवा तपासणी करतेवेळी योग्यता प्रमाणपत्र दिले जाणार नाही. १ जानेवारीपासून याच्या अंमलबजावणीला तिन्ही प्रादेशिक परिवहन कार्यालयांनी (आरटीओ) सुरुवात केली आहे.
केंद्रीय मोटार वाहन नियम १९८९ नुसार सर्व सार्वजनिक सेवा वाहनांना ‘व्हेईकल लोकेशन ट्रॅकिंग डिव्हाईस’ आणि आपत्कालीन बटन बसविण्यास अनिवार्य करण्यात आले आहे. यामधून दुचाकी, ई-रिक्षा व तीनचाकी वाहने वगळण्यात आली आहेत. यामुळे आता १ जानेवारी टॅक्सी, कॅब, मिनी बस, बस अशा सर्व प्रकारच्या प्रवासी वाहनांची नोंदणी करताना हे दोन्ही उपकरणे वाहनामध्ये असणे आवश्यक आहे. तूर्तास योग्यता प्रमाणपत्रासाठी येणाऱ्या जुन्या वाहनांमध्ये ही दोन्ही उपकरणे बसविण्याच्या सूचना दिल्या जात आहेत. मात्र लवकरच या वाहनांवर सक्ती होण्याची शक्यता आहे.
राज्यातील काही ‘आरटीओ’कडून या निर्णयाची अंमलबजावणी सुरू झाली आहे. याबाबत महाराष्ट्र राज्य माल व प्रवासी वाहतूक संघटनेने नाराजी व्यक्त केली आहे. नागपुरात अद्यापही याचे पडसाद उमटलेले नाहीत. परंतु अधिसुचना आल्यानंतर लगेचच त्याची अंमलबजावणी करण्यापुर्वी वाहतूकदारांना ही उपकरणे बसविण्यासाठी मुदत देणे आवश्यक असल्याचे बोलले जात आहे. सूत्रानुसार, सध्या ही उपकरणे नसलेल्या वाहनांची नोंदणी थांबविण्यात आली आहे. या उपकरणांच्या कि मतीही वाढविण्यात आल्या आहेत. वाहतूकदारांना किमान तीन महिने वेळ देण्यात यावा, अशी मागणी होत आहे.
अन्यथा वाहनाची नोंदणी नाही
सर्व सार्वजनिक सेवा वाहनांमध्ये ‘व्हेईकल लोकेशन ट्रॅकिंग डिव्हाईस’ व आपत्कालीन बटन बसविणे सक्तीचे करण्यात आले आहे. १ जानेवारीपासून या निर्णयाची अंमलबजावणी सुरू झाली आहे. हे दोन्ही उपकरण नसल्यास वाहनाची नोंदणी होणार नाही. यामुळे वाहन उत्पादन, वाहन विक्रेते व वाहनधारकांनी याची नोंद घेणे आवश्यक आहे.
श्रीपाद वाडेकर
प्रादेशिक परिवहन अधिकारी, नागपूर

Web Title: Nagpur RTO: For Passenger Vehicles Location Tracking compulsory

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.