नागपूरच्या तरुणीचे 'शादी डॉट कॉम' मुळे जीवन उद्ध्वस्त

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: July 13, 2018 10:22 PM2018-07-13T22:22:42+5:302018-07-13T22:25:34+5:30

दिल्लीतून नागपुरात आलेल्या एका ठगबाजाने प्रतापनगर भागातील एका तरुणीसोबत बुधवारी लग्न केले आणि संधी मिळताच तिचे दागिने आणि रोख रक्कम घेऊन पळून गेला. जुगलकिशोर शर्मा असे या ठगबाजाचे नाव आहे. त्याने आपला पत्ता गुडगाव, दिल्ली असा सांगितला आहे.

'marriage dot com' ruined life of Nagpur girl | नागपूरच्या तरुणीचे 'शादी डॉट कॉम' मुळे जीवन उद्ध्वस्त

नागपूरच्या तरुणीचे 'शादी डॉट कॉम' मुळे जीवन उद्ध्वस्त

Next
ठळक मुद्देलग्न करून काही तासातच ठकबाज नवरदेवाचे पलायनदिल्लीचा ठगबाज : रोख आणि दागिनेही लंपास

लोकमत न्यूज नेटवर्क
नागपूर : दिल्लीतून नागपुरात आलेल्या एका ठगबाजाने प्रतापनगर भागातील एका तरुणीसोबत बुधवारी लग्न केले आणि संधी मिळताच तिचे दागिने आणि रोख रक्कम घेऊन पळून गेला. जुगलकिशोर शर्मा असे या ठगबाजाचे नाव आहे. त्याने आपला पत्ता गुडगाव, दिल्ली असा सांगितला आहे.
पीडित तरुणीने लग्न जुळण्यासाठी शादी डॉट कॉमवर आपली माहिती अपलोड केली होती. काही दिवसांपूर्वी आरोपी शर्मा याने त्यांच्याशी आॅनलाईन संपर्क केला. आपण लग्नास इच्छुक असल्याचे त्याने सांगितले. आपले वडील सनदी अधिकारी (आयएस) असल्याचे सांगितले. घरची आर्थिक स्थिती संपन्न असली तरी आपली स्वत:च्या बळावर काही तरी करून दाखवण्याची इच्छा असल्याचीही थाप मारली. ही तरुणी त्याच्या थापेबाजीला बळी पडली. ती दिल्लीला नोकरीच्या निमित्ताने गेली असता त्यालाही भेटली. त्यावेळी त्याचे वर्तन पाहून तिने लग्नास होकार दिला. त्यानंतर आरोपी शर्मासोबत तिचा वारंवार फोनवरून संपर्क होऊ लागला. दरम्यान, तीन दिवसांपूर्वी शर्मा नागपुरात आला. त्याने या तरुणीला घरगुती पद्धतीने लग्न करू आणि नंतर मुंबईत जंगी पार्टी (रिसेप्शन) देऊ असे म्हटले होते. त्यानुसार तरुणीने संमती दिली. ठरल्याप्रमाणे त्यांचे लग्न झाले. लग्नाच्या काही तासानंतर बुधवारी ११ जुलैला दुपारी २ वाजताच्या सुमारास ही तरुणी आई आणि बहिणीसोबत महत्त्वाच्या कामानिमित्ताने बाहेर गेली. सायंकाळी ५ नंतर परत आली. घरी येताच तिला धक्का बसला. शर्माने घरातील मंगळसूत्र, कानातील दागिने आणि रोख १९ हजार रुपये घेऊन पळ काढला होता. रोख आणि दागिने शोधण्यासाठी आरोपीने घरातील साहित्यही अस्तव्यस्त केले.पीडित तरुणीने त्याच्या मोबाईलवर संपर्क केला. मात्र, त्याने प्रतिसाद दिला नाही. आपली फसवणूक झाल्याचे लक्षात तिने गुरुवारी बजाजनगर ठाण्यात तक्रार नोंदवली. हवालदार रवींद्र सावळे यांनी कलम ४०६, ४२० अन्वये गुन्हा दाखल केला. ठगबाज शर्माचा पोलीस शोध घेत आहेत.

Web Title: 'marriage dot com' ruined life of Nagpur girl

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.