नागपुरातील अपूर्व विज्ञान मेळावा तयारीचा महापौरांनी घेतला आढावा

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: November 20, 2018 08:30 PM2018-11-20T20:30:14+5:302018-11-20T20:32:39+5:30

नागपूर महापालिका व असोसिएशन फॉर रिसर्च अ‍ॅण्ड ट्रेनिंग इन बेसिक सायन्स एज्युकेशन यांच्या संयुक्त विद्यमाने २८ नोव्हेंबर ते २ डिसेंबरदरम्यान अपूर्व विज्ञान मेळाव्याचे आयोजन करण्यात आले आहे. विज्ञान मेळाव्याचे हे २१ वे वर्ष आहे. विद्यार्थ्यांच्या वैज्ञानिक दृष्टिकोनाला चालना देणाऱ्या या विज्ञान मेळाव्याच्या तयारीचा मंगळवारी महापौर नंदा जिचकार यांनी महापालिका मुख्यालयात आयोजित बैठकीत आढावा घेतला.

Mayor reviewed preparations for the Apoorva science convention in Nagpur | नागपुरातील अपूर्व विज्ञान मेळावा तयारीचा महापौरांनी घेतला आढावा

नागपुरातील अपूर्व विज्ञान मेळावा तयारीचा महापौरांनी घेतला आढावा

Next
ठळक मुद्दे२८ नोव्हेंबर ते २ डिसेंबरदरम्यान आयोजन

लोकमत न्यूज नेटवर्क
नागपूर : नागपूर महापालिका व असोसिएशन फॉर रिसर्च अ‍ॅण्ड ट्रेनिंग इन बेसिक सायन्स एज्युकेशन यांच्या संयुक्त विद्यमाने २८ नोव्हेंबर ते २ डिसेंबरदरम्यान अपूर्व विज्ञान मेळाव्याचे आयोजन करण्यात आले आहे. विज्ञान मेळाव्याचे हे २१ वे वर्ष आहे. विद्यार्थ्यांच्या वैज्ञानिक दृष्टिकोनाला चालना देणाऱ्या या विज्ञान मेळाव्याच्या तयारीचा मंगळवारी महापौर नंदा जिचकार यांनी महापालिका मुख्यालयात आयोजित बैठकीत आढावा घेतला.
शिक्षण समिती सभापती दिलीप दिवे, कर संकलन समितीचे उपसभापती सुनील अग्रवाल, क्रीडा समिती सभापती नागेश सहारे, अपर आयुक्त राम जोशी, शिक्षणाधिकारी संध्या मेडपल्लीवार, परिवहन व्यवस्थापक शिवाजी जगताप, असोसिएशन फॉर रिसर्च अ‍ॅण्ड ट्रेनिंग इन बेसिक सायन्स एज्युकेशनचे सचिव सुरेश अग्रवाल, विज्ञान मेळाव्याचे समन्वयक राजेंद्र पुसेकर, क्रीडा अधिकारी नरेश सवाईतूल, क्रीडा निरीक्षक नरेश चौधरी आदी उपस्थित होते.
उत्तर अंबाझरी मार्गावरील रामदासपेठ येथील राष्ट्रभाषा भवन येथे इयत्ता सहावी ते बारावीपर्यंतच्या विद्यार्थ्यांसाठी पाच दिवसीय अपूर्व विज्ञान मेळाव्याचे आयोजन करण्यात येणार आहे. ‘आओ करे विज्ञान से दोस्ती’ या संकल्पनेवर आधारित या मेळाव्याचा उद्देश विद्यार्थ्यांमध्ये विज्ञानाविषयी रुची निर्माण करणे हा आहे. प्रदर्शनाला भेट देणाऱ्या विद्यार्थ्यांची कोणत्याही प्रकारे गैरसोय होऊ नये, याची दक्षता घेण्याचे तसेच संपूर्ण प्रदर्शन परिसरात स्वच्छता ठेवण्याचे निर्देश यावेळी महापौर नंदा जिचकार यांनी दिले.

विविध विषयांवर १०० प्रयोग
असोसिएशन फॉर रिसर्च अ‍ॅण्ड ट्रेनिंग इन बेसिक सायन्स एज्युकेशन संस्थेतर्फे विद्यार्थ्यांना आनंददायी विज्ञान प्रयोग शिकविण्याच्या उद्देशाने विविध प्रयोग तयार केले जातात. अपूर्व विज्ञान मेळाव्यामध्ये इयत्ता सहावी ते बारावीतील अभ्यासक्रमातील रसायनशास्त्र, जीवशास्त्र, भौतिकशास्त्र, गणित या विषयांतील १०० प्रयोग असतील. महापालिकेच्या शाळांतील २०० विद्यार्थी प्रदर्शनाला भेट देणाºयांना या प्रयोगांबाबत माहिती देतील.

Web Title: Mayor reviewed preparations for the Apoorva science convention in Nagpur

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.