ड्राय रनसाठी नागपूर सज्ज  : ७५ जण होणार सहभागी

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: January 1, 2021 09:49 PM2021-01-01T21:49:23+5:302021-01-01T21:50:53+5:30

Corona Vaccine Dry run, nagpur newsकोरोना प्रतिबंधक लसीच्या आपत्कालीन वापरासाठी शुक्रवारी कोविशिल्ड लसीला परवानगी मिळाली असताना शनिवारी लसीकरणाचा ‘ड्राय रन’ म्हणजे रंगीत तालमीसाठी नागपूर सज्ज झाले आहे.

Nagpur ready for dry run: 75 participants | ड्राय रनसाठी नागपूर सज्ज  : ७५ जण होणार सहभागी

ड्राय रनसाठी नागपूर सज्ज  : ७५ जण होणार सहभागी

Next
ठळक मुद्देकेटीनगर, डागा रुग्णालय व कामठी रुग्णालयाचा समावेश

लोकमत  न्यूज  नेटवर्क

नागपूर : कोरोना प्रतिबंधक लसीच्या आपत्कालीन वापरासाठी शुक्रवारी कोविशिल्ड लसीला परवानगी मिळाली असताना शनिवारी लसीकरणाचा ‘ड्राय रन’ म्हणजे रंगीत तालमीसाठी नागपूर सज्ज झाले आहे. महानगरपालिकेचे केटीनगर येथील आरोग्य केंद्र, डागा स्मृती शासकीय महिला रुग्णालय व कामठी रुग्णालयात प्रत्येकी २५ असे एकूण ७५ जणांचा समावेश केला जाणार आहे. यात लस न देता लसीकरणाची संपूर्ण प्रक्रिया राबविली जाणार आहे.

‘ड्राय रन’ संदर्भात अधिक माहिती देण्यासाठी मनपा आयुक्त राधाकृष्णन बी. यांनी पत्रपरिषद घेतली. ते म्हणाले, लसीकरणासाठी पहिल्या टप्प्यात ३१ हजार हेल्थ केअर वर्करना लस दिला जाणार आहे. यांची ‘को-विन’ अ‍ॅपवर नोंदणी झाली आहे. यात शासकीयसह खासगी रुग्णालयातील डॉक्टर, परिचारिका व कर्मचाऱ्यांचा समावेश असणार आहे. लसीकरणाची पूर्वतयारी म्हणून महानगरपालिकेच्या केटीनगर येथील आरोग्य केंद्रात ‘ड्राय रन’ केले जाणार आहे. यात २५ जणांचा समावेश करण्यात आले आहे. त्यांची ओळख पटविण्यापासून, पाेर्टलवर त्यांची माहिती अपलोड करणे, लस दिल्यानंतरची नोंद घेणे व पुढील ३० मिनिटे निरीक्षण करणे, अशी रंगीत तालीम होणार आहे. यात येणाऱ्या तांत्रिक व इतरही अडचणींची माहिती घेऊन प्रत्यक्ष लसीकरणाच्यावेळी ती सोडविण्याचा प्रयत्नांच्या उद्देशाने ही तालीम घेतली जात आहे, असेही ते म्हणाले.

विशेष म्हणजे, ‘ड्राय रन’साठी मनपाने तयारीची माहिती दिली, परंतु आरोग्य विभागाने डागा रुग्णालय व कामठी रुग्णालयात होणाऱ्या पूर्वतयारीची माहिती दिली नाही. केवळ प्रत्येक केंद्रावर २५ जणांचा समावेश करण्यात आला एवढीच माहिती दिली.

५६ सेंटरवर दिली जाणार लस

राधाकृष्णन बी. म्हणाले, कोरोना प्रतिबंधक लसीकरणाची पूर्ण तयारी झाली आहे. यासाठी लागणारे प्रशिक्षण देण्यात आले आहेत. शहरात ५६ सेंटरवर लसीकरण होईल. लस ठेवण्यासाठी डिप फ्रिझर, ‘आयएलआर बॉक्स’चा उपयोग केला जाईल.

असे असणार ‘ड्राय रन’

सकाळी ९ ते ११ वाजताच्या दरम्यान ‘ड्राय रन’ होईल.

२५ जणांमधून प्रत्येकाला ठरलेल्या वेळेत बोलाविले जाईल.

 केंद्रावर ओळख पटविण्यासाठी आधार कार्डची मदत घेतली जाईल.

ओळख पटल्यावर डमी पोर्टलवर संबंधितांची नोंद घेतली जाईल.

 लसीचा डोज देण्याच्या कक्षात पाठविले जाईल.

 लस मिळाल्याच्या माहितीची नोंद घेतली जाईल.

 पुढील ३० मिनिटे आरोग्य कक्षात बसवून ठेवले जाईल.

Web Title: Nagpur ready for dry run: 75 participants

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.