नागपुरात  अर्जाच्या जाळ्यात फसली स्वस्त घरे?

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: February 16, 2019 12:28 AM2019-02-16T00:28:21+5:302019-02-16T00:29:36+5:30

तीन वर्षांपूर्वी केंद्र सरकारने प्रधानमंत्री आवास योजनेत स्वस्त घर देण्याचे आश्वासन दिले होते. त्याकरिता अर्ज मागविण्यात आले. मनपा व सरकारच्या पोर्टलवर डिसेंबर २०१८ पर्यंत ९४३३६ अर्ज आले. त्यापैकी २० हजार पात्र लाभार्थींची यादी बनवून नासुप्रने मनपाकडे सोपविली. या दरम्यान नासुप्रने नागपूर महानगर प्रदेश विकास प्राधिकरणाच्या माध्यमातून बयाण जारी करून आर्थिकरीत्या दुर्बल घटक (ईडब्ल्यूएस) श्रेणीमध्ये येणाऱ्या नागरिकांना प्रधानमंत्री आवास योजनेचा लाभ घेण्यासाठी पुन्हा ऑनलाईन अर्ज करण्यास सांगितले आहे.

In Nagpur, the cheapest houses stucked in application net? |  नागपुरात  अर्जाच्या जाळ्यात फसली स्वस्त घरे?

 नागपुरात  अर्जाच्या जाळ्यात फसली स्वस्त घरे?

Next
ठळक मुद्दे नासुप्रसतर्फे पुन्हा ऑनलाईन अर्जाचा पर्याय : मनपामध्ये ९४ हजार लोकांचे अर्ज

लोकमत न्यूज नेटवर्क
नागपूर : तीन वर्षांपूर्वी केंद्र सरकारने प्रधानमंत्री आवास योजनेत स्वस्त घर देण्याचे आश्वासन दिले होते. त्याकरिता अर्ज मागविण्यात आले. मनपा व सरकारच्या पोर्टलवर डिसेंबर २०१८ पर्यंत ९४३३६ अर्ज आले. त्यापैकी २० हजार पात्र लाभार्थींची यादी बनवून नासुप्रने मनपाकडे सोपविली. या दरम्यान नासुप्रने नागपूर महानगर प्रदेश विकास प्राधिकरणाच्या माध्यमातून बयाण जारी करून आर्थिकरीत्या दुर्बल घटक (ईडब्ल्यूएस) श्रेणीमध्ये येणाऱ्या नागरिकांना प्रधानमंत्री आवास योजनेचा लाभ घेण्यासाठी पुन्हा ऑनलाईन अर्ज करण्यास सांगितले आहे.
ज्या लोकांनी मनपाकडे अर्ज केले आहेत, त्यांना पुन्हा अर्ज करावा लागणार आहे. त्यामुळे अर्ज करणाऱ्यांना कोण घर उपलब्ध करून देणार, यावर प्रश्नचिन्ह उभे राहिले आहे.
प्राधिकरणानेअर्जांची नियमावली तयार केली आहे. त्या आधारावर अर्ज करणे अनिवार्य आहे. अर्ज करणाऱ्यांना पासपोर्ट फोटो, आधार कार्ड आणि स्वत:च्या बँक खात्यााचा कॅन्सल चेक द्यावा लागेल. त्यानंतर ऑनलाईन प्रक्रिया शुरू झाल्यानंतर १०० रुपयांच्या स्टॅम्प पेपरवर पक्के घर नसल्याचे शपथपत्र द्यावे लागेल. सोबतच १० हजार रुपये अनामत रक्कम ५६० लाभार्थ्यांना द्यावी लागेल.
स्कीमचे काम प्रगतिपथावर
९ डिसेंबर २०१५ मध्ये सरकारने स्वस्त घराची योजना आणली होती. याकरिता मनपाने डिमांड मागवून सर्व्हेक्षण केले होते. डिसेंबर २०१८ पर्यंत मनपा पोर्टलवर ४१४७८ नागरिकांनी अर्ज केले तर सरकारच्या पोर्टलवर ५२८५८ अर्ज आले. त्या आधारावर वर्ष २०१७-१८ मध्ये एकूण १०७०४ घरकुल बनविण्याच्या योजनेवर नासुप्रने काम सुरू केले. सध्या नासुप्रतर्फे वाठोडा येथे २६४, तरोडीखुर्द ३३१६, वांजरी येथे ७६५ आणि वाठोडा येथे ४४८ फ्लॅट स्कीमचे काम सुरू आहे. नासुप्रची भविष्यात २५ हजार फ्लॅट बनविण्याची योजना आहे.
२० हजार लोकांची यादी नासुप्रला सोपविली : मनपा
मनपाचे कार्यकारी अभियंता (एसआरए) राजेंद्र राहाटे यांनी सांगितले की, तपासणीनंतर २० हजार लोकांची यादी नासुप्रकडे सोपविली आहे. जर नासुप्रने वेगळी यादी मागविली असेल तर त्याची माहिती नाही. ज्यांनी अर्ज केले आहेत, त्यांना ड्रॉद्वारे स्वस्त घर मिळणार आहे.
अर्जासोबत पुन्हा शुल्क द्यावे लागेल : नासुप्र
नासुप्रचे अधीक्षक अभियंता सुनील गुज्जेलवार म्हणाले, अर्ज करणाऱ्यांना पुन्हा शुल्क भरावे लागेल. नियमावली तयार केली असून घर नसल्याचे शपथपत्र द्यावे लागेल.

Web Title: In Nagpur, the cheapest houses stucked in application net?

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.