युवा नेक्स्ट सदस्य नोंदणीला प्रचंड प्रतिसाद

By admin | Published: November 24, 2014 01:18 AM2014-11-24T01:18:55+5:302014-11-24T01:18:55+5:30

बहुप्रतिक्षीत ‘मिळवा, बना, घडवा, ते सारं, जे दिल चाहता है...’ या ‘युवा नेक्स्ट’च्या नोंदणीला युवकांच्या भरगच्च गर्दीत प्रारंभ झाला. सदस्य होण्यासाठी आज रविवारी सकाळी ८.३० वाजतापासून

Massive response to young Next member registration | युवा नेक्स्ट सदस्य नोंदणीला प्रचंड प्रतिसाद

युवा नेक्स्ट सदस्य नोंदणीला प्रचंड प्रतिसाद

Next

नागपूर : बहुप्रतिक्षीत ‘मिळवा, बना, घडवा, ते सारं, जे दिल चाहता है...’ या ‘युवा नेक्स्ट’च्या नोंदणीला युवकांच्या भरगच्च गर्दीत प्रारंभ झाला. सदस्य होण्यासाठी आज रविवारी सकाळी ८.३० वाजतापासून लोकमत भवनाच्यासमोर युवकांची रांग लागली होती. हजारो महाविद्यालयीन युवक-युवती ‘युवा नेक्स्ट’चे सदस्य झाले.
‘लोकमत युवा नेक्स्ट-२०१४-१५’च्या सदस्य नोंदणीचा शुभारंभ भारतीय क्रिकेट संघाचे माजी कर्णधार आणि माजी निवड समिती अध्यक्ष दिलीप वेंगसकर यांच्या हस्ते झाला. यावेळी प्रमुख पाहुणे म्हणून लोकमत समूहाचे संचालक (परिचालन) अशोक जैन, गायकवाड पाटील कॉलेजचे संचालक मोहन गायकवाड, जेयल चतुर्वेदी कॉलेजचे प्राचार्य अभय शेंडे, झुलेलाल कॉलेजचे उपप्राचार्य देबाशिश भौमिक, स्नेहा कोचिंग क्लासेसचे श्याम शेंद्रे व रजनीकांत बोंद्रे, नुतन भारत विद्यालयाचे संचालक रमेश बक्षी, सेवादल महिला महाविद्यालयाचे प्राचार्य डॉ. प्रवीण चरडे, मेजर हेमंत जकाते कनिष्ठ महाविद्यालयाचे संचालक मधुसूदन मुडे उपस्थित होते. लोकमत नागपूर युनिटचे महाव्यवस्थापक नीलेश सिंग यांनी उपस्थित मान्यवरांचे पुष्पगुच्छ देऊन स्वागत केले.
यावेळी प्रसिद्ध गायक निरंजन बोबडे व श्रीनिधी घटाटे, आंतरराष्ट्रीय स्तरावर योगामध्ये सुवर्णपदक मिळविणारी धनश्री लेकुरवाळे, आर.जे. राजन, नागपुरातील एकमेव ‘एफ वन कार रेसर’ अंशुल शाहा आदींनी वेंगसकर यांच्याकडून मानाची सदस्यता घेतली.
उपस्थित मान्यवरांनी, युवकांनी या व्यासपीठाचा उपयोग व्यक्तिमत्त्व विकास, सुप्त कलागुणांना वाव मिळण्यासाठी तसेच शैक्षणिक, सांस्कृतिक व सामाजिक उपक्रमात सहभाग होण्यासाठी करून घ्यावा, असे आवाहन करीत युवा नेक्स्टच्या पुढील वाटचालीकरिता शुभेच्छा दिल्या. सायंकाळी ६ वाजेपर्यंत चालेल्या या नोंदणीला युवक-युवतींचा उत्स्फूर्त प्रतिसाद मिळाला. (प्रतिनिधी)

Web Title: Massive response to young Next member registration

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.