मेयोच्या अधिष्ठातापदी डॉ. अजय केवलीया

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: June 6, 2018 12:50 AM2018-06-06T00:50:53+5:302018-06-06T00:51:06+5:30

इंदिरा गांधी शासकीय वैद्यकीय महाविद्याालय व रुग्णालय (मेयो)च्या अधिष्ठाता पदावर डॉ. अजय केवलीया यांची नियुक्ती करण्यात आली आहे. पाच दिवसापूर्वी डॉ. अनुराधा श्रीखंडे सेवानिवृत्त झाल्या होत्या. बुधवारी त्यांचा पदभार डॉ. केवलीया स्वीकारणार आहे.

Moyo hospital dean Dr. Ajay Kavaliya | मेयोच्या अधिष्ठातापदी डॉ. अजय केवलीया

मेयोच्या अधिष्ठातापदी डॉ. अजय केवलीया

googlenewsNext
ठळक मुद्देपाच दिवसापूर्वी डॉ. अनुराधा श्रीखंडे सेवानिवृत्त झाल्या

लोकमत न्यूज नेटवर्क
नागपूर : इंदिरा गांधी शासकीय वैद्यकीय महाविद्याालय व रुग्णालय (मेयो)च्या अधिष्ठाता पदावर डॉ. अजय केवलीया यांची नियुक्ती करण्यात आली आहे. पाच दिवसापूर्वी डॉ. अनुराधा श्रीखंडे सेवानिवृत्त झाल्या होत्या. बुधवारी त्यांचा पदभार डॉ. केवलीया स्वीकारणार आहे.
दोन महिन्यांपूर्वी शासनाने डॉ. अनुराधा श्रीखंडे यांना पदोन्नतीवर अधिष्ठाता म्हणून नियुक्त केले होते. परंतु ३१ मे रोजी डॉ. श्रीखंडे निवृत्त झाल्या. दरम्यान येथे सेवाजेष्ठता सूची डावलून प्रभारी अधिष्ठातापदाची जबाबदारी वैद्यकीय अधीक्षकांकडे दिल्याने वरिष्ठांमध्ये नाराजी होती. मात्र डॉ. केवलिया यांच्या कायम अधिष्ठाता पदावरील नियुक्तीने आता येथील वादावर पडदा पडला आहे. डॉ. केवलिया पूर्वी मेयोत न्यायवैद्यकशास्त्र प्रमुख म्हणून कार्यरत होते. येथे कार्यरत असताना वैद्यकीय शिक्षण खात्याने त्यांना गोंदियातील प्रभारी अधिष्ठातापदाची जवाबदारी दिली होती. गोंदिया मेडिकलच्या उभारणीत त्यांची भूमिका महत्त्वाची होती. अधिष्ठातापद सोडल्यावर त्यांना प्रथम यवतमाळ व त्यानंतर मेडिकलला प्राध्यापक म्हणून पाठवण्यात आले. येथून ते धुळेला पदोन्नतीवर अधिष्ठाता म्हणून गेले. येथून गेल्या महिन्यात ते अकोला येथे अधिष्ठाता म्हणून रुजू झाले होते. मेयोतील पद रिक्त झाल्याने त्यांची मेयोत बदली करण्यात आली.

Web Title: Moyo hospital dean Dr. Ajay Kavaliya

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.