‘माझी मेट्रो’ धावली रे ! पहिल्यांदा एलिव्हेटेड ट्रॅकवर ‘ट्रायल रन’

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: February 18, 2019 11:07 PM2019-02-18T23:07:14+5:302019-02-18T23:08:13+5:30

‘ती येणार, ती धावणार’ या चर्चांनी मागील आठवडाभरापासून नागपुरकर उत्साहित होते. सोमवारी ‘ती’ केवळ आलीच नाही, तर शहरातून आपला ‘जलवा’ दाखवत आबालवृद्धांची मने जिंकत गेली. तिची एक ‘झलक’ मिळावी यासाठी कुणी गच्चीवर तर कुणी रस्त्यावरच उभे झाले आणि एक अनोखे ‘सरप्राईज’ हजारो नेत्रांनी ‘याची देही, याची डोळा’ अनुभवले. ज्या क्षणाची नागपूरकर आतुरतेने वाट पाहत होते, तो क्षण सोमवारी प्रत्यक्षात अनुभवता आला. एकीकडे ‘महा मेट्रो नागपूर’ने आपला चौथा वर्धापन दिन साजरा करत असताना ‘आरडीएसओ'च्या (संशोधन डिझाइन आणि मानक संघटना) परीक्षणात ‘मेट्रो कोचेस’ने पहिल्यांदाच ‘एलिव्हेटेड ट्रॅक'वर प्रवास केला.

'My Metro' runs! Trial run on the first ever elevated track | ‘माझी मेट्रो’ धावली रे ! पहिल्यांदा एलिव्हेटेड ट्रॅकवर ‘ट्रायल रन’

‘माझी मेट्रो’ धावली रे ! पहिल्यांदा एलिव्हेटेड ट्रॅकवर ‘ट्रायल रन’

Next
ठळक मुद्देउपराजधानीच्या नागरिकांना ‘सरप्राईज’ : खापरी मेट्रो स्टेशन ते कॉंग्रेस नगर मेट्रो स्टेशन पर्यंत ‘रन’

लोकमत न्यूज नेटवर्क
नागपूर : ‘ती येणार, ती धावणार’ या चर्चांनी मागील आठवडाभरापासून नागपुरकर उत्साहित होते. सोमवारी ‘ती’ केवळ आलीच नाही, तर शहरातून आपला ‘जलवा’ दाखवत आबालवृद्धांची मने जिंकत गेली. तिची एक ‘झलक’ मिळावी यासाठी कुणी गच्चीवर तर कुणी रस्त्यावरच उभे झाले आणि एक अनोखे ‘सरप्राईज’ हजारो नेत्रांनी ‘याची देही, याची डोळा’ अनुभवले. ज्या क्षणाची नागपूरकर आतुरतेने वाट पाहत होते, तो क्षण सोमवारी प्रत्यक्षात अनुभवता आला. एकीकडे ‘महा मेट्रो नागपूर’ने आपला चौथा वर्धापन दिन साजरा करत असताना ‘आरडीएसओ'च्या (संशोधन डिझाइन आणि मानक संघटना) परीक्षणात ‘मेट्रो कोचेस’ने पहिल्यांदाच ‘एलिव्हेटेड ट्रॅक'वर प्रवास केला.
‘आरडीएसओ'च्या परीक्षणासाठी वर्धा महामार्गावरील खापरी ते काँग्रेस नगर मेट्रो स्टेशन पर्यंतच्या ११.५ किमीचा प्रवास महामेट्रोने केला. यापैकी न्यू-एयरपोर्ट मेट्रो स्टेशन ते काँग्रेस नगर मेट्रो स्टेशनपर्यंत मेट्रोचा संपूर्ण ‘ट्रॅक’ हा ‘एलिव्हेटेड’ आहे. हे परीक्षण ‘आरडीएसओ’च्या अकरा सदस्यीय पथकाकडून करण्यात आले. याअंतर्गत ‘मेट्रो ट्रेन’च्या ‘ब्रेक’ प्रणालीसह सुरक्षासंबंधित तांत्रिक बाबींचे परीक्षण करण्यात आले. यात ‘एक्सीलरेशन’, ‘डीसीलरेशन’, ‘ऑस्सिलेशन’, ‘ट्रॅक’, ‘ओएचई’, पॉवर सप्लाय, ‘वायर टक्ट’ इत्यादींची चाचपणीदेखील करण्यात आली. परीक्षणासाठी ९०० नागरिक बसतील इतके वजन ‘कोचेस’मध्ये ठेवण्यात आले होते. तसेच पावसाळ्याच्या दिवसात ओल्या ‘ट्रॅक'वर ‘मेट्रो’ची ‘ब्रेक’ प्रणाली नियमित काम करेल याची खात्री करून घेण्यात आली. महत्वाचे म्हणजे गती तपासण्यासाठी १०, २० आणि ४५ किमी प्रति तास या वेगाने ‘मेट्रो’ चालविण्यात आली.
‘ट्रायल रन’साठी हैदराबाद मेट्रोकडून मागविण्यात आलेल्या ‘ट्रेन’सोबतच चीनच्या ‘सीआरआरसी’ कंपनीकडून खरेदी करण्यात आलेल्या ‘मेट्रो’ची चाचणी करण्यात आली. तीन ‘कोच’ असणारी ‘मेट्रो’ मिहान ‘डेपो’तून निघून खापरी, न्यू एअरपोर्ट, साऊथ एअरपोर्ट स्टेशन या मार्गााने कॉंग्रेसनगर मेट्रो स्थानकापर्यंत पोहोचली. दिवसभर हा ‘ऑसिलेशन ट्रायल रन’ चालला. यावेळी ‘महामेट्रो’चे कार्यकारी संचालक (रोलिंग स्टॉक) जनककुमार गर्ग, महाव्यवस्थापक (रोलिंग स्टॉक) नरेश गुरबानी प्रामुख्याने उपस्थित होते.

 

Web Title: 'My Metro' runs! Trial run on the first ever elevated track

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.