प्रेम केले, शरीरसंबंध झाले, अन् दुसऱ्याच युवतीशी जोडले नाते

By दयानंद पाईकराव | Published: July 31, 2023 03:51 PM2023-07-31T15:51:07+5:302023-07-31T15:59:28+5:30

आरोपीला अटक : प्रेमभंग झाल्यामुळे अल्पवयीन मुलीने दिली तक्रार

Loved, physically involved then had a relationship with another girl | प्रेम केले, शरीरसंबंध झाले, अन् दुसऱ्याच युवतीशी जोडले नाते

प्रेम केले, शरीरसंबंध झाले, अन् दुसऱ्याच युवतीशी जोडले नाते

googlenewsNext

नागपूर : इन्स्टाग्रामवर ओळख झालेल्या एका अल्पवयीन मुलीशी आठ महिने शरीरसंबंध केल्यानंतर दुसऱ्या मुलीच्या मागे लागलेल्या एका युवकाविरुद्ध अल्पवयीन मुलीने तक्रार केली अन् पोलिसांनी त्याला अटक करून गजाआड केले. ही घटना एमआयडीसी पोलिस ठाण्याच्या हद्दीत घडली.

गुलशन उर्फ गोल्डी धनराम हरीनखेडे (वय २०, रा. एमआयडीसी) असे अटक करण्यात आलेल्या आरोपीचे नाव आहे. आरोपी गुलशनची एमआयडीसी पोलिस ठाण्याच्या हद्दीत राहणाऱ्या एका १७ वर्षीय अल्पवयीन मुलीशी इन्स्टाग्रामवर ओळख झाली. आरोपी गुलशन मजुरी करतो. तर अल्पवयीन मुलगी बारावीला शिकत आहे. इन्स्टाग्रामवर ओळख झाल्यानंतर दोघांमध्ये मोबाईलवर बोलणे सुरु झाले. आरोपी गुलशने अल्पवयीन मुलीला आपल्या प्रेमाच्या जाळ्यात ओढले. त्यानंतर त्याने अल्पवयीन मुलीला एमआयडीसी पोलिस ठाण्याच्या हद्दीत एका ठिकाणी बोलावून ती अल्पवयीन असल्याचा फायदा घेऊन तिच्या इच्छेविरुद्ध तिच्याशी शारीरीक संबंध प्रस्थापित केले.

आरोपीने ३० ऑक्टोबर २०२२ ते २६ जुलै २०२३ असे सलग आठ महिने अल्पवयीन मुलीचे शोषण केले. त्यानंतर आरोपी गुलशन मन भरल्यानंतर अल्पवयीन मुलीला टाळू लागला. तो दुसऱ्याच मुलीच्या प्रेमात पडल्याची बाब अल्पवयीन मुलीला समजली. प्रेमभंग झाल्यामुळे अल्पवयीन मुलीने एमआयडीसी पोलिस ठाणे गाठून आरोपी गुलशनविरुद्ध तक्रार दिली. एमआयडीसी ठाण्याचे उपनिरीक्षक अभिषेक बागडे यांनी आरोपी गुलशनविरुद्ध कलम ३७६ (२) (एन), सहकलम ४, ६ पोक्सो कायद्यानुसार गुन्हा दाखल करून त्यास अटक केली आहे. पुढील तपास एमआयडीसी पोलिस करीत आहेत.

Web Title: Loved, physically involved then had a relationship with another girl

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.