नागपुरात वृद्ध दांपत्याचा खून

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: April 15, 2019 10:19 AM2019-04-15T10:19:08+5:302019-04-15T10:19:29+5:30

घरी आराम करीत असलेल्या वृद्ध पती व पत्नीच्या डोक्यावर लोखंडी रॉडने वार करून त्यांचा खून करण्यात आल्याची घटना वाडी शहरातील सुरक्षानगरात रविवारी रात्री उघडकीस आली.

Murder of old couple in Nagpur | नागपुरात वृद्ध दांपत्याचा खून

नागपुरात वृद्ध दांपत्याचा खून

Next
ठळक मुद्देडोक्यावर रॉडने वार

लोकमत न्यूज नेटवर्क
नागपूर: घरी आराम करीत असलेल्या वृद्ध पती व पत्नीच्या डोक्यावर लोखंडी रॉडने वार करून त्यांचा खून करण्यात आल्याची घटना वाडी शहरातील सुरक्षानगरात रविवारी रात्री उघडकीस आली. या घटनेमुळे परिसरात खळबळ उडाली आहे; शिवाय त्यांचे कुणाशीही शत्रुत्व नसल्याने तर्कवितर्क लावले जात आहेत.
शंकर चक्रवर्ती (७०) व सीमा चक्रवर्ती (६०), रा. सुरक्षानगर, वाडी अशी मृत पती व पत्नीची नावे आहेत. त्यांना प्रियंका (२५) नावाची एकुलती मुलगी असून, ती खासगी कंपनीमध्ये नोकरी करते. शंकर दत्तवाडी येथील चौकात नारळपाणी विकण्याचा धंदा करून उपजीविका करतात. प्रियंका त्यात हातभार लावायची. ती रविवारी सकाळी खरेदीला गेली होती. त्यामुळे रात्री शंकर व सीमा दोघेच घरी होते. ती रात्री ८ वाजताच्या सुमारास घरी परतल्यावर तिला तिचे आई व वडील रक्ताच्या थारोळ्यात पडले असल्याचे निदर्शनास आले.
तिने लगेच पोलिसांना सूचना दिली. माहिती मिळताच पोलिसांनी घटनास्थळ गाठून पंचनामा केला. शिवाय, पोलीस उपायुक्त विवेक मिसाळ व पोलीस निरीक्षक राजेंद्र पाठक यांनीही घटनास्थळाची पाहणी केली. त्या दोघांच्या डोक्यावर लोखंडी रॉडने वार केल्याचे तसेच त्यात गंभीर दुखापत झाल्याने त्यांचा मृत्यू झाल्याचे प्रथमदर्शनी स्पष्ट झाले आहे. त्यांचे कुणाशीही शत्रुत्व नसल्याने त्यांचा खून का करण्यात आला, हे मात्र, अद्याप स्पष्ट होऊ शकले नाही.
ते प्रकरण अदखलपात्र
च्काही दिवसांपूर्वी शंकर यांचा अपघात झाल्याने ते जखमी झाले होते. त्यामुळे ते घरीच राहायचे. त्यावेळी अज्ञात व्यक्तीने त्यांना जीवे मारण्याची धमकी दिली होती. त्यामुळे त्यांनी या प्रकाराची वाडी पोलीस ठाण्यात तक्रार नोंदविली होती. मात्र, पोलिसांनी गुन्ह्याची नोंद न करता ते ‘एनसी’ (अदखलपात्र गुन्हा) नोंद करून प्रकरण तपासात घेतले नाही. कदाचित त्याच प्रकरणातून या दोघांचा खून करण्यात आला असावा, अशी शक्यता व्यक्त केली जात आहे.

Web Title: Murder of old couple in Nagpur

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.

टॅग्स :Murderखून