नागपुरातील ‘प्राण’ वायुला धुराचा विळखा

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: April 20, 2019 10:14 AM2019-04-20T10:14:26+5:302019-04-20T10:17:34+5:30

काही नागरिकांसोबतच, मनपाचे सफाई कर्मचारी सकाळी झाडू मारल्यानंतर निघणारा कचरा तिथेच पेटवून देत असल्याने प्रदूषणात वाढ झाली आहे.

In Nagpur, pollution level is high | नागपुरातील ‘प्राण’ वायुला धुराचा विळखा

नागपुरातील ‘प्राण’ वायुला धुराचा विळखा

googlenewsNext
ठळक मुद्देसफाई कर्मचारीच जाळतात कचरा१६ महिन्यात केवळ ४४ कारवाई

राजीव सिंह।
लोकमत न्यूज नेटवर्क
नागपूर : काही नागरिकांसोबतच, मनपाचे सफाई कर्मचारी सकाळी झाडू मारल्यानंतर निघणारा कचरा तिथेच पेटवून देत असल्याने प्रदूषणात वाढ झाली आहे. सकाळी ऊर्जा देणाऱ्या प्राणवायुला धुराच्या दुर्गंधीचा विळखा पडत आहे. हे चित्र शहरातील प्रत्येक भागातील आहे. यावर निर्बंध लावण्याची व दंडात्मक कारवाई करण्याची जबाबदारी मनपाच्या आरोग्य विभागाची आहे. परंतु त्यांचेच कर्मचारी यात आघाडीवर असल्याने प्रदूषणात वाढ होऊन नागरिकांचे आरोग्य धोक्यात आले आहे.
सार्वजनिक ठिकाणी व उघड्यावर कचरा जाळण्याला घेऊन महानगरपालिका कधीच गंभीर राहिलेली नाही. या प्रकरणावर उच्च न्यायालयाने फटकारल्यानंतर काही दिवस कचरा जाळणाऱ्यांविरोधात कारवाई सुरू झाली. तत्कालीन आरोग्य उपसंचालक डॉ. मिलिंद गणवीर यांनी कचरा जाळणाऱ्या सफाई कर्मचाऱ्यांचे निलंबनही केले होते. त्यांच्या सेवानिवृत्तीपर्यंत कारवाईची ही मोहीम जोरात सुरू होती. त्यानंतर स्वच्छता दूत म्हणून माजी सैनिकांवर या कारवाईची जबाबदारी सोपविण्यात आली. यामुळे कर्मचाऱ्यांचे कचरा जाळणे कमी झाले होते. परंतु स्वच्छता दूतवर वेगवेगळ्या जबाबदाऱ्या सोपविताच कारवाईची मोहीम थंडबस्त्यात गेली. परिणामी, मुख्य रस्त्यापासून ते गल्लीबोळात सकाळी धुराचे लोट उठणे सुरू झाले. विशेष म्हणजे, ११ डिसेंबर २०१७ पासून ते २३ मार्च २०१९ दरम्यान स्वच्छता दूतांनी केवळ ४४ प्रकरणांमध्ये ८७०० रुपये दंड वसूल केला आहे. प्रति कारवाई २०० रुपये दंड लावला आहे.

हवा होत आहे विषारी
सूर्याेदयावेळी हवेमध्ये ऑक्सिजनची मात्रा सर्वाधिक असते. मोठ्या संख्येत लोक वॉकिंग, जॉगिंगला जातात. परंतु याचवेळी कर्मचारी व नागरिक कचरा जाळतात. हवेतील ऑक्सिजनमध्ये कार्बन डायऑक्साईड, कार्बन मानोऑक्साईड मिसळून हवा विषारी होते. हवेमध्ये सूक्ष्म कण (पार्टिकुलेट मॅटर) मिसळतात. यामुळे कॅन्सर, दमा, श्वसन संबंधित आजार होण्याची शक्यता असते.

भंगार व्यवसायिकही जाळतात सर्रास कचरा
काही भंगार व्यवसायिक व नागरिक पैशाच्या हव्यासापोटी विद्युत तारेमधील तांबे मिळविण्यासाठी, टायरमधील लोखंड मिळविण्यासाठी सर्रास या वस्तू जाळतात. परंतु यांच्यावर कधीच कारवाई होत नसल्याचे नागरिकांचे म्हणणे आहे.

चार झोनमध्ये एकही प्रकरण नाही
लक्ष्मीनगर, हनुमाननगर, गांधीबाग व सतरंजीपुरा झोनमध्ये कचरा जाळल्याचे एकही प्रकरण सामोर आले नाही. जेव्हा की या परिसरात कचरा जाळताना मनपाचे कर्मचारी रोज सकाळी दिसून येतात. कचरा जाळण्यात आल्याचे पुरावेही अधिकाऱ्यांना दिसतात. मात्र दुर्लक्ष केले जाते.

Web Title: In Nagpur, pollution level is high

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.