नागपुरात लॉजवर नेऊन अल्पवयीन मुलीवर अत्याचार

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: March 23, 2018 10:28 AM2018-03-23T10:28:11+5:302018-03-23T10:28:26+5:30

देवदर्शनाच्या बहाण्याने मुलीच्या (वय १६) आईवडिलांना मंदिरात सोडल्यानंतर मुलीला लॉजवर नेऊन तिच्यावर एका आरोपीने बलात्कार केला.

Minor girl tortured on a lodge in Nagpur | नागपुरात लॉजवर नेऊन अल्पवयीन मुलीवर अत्याचार

नागपुरात लॉजवर नेऊन अल्पवयीन मुलीवर अत्याचार

ठळक मुद्देदेवदर्शनाच्या बहाण्याने पालकांना मंदिरात सोडले रामटेक-मनसर दरम्यानची घटना

लोकमत न्यूज नेटवर्क
नागपूर : देवदर्शनाच्या बहाण्याने मुलीच्या (वय १६) आईवडिलांना मंदिरात सोडल्यानंतर मुलीला लॉजवर नेऊन तिच्यावर एका आरोपीने बलात्कार केला. आपल्या पापाची वाच्यता दुसऱ्या कुणाकडे केल्यास जीवे ठार मारेन,अशी धमकीही दिली. विशेष म्हणजे, आरोपी वैदू (जडीबुटी विकणारा) असून, मुलगी त्याला मामा म्हणायची. जरीपटका पोलीस ठाण्याच्या हद्दीत घडलेल्या या संतापजनक प्रकरणात पोलिसांनी बलात्कार तसेच पोक्सो कायद्याच्या कलमानुसार गुन्हा दाखल केला.
अमर मुन्नालाल गौर (वय ३८) असे आरोपीचे नाव आहे. तो जरीपटक्यातील योगी अरविंदनगरात (पांडे मोहल्ला) राहतो. तो जडीबुटी विकतो आणि अनेक रोगावर उपचार करण्याचा दावा करतो. परिसरातील लोक त्याला वैदू म्हणून ओळखात. पीडित मुलीच्या कुटुंबीयांसोबत त्याचे चांगले संबंध होते. पीडित मुलीची आई त्याला भाऊ तर मुलगी मामा म्हणायची. या संबंधातून त्याचे मुलीच्या घरी येणे-जाणेही होते. काही दिवसांपूर्वी मुलीला पोटात दुखणे सुरू झाल्याने पालकांनी तिला डॉक्टरकडे दाखवले. त्यांनी किडनी स्टोनचा संशय व्यक्त केल्यानंतर पालकांनी आरोपी गौरला दाखवले. त्याने हमखास उपचार करतो, अशी बतावणी केली. त्यानंतर २० मार्चला दुपारी ३ वाजता त्याने पीडित मुलीला आणि तिच्या पालकांना रामटेकला दर्शनाला जाऊ असे सांगून आपल्या कारमध्ये बसविले. आईवडिलांना मंदिरात सोडल्यानंतर त्याने पीडित मुलीला किडनी स्टोनच रिपोर्ट घेऊन येऊ असे म्हणत कारमध्ये बसविले. तिला मनसर ते रामटेक मार्गावरील एका लॉजमध्ये नेले. तेथे तिला एका रुममध्ये नेऊन एक उपकरण दाखवले. तुझ्या किडनी स्टोनची तपासणी करायची आहे, असे म्हणत त्याने तिला कपडे काढण्यास भाग पाडले. त्यानंतर तिच्यावर बलात्कार केला. मुलीने विरोध केला असता तिला मारहाण करून कुणाला काही सांगितल्यास गंभीर परिणाम होतील, अशी धमकी दिली. त्याने परत आणून सोडल्यानंतर मुलीने आपल्या पालकांना ही माहिती दिली.

पालकांना धक्का
नातेवाईकासारखा मानपान करणाऱ्या आरोपीने अशाप्रकारे विश्वासघात करून मुलीचे भविष्य धोक्यात आणल्याने पालकांना जबर मानसिक धक्का बसला आहे. त्यांनी मुलीला घेऊन जरीपटका पोलीस ठाणे गाठले. तिने दिलेल्या तक्रारीवरून जरीपटका पोलिसांनी गुन्हा दाखल केला. आरोपीला अटक करण्यात आली आहे.

Web Title: Minor girl tortured on a lodge in Nagpur

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.