नागपूर विमानतळाच्या छतातून पाणी गळण्याची चौकशी सुरू

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: July 8, 2018 01:39 AM2018-07-08T01:39:31+5:302018-07-08T01:40:31+5:30

शुक्रवारी मुसळधार पावसामुळे डॉ. बाबासाहेब आंबेडकर आंतरराष्ट्रीय विमानतळाच्या छतातून पाणी चेकअप काऊंटरजवळ गळून परिसरात जमा झाले होते. या घटनेची चौकशी सुरू करण्यात आल्याची माहिती विमानतळाचे संचालन करणाऱ्या मिहान इंडिया लिमिटेडचे वरिष्ठ विमानतळ संचालक विजय मुळेकर यांनी लोकमतशी बोलताना दिली.

In Nagpur, the investigation of water leakage through the ceiling of the airport has started | नागपूर विमानतळाच्या छतातून पाणी गळण्याची चौकशी सुरू

नागपूर विमानतळाच्या छतातून पाणी गळण्याची चौकशी सुरू

googlenewsNext
ठळक मुद्दे विजय मुळेकर यांची माहिती

लोकमत  न्यूज नेटवर्क
नागपूर : शुक्रवारी मुसळधार पावसामुळे डॉ. बाबासाहेब आंबेडकर आंतरराष्ट्रीय विमानतळाच्या छतातून पाणी चेकअप काऊंटरजवळ गळून परिसरात जमा झाले होते. या घटनेची चौकशी सुरू करण्यात आल्याची माहिती विमानतळाचे संचालन करणाऱ्या मिहान इंडिया लिमिटेडचे वरिष्ठ विमानतळ संचालक विजय मुळेकर यांनी लोकमतशी बोलताना दिली.
मुसळधार पावसामुळे विमानतळाच्या टर्मिनल इमारतीबाहेर ड्रॉप अ‍ॅण्ड गो झोनमध्ये पाणी जमा झाले होते. याशिवाय इमारतीच्या आत छतातून पाणी गळत होते. विमानतळाच्या नविनीकरणानंतर बाहेरील भाग सुंदर दिसतो, पण आतील भागात पाणी गळत असल्यामुळे नविनीकरणावर प्रश्नचिन्ह उभे राहिले आहे. जुन्या टर्मिनल इमारतील पडलेल्या भेगा आणि भिंतीतून पाणी येत असल्यामुळे त्याच्या भक्कमतेचा अंदाज येऊ शकतो. चौकशीनंतर सत्य बाहेर येईल, असे मुळेकर यांनी सांगितले.
वर्धा रोडवर मलबा हटविण्याचे निर्देश
वर्धा रोडवर गुडघाभर पाणी साचल्यामुळे वाहतुकीला अडथळा निर्माण झाला. अनेक तास वाहतुकीची कोंडी झाली. शिवाय वर्धा रोडवर विमानतळाच्या अ‍ॅप्रोच रोडलगत पाणी वाहून जाण्याची पाईपलाईन तुटल्यामुळे पाणी रस्त्यावर जमा झाले. गेल्यावर्षी अशीच घटना या ठिकाणी घडली होती. महामेट्रोचे उपमहाव्यस्थापक अखिलेश हळवे यांनी सांगितले की, बांधकाम झालेल्या ठिकाणांवरून मलबा हटविण्याचे निर्देश दिले आहेत.

Web Title: In Nagpur, the investigation of water leakage through the ceiling of the airport has started

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.