नागपूर कृषी महाविद्यालयाचा शेडनेट शेतीचा प्रकल्प संकटात

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: August 13, 2018 11:17 AM2018-08-13T11:17:22+5:302018-08-13T11:21:33+5:30

कृषी महाविद्यालयाने महाराजबागलगतच्या शेतीत पाच वर्षांपूर्वी २४ लाख खर्च करून उभारलेला शेडनेट शेतीचा प्रकल्प वापरात नसल्याने संकटात सापडला आहे.

The Nagpur Agricultural College's Shandenet farming project is in crisis | नागपूर कृषी महाविद्यालयाचा शेडनेट शेतीचा प्रकल्प संकटात

नागपूर कृषी महाविद्यालयाचा शेडनेट शेतीचा प्रकल्प संकटात

googlenewsNext
ठळक मुद्दे लाखोंचा खर्च पाण्यातउभारलेले शेडनेट पाच वर्षांपासून वापराविना

गणेश हूड।
लोकमत न्यूज नेटवर्क
नागपूर : वातावरणातील बदल, बेभरवशाचा मान्सून यामुळे मागील काही वर्र्षांत पारंपरिक शेतीचे गणित बिघडत चालले आहे. निसर्गाच्या असमतोलामुळे शेतकऱ्यांचे अतोनात नुकसान होत आहे. आता कोरडवाहू शेतीबाबत शेतकरी शाश्वत राहिला नाही. शिवाय निव्वळ सिंचनाच्या आधारेही भरघोस उत्पन होण्याची खात्री राहिलेली नाही. अशा परिस्थितीत संकटग्रस्त शेतकऱ्यांना संरक्षित शेती प्रकल्पाच्या माध्यमातून दिलासा मिळू शकतो.
शेडनेट शेतीच्या माध्यमातूनही यावर मात करणे शक्य आहे. कृ षी विद्यापीठांनी यासाठी पुढाकार घ्यायला हवा. मात्र कृषी महाविद्यालयाने महाराजबागलगतच्या शेतीत पाच वर्षांपूर्वी २४ लाख खर्च करून उभारलेला शेडनेट शेतीचा प्रकल्प वापरात नसल्याने संकटात सापडला आहे. शेतकरी कुटुंबातील सदस्यांची संख्या वाढल्याने शेतीवरील भार वाढला आहे. वरून) अशा परिस्थितीत कमी शेतीत अधिक उत्पादन मिळण्यासाठी शेडेनेट शेती प्रकल्प, पॉलीहाऊ सच्या माध्यमातून शेती करणे आवश्यक झाले आहे. कृ षी महाविद्यालयांनी विद्यार्थ्यांना शेडनेट शेती प्रकल्पाच्या माध्यमातून अत्याधुनिक शेतीचे शिक्षण देणे गरजेचे आहे. महाविद्यालयांची ही जबाबदारी ठरते. याच हेतूने महाराजबागलगतच्या नागनदीच्या काठावरील शेतीत चार शेडनेट तर पेरूची बाग असलेल्या शेतीत चार असे आठ शेडनेट उभारण्यात आले होते. येथे जरबेरा, गुलाब व बाजारात मागणी असलेल्या फुलांच्या नवीन जाती विकसित होतील. सोबतच ढोबळ मिरची, भाजीपाला पीक, सुधारित फळझाडांची लागवड अपेक्षित आहे. मात्र शेडनेट वापराविना पडून असल्याने महाविद्यालयाच्या कार्यप्रणालीवर प्रश्नचिन्ह निर्माण झाले आहे. यासंदर्भात अधिक माहिती जाणून घेण्यासाठी कृ षी महाविद्यालयाचे सहयोगी अधिष्ठाता डॉ. एन.डी. पार्लावार यांच्याशी संपर्क साधण्याचा प्रयत्न केला असता, त्यांच्याकडून प्रतिसाद मिळाला नाही.

२०२० पर्यंत दुप्पट उत्पन्न कसे होईल
कृषी विभागामार्फत शेती विकासाच्या विविध योजना राबविल्या जातात. २०२० पर्यंत शेतकऱ्यांचे उत्पन्न दुप्पट करण्याचे शासनाचे उद्दिष्ट आहे. उद्दिष्टपूर्तीसाठी उन्नत शेती-समृद्ध शेतकरी मोहीम राबविली जात आहे. यात कृषी महाविद्यालयांचीही महत्त्वाची भूमिका आहे. कृषी महाविद्यालयांनी यासाठी विविध उपक्रम राबविणे अभिप्रेत आहे. परंतु महाविद्यालयाचे शेडनेट वापराविना पडून असेल तर शेतकरी दुसरी काय अपेक्षा करणार? कृषी विद्यापीठाचेही याकडे दुर्लक्ष असल्याचे चित्र आहे.

हाच का इंडो-इस्रायल प्रकल्प
इस्रायलच्या कृषी विषयाच्या विशेष कौशल्यांवर आधारित, भारत आणि इस्रायलने २००६ मध्ये कृषी सहकार्य करार केला आहे. या इंडो- इस्रायल प्रकल्पाचाच शेडनेट शेती हा एक भाग आहे. यातून पिकांची विविधता, उत्पादकता वाढविणे, नवीन संसाधनांचा कार्यक्षमतेने वापर व्हावा, हा यामागील हेतू असून शेडनेटचा प्रकल्प यातूनच उभारण्यात आलेला आहे. परंतु प्रकल्प पडून असल्याने हाच का इंडो-इस्रायल प्रकल्प असा प्रश्न विद्यार्थ्यांना पडला आहे.

Web Title: The Nagpur Agricultural College's Shandenet farming project is in crisis

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.

टॅग्स :agricultureशेती