खासदार क्रीडा महोत्सव : वादळी पावसाने समारोपीय उत्साहावर विरजण

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: May 26, 2018 10:05 PM2018-05-26T22:05:03+5:302018-05-26T22:05:12+5:30

सचिन तेंडुलकरची एक झलक पाहण्यासाठी शनिवारी यशवंत स्टेडियमवर गोळा झालेल्या हजारो क्रीडाप्रेमींना निराश होऊन परतावे लागले. खासदार क्रीडा महोत्सवाचा समारोप, पुरस्कार वितरण व सत्कार समारंभासाठी मास्टर ब्लास्टर येणार होते. मात्र समारोपाच्या उत्साहावर वादळासह आलेल्या पावसाने विरजण टाकले. वादळामुळे सचिनचे विमान परत वळविल्याची घोषणा होताच पावसातही आतुरतेने वाट पाहणाऱ्या चाहते आणि क्रीडाप्रेमींची निराशा झाली.

MPs celebrate the sports festival: Wasting rain | खासदार क्रीडा महोत्सव : वादळी पावसाने समारोपीय उत्साहावर विरजण

खासदार क्रीडा महोत्सव : वादळी पावसाने समारोपीय उत्साहावर विरजण

googlenewsNext
ठळक मुद्देसचिनचे विमान औरंगाबादकडे वळले : कार्यक्रम पुढे ढकलला

लोकमत न्यूज नेटवर्क
नागपूर : सचिन तेंडुलकरची एक झलक पाहण्यासाठी शनिवारी यशवंत स्टेडियमवर गोळा झालेल्या हजारो क्रीडाप्रेमींना निराश होऊन परतावे लागले. खासदार क्रीडा महोत्सवाचा समारोप, पुरस्कार वितरण व सत्कार समारंभासाठी मास्टर ब्लास्टर येणार होते. मात्र समारोपाच्या उत्साहावर वादळासह आलेल्या पावसाने विरजण टाकले. वादळामुळे सचिनचे विमान परत वळविल्याची घोषणा होताच पावसातही आतुरतेने वाट पाहणाऱ्या चाहते आणि क्रीडाप्रेमींची निराशा झाली.
खासदार क्रीडा महोत्सवाचा समारोपीय कार्यक्रम शनिवारी आयोजित करण्यात आला होता. त्यानिमित्त यशवंत स्टेडियमवर भव्य तयारी करण्यात आली होती. सचिन तेंडुलकर येणार यामुळे स्टेडियमवर ५ वाजतापासून चाहत्यांची गर्दी वाढत चालली होती. आयोजकांकडून संगीतमय कार्यक्रमाची मेजवानीही देण्यात आली. गायिका श्रेया खराबे यांच्यासह ‘अतृप्त बॅन्ड’चा गिटारवादक जॅक थॉम, वैभव (किबोर्ड), शांतनू (ड्रम) तसेच आरजे राजन व आरजे मोना यांनी वातावरण निर्मिती केली होती. त्यामुळे दर्शकांचा उत्साह अजूनच वाढला होता. बॉलिवूडच्या गीतांवर दर्शक थिरकायला लागले होते. याशिवाय सचिनच्या हस्ते सत्कार होणारे क्रीडा क्षेत्रातील २० मान्यवर तसेच रणजी करंडक विजेता विदर्भाचा संघ स्टेडियमवर दाखल झाला होता. सोबतच छत्रपती पुरस्कारप्राप्त खेळाडूही डायसवर पोहचले होते. मात्र ६.४५ वाजताच्यादरम्यान अचानक वातावरण बदलले. सायंकाळपर्यंत अतिशय तापलेला सूर्य अचानक ढगाआड गेला आणि वादळाला सुरुवात झाली. पाऊस येणार नाही अशी आशा बाळगून असलेले निवेदक लोकांना शांत करत होते. मात्र अखेर पावसाने आपला खेळ सुरू केलाच. सुरुवातीला हळुहळू येणाºया पावसाचा जोर वाढला आणि स्टेडियमवर गोळा झालेले दर्शक सैरभैर पळत आसरा शोधत होते. काही दर्शक पावसाचा आनंद घेत स्टेडियममध्येच थांबले होते.
अर्धा-पाऊण तास पावसाने स्टेडियम चांगलेच ओले केले. त्यामुळे कार्यक्रम होणार की नाही हा संशय लोकांना होता. मात्र सचिन येईल ही उत्सुकता लागून होती. त्यामुळे लोक थांबून होते. शेवटी क्रीडा महोत्सवाचे मुख्य संयोजक संदीप जोशी यांनी, सचिनचे चार्टर्ड विमान पाऊस आणि अंधुक प्रकाशामुळे औरंगाबादकडे वळविल्याचे सांगत हा कार्यक्रम पुढे ढकलल्याचे जाहीर केले. कार्यक्रम रद्द झाला नाही, मात्र पुढे ढकलण्यात आला असून लवकरच नवीन तारीख जाहीर करण्यात येईल, असेही त्यांनी स्पष्ट केले. त्यामुळे बराच वेळ वाट पाहत असलेले क्रीडाप्रेमी निराश होऊन घराकडे परतायला लागले.
माध्यमांशी बोलताना संदीप जोशी म्हणाले की समारोपीय कार्यक्रम यशस्वी करण्यासाठी मोठी तयारी केली होती. पण पावसाला थांबविणे आमच्या हातात नव्हते. त्यांनी स्टेडियमवर पोहचलेल्या नागपूरकरांचे आभारही मानले. आमचा उत्साह कमी झालेला नसून कार्यक्रमाची नवीन तारीख लवकरच जाहीर करण्यात येईल, असे त्यांनी सांगितले. रविवारी सकाळी होणारी वॉकथॉन नियोजित वेळेनुसार होईल, असे सांगत नागरिकांनी वॉकथॉनमध्ये सहभागी होण्याचे आवाहन त्यांनी केले.

Web Title: MPs celebrate the sports festival: Wasting rain

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.