नागपुरात विद्यार्थिनीवर छेडखानीतून खुनीहल्ला

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: May 24, 2018 01:31 AM2018-05-24T01:31:40+5:302018-05-24T01:31:52+5:30

विद्यार्थिनीची छेडखानी करून तिच्यावर खुनीहल्ला करण्यात आला. ही घटना इमामवाडा पोलीस ठाणे हद्दीत मंगळवारी घडली. पोलिसांनी आरोपी दीपक विमल अग्रवाल (१९) रा. एमआयजी कॉलनी याला अटक केली आहे.

Murderous assault on students in Nagpur | नागपुरात विद्यार्थिनीवर छेडखानीतून खुनीहल्ला

नागपुरात विद्यार्थिनीवर छेडखानीतून खुनीहल्ला

Next
ठळक मुद्देइमामवाडा पोलीस ठाणे हद्दीतील घटना


लोकमत न्यूज नेटवर्क
नागपूर : विद्यार्थिनीची छेडखानी करून तिच्यावर खुनीहल्ला करण्यात आला. ही घटना इमामवाडा पोलीस ठाणे हद्दीत मंगळवारी घडली. पोलिसांनी आरोपी दीपक विमल अग्रवाल (१९) रा. एमआयजी कॉलनी याला अटक केली आहे.
दीपक हा महाविद्यालयीन विद्यार्थी आहे. तो रामबाग एमआयजी कॉलनीत राहतो. अनेक दिवसांपासून तो पीडित मुलीचा पाठलाग करीत होता. त्याच्या व्यवहाराने विद्यार्थिनी त्रस्त होती. जुनी ओळख असल्याने ती दीपकच्या व्यवहाराकडे दुर्लक्ष करीत होती. विद्यार्थिनीच्या तक्रारीवरून मंगळवारी सायंकाळी दीपक तिला आपल्या घरी घेऊन गेला. तिथे त्याने तिच्याशी वाद घातला. तिला लाथाबुक्क्यांनी मारहाण केली. शिवीगाळ करीत चाकूने हल्ला केला. या हल्ल्यात दीपकही जखमी झाला. अचानक घडलेल्या या घटनेने सर्वांनाच धक्का बसला. कुटुंबीयांनीही मध्यस्थी करीत विद्यार्थिनीला मेडिकलमध्ये दाखल केले. मेडिकलमधून इमामवाडा पोलिसांना माहिती मिळाली. पोलिसांनी गुन्हा दाखल केला आहे.

Web Title: Murderous assault on students in Nagpur

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.