नागपूर विमानतळावर मिळणार नागपुरी संत्री

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: April 9, 2018 11:02 AM2018-04-09T11:02:16+5:302018-04-09T11:02:51+5:30

नागपूरच्या संत्र्यांला जागतिक बाजारपेठ मिळावी तसेच शेतकऱ्यांनी उत्पादित केलेला संत्रा थेट ग्राहकापर्यंत पोहचावा, यासाठी महाआॅरेंजने नागपूरच्या आंतरराष्ट्रीय विमानतळावर सुरू केलेल्या पहिल्या संत्रा फळ विक्री केंद्राचा शुभारंभ केंद्रीय भुपृष्ठ वाहतूक व जहाज बांधणी मंत्री नितीन गडकरी यांच्या हस्ते रविवारी झाला.

Nagpur oranges are now available on Nagpur airport | नागपूर विमानतळावर मिळणार नागपुरी संत्री

नागपूर विमानतळावर मिळणार नागपुरी संत्री

Next
ठळक मुद्देमहाआॅरेंजचे संत्रा विक्री केंद्र केंद्रीय मंत्री गडकरी यांच्या हस्ते उद्घाटन

लोकमत न्यूज नेटवर्क
नागपूर : नागपूरच्या संत्र्यांला जागतिक बाजारपेठ मिळावी तसेच शेतकऱ्यांनी उत्पादित केलेला संत्रा थेट ग्राहकापर्यंत पोहचावा, यासाठी महाआॅरेंजने नागपूरच्या आंतरराष्ट्रीय विमानतळावर सुरू केलेल्या पहिल्या संत्रा फळ विक्री केंद्राचा शुभारंभ केंद्रीय भुपृष्ठ वाहतूक व जहाज बांधणी मंत्री नितीन गडकरी यांच्या हस्ते रविवारी झाला.
नितीन गडकरी म्हणाले, प्रवास करणाऱ्या पर्यटकांना सहजपणे विमानतळावरच संत्रा उपलब्ध झाल्यामुळे निर्यातीला प्रोत्साहन मिळेल. यासाठी संत्रा आकर्षक संवेष्टनात तसेच उत्तम दर्जाचे संत्र उपलब्ध करुन देण्याच्या सूचना महाआॅरेजला दिल्या.
नागपूरचा संत्रा अत्यंत उत्तम दर्जाचा असूनही केवळ निर्यात नसल्यामुळे शेतकऱ्यांना योग्य मोबदला मिळत नाही. मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस व केंद्रीय मंत्री नितीन गडकरी यांनी महाआॅरेजच्या माध्यमातून कारंजा घाडगे येथील संत्रा निर्यात सुविधा केंद्राला मान्यता दिली आहे. शेतकऱ्यांच्या संस्थेमार्फत नागपुरी संत्र्याची निर्यात बांग्लादेश, श्रीलंका, दुबई, कतार आदी देशात केली. दुबईसह इतर देशात संत्र्याला मागणी वाढत आहे. नागपूर येथून दुबईसाठी कार्गोने संत्रा दररोज पाठविण्यात येत असून मागणी वाढत असल्याचे महाआॅरेंजचे श्रीधर ठाकरे यांनी सांगितले. महाआॅरेंजच्या माध्यमातून हवाई मार्गाने नागपूर विमानतळावरुन बहरीन, कतार, दुबई इत्यादी देशात संत्रा पाठविण्यात आला असून तेथून पुन्हा मागणी आलेली आहे. या वेळी श्रीधर ठाकरे, रवी बोरटकर, मनोज जवंजाळ, प्रशांत कुकडे, अशोक धोटे, एन.आर.सीसीजी संचालक मिलिंद लदानिया, अतिरिक्त विभागीय आयुक्त रवींद्र ठाकरे, राहुल ठाकरे, मिहान इंडिया लिमिटेडचे वरिष्ठ संचालक विजय मुळेकर, आबीद रूही, एम.ए. आनंद तसेच संत्रा निर्यातदार संदीप चव्हाण, सुधीर देऊळगावकर, समीर कुबडे, चैतन्य इंगळे, अजय कडू आदी शेतकरी उपस्थित होते.

लोकमतच्या वर्ल्ड आॅरेंज फेस्टिव्हलचे फलित
डिसेंबर २०१७ मध्ये लोकमतने वर्ल्ड आॅरेंज फेस्टिव्हलचे आयोजन केले होते. त्यावेळी केंद्रीय भूपृष्ठ वाहतूक व जहाजबांधणी मंत्री नितीन गडकरी यांनी नागपुरी संत्रा विदेशात नेण्याची घोषणा केली होती. गडकरी यांच्या घोषणेला मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनीही सकारात्मकता दर्शविली होती. महाआॅरेंजचे विमानतळावर सुरू झालेले संत्रा विक्री केंद्र हे लोकमतच्या पुढाकाराचे फलित आहे.

Web Title: Nagpur oranges are now available on Nagpur airport

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.