विश्वकर्मानगरात मध्यरात्री खळ्ळखट्ट्याक; महागड्या कार्सची तोडफोड

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: June 30, 2023 09:43 PM2023-06-30T21:43:04+5:302023-06-30T21:43:29+5:30

Nagpur News अजनी पोलिस ठाण्यांतर्गत येणाऱ्या विश्वकर्मानगरात गुरुवारी मध्यरात्री समाजकंटकांनी महागड्या कार्सची तोडफोड करत गोंधळ घातला. इतक्यावरच न थांबता तरुणांनी परिसरातील नागरिकांना मारहाणदेखील केली.

Midnight riots in Vishwakarmanagar; Expensive cars vandalized | विश्वकर्मानगरात मध्यरात्री खळ्ळखट्ट्याक; महागड्या कार्सची तोडफोड

विश्वकर्मानगरात मध्यरात्री खळ्ळखट्ट्याक; महागड्या कार्सची तोडफोड

googlenewsNext

नागपूर : अजनी पोलिस ठाण्यांतर्गत येणाऱ्या विश्वकर्मानगरात गुरुवारी मध्यरात्री समाजकंटकांनी महागड्या कार्सची तोडफोड करत गोंधळ घातला. इतक्यावरच न थांबता तरुणांनी परिसरातील नागरिकांना मारहाणदेखील केली. या प्रकारामुळे परिसरात तणाव निर्माण झाला होता.


विश्वकर्मानगरातील गल्ली क्रमांक पाचमध्ये हा प्रकार घडला. निरोत्तम चौहान यांच्याकडे टोयोटा फॉर्च्युनर व मारुती सुझुकी एस क्रॉस या कार आहेत, तर त्यांच्या शेजारी राहणाऱ्या तरुणीकडे फोर्ड फिस्टा गाडी आहे. गुरुवारी मध्यरात्रीनंतर अचानक काचा तोडण्याचा आवाज आला. परिसरातील नागरिक बाहेर आले असता चार तरुण तोडफोड करताना दिसले. चौघांनीही तोंडावर कपडा बांधला होता. तरुणीने त्यांना जाब विचारला असता एका आरोपीने तिला शिवीगाळ करत जिवे मारण्याची धमकी दिली.

आरोपींनी दोन्ही घरांवर दगडफेक सुरू केली, तसेच दुचाकी व तीनचाकी वाहनाचेदेखील नुकसान केले. दगडफेकीदरम्यान चौहान यांच्याकडे आलेले त्यांचे नातेवाईक रजत चतुर्वेदी हे जखमी झाले, तर एका आरोपीने चौहान यांना मारहाण केली. त्यानंतर शस्त्राचा धाक दाखवत आरोपी फरार झाले. मोटारसायकलवरून जात असताना एका आरोपीच्या तोंडावरील कपडा निघाला व तो वस्तीतच राहणारा ललित ठाकरे असल्याचे नागरिकांना दिसले. नागरिकांच्या तक्रारीवरून पोलिसांनी ललित ठाकरे व नीलेश नामक तरुणासह एकूण चार आरोपींविरोधात गुन्हा दाखल केला आहे.

Web Title: Midnight riots in Vishwakarmanagar; Expensive cars vandalized

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.