धावत्या रेल्वेतून उडी मारल्याने आईचा मृत्यू, मुलगी गंभीर

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: January 6, 2019 12:37 AM2019-01-06T00:37:14+5:302019-01-06T00:38:52+5:30

धावत्या रेल्वेगाडीतून उडी मारणे मायलेकीच्या जीवावर बेतले. यात आईचा जागीच मृत्यू झाला. तर मुलगी गंभीर जखमी झाल्याची घटना अजनी रेल्वेस्थानकाच्या प्लॅटफॉर्म क्रमांक २ वर मुंबई एण्डकडील भागात दुपारी १ वाजताच्या सुमारास घडली.

Mother's death, daughter injured after jumping by running train | धावत्या रेल्वेतून उडी मारल्याने आईचा मृत्यू, मुलगी गंभीर

धावत्या रेल्वेतून उडी मारल्याने आईचा मृत्यू, मुलगी गंभीर

Next
ठळक मुद्देअजनी रेल्वेस्थानकावरील घटना : चुकीच्या गाडीत बसल्यामुळे उडाला गोंधळ

लोकमत न्यूज नेटवर्क
नागपूर : धावत्या रेल्वेगाडीतून उडी मारणे मायलेकीच्या जीवावर बेतले. यात आईचा जागीच मृत्यू झाला. तर मुलगी गंभीर जखमी झाल्याची घटना अजनी रेल्वेस्थानकाच्या प्लॅटफॉर्म क्रमांक २ वर मुंबई एण्डकडील भागात दुपारी १ वाजताच्या सुमारास घडली.
कल्पना किशोर खरवडे (४५) हे मृत आईचे नाव असून रिना किशोर खरवडे (२७) रा. हिवसे भवन, महाल नागपूर असे गंभीर जखमी झालेल्या मुलीचे नाव आहे. लोहमार्ग पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार दिराच्या मुलीचे लग्न असल्यामुळे लग्नाच्या खरेदीसाठी त्या पांढुर्णाला जाण्यासाठी नागपूर रेल्वेस्थानकावर आल्या. त्यांनी पांढुर्णाला जाण्याचे तिकीट घेतले. यावेळी पांढुर्णाला जाणारी जीटी एक्स्प्रेस आणि बल्लारशाकडे जाणारी जीटी एक्स्प्रेस एकाच वेळी नागपूर रेल्वेस्थानकावर आल्या. दोघीही मायलेकी चुकीने बल्लारशाकडे जाणाऱ्या जीटी एक्स्प्रेसमध्ये चढल्या. परंतु गाडी पुढे निघताच त्यांना आपण चुकीच्या गाडीत बसल्याचे समजले. घाबरलेल्या अवस्थेत अजनी रेल्वेस्थानकावर जीटी एक्स्प्रेसचा वेग थोडा कमी होताच मुलगी रिनाने उडी मारली. मुलीने उडी मारल्यामुळे तिच्या पाठोपाठ कल्पना यांनीही धावत्या गाडीतून उडी घेतली. यात कल्पना या डोक्याच्या भारावर खाली पडल्यामुळे रक्तस्राव होऊन त्यांचा जागीच मृत्यू झाला. तर मुलगी रिनाच्या दोन्ही पायांना गंभीर दुखापत झाली. या घटनेमुळे अजनी रेल्वेस्थानकावर एकच खळबळ उडाली. घटनेची माहिती मिळताच लोहमार्ग पोलीस उपनिरीक्षक रवी वाघ, परमानंद वासनिक घटनास्थळी पोहोचले. त्यांनी मृतदेहाचा पंचनामा करून मृतदेह शवविच्छेदनासाठी मेडिकलमध्ये पाठविला. तर जखमी रिनाला उपचारासाठी मेडिकलमध्ये दाखल केले. सायंकाळी उशिरापर्यंत मुलगी रिना शुद्धीवर न आल्यामुळे तिचे बयान नोंदविता आले नाही.

Web Title: Mother's death, daughter injured after jumping by running train

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.