लोकमत पां. वा. गाडगीळ आणि बाबा दळवी स्मृती पुरस्कारांचे शनिवारी वितरण

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: December 14, 2018 09:09 PM2018-12-14T21:09:27+5:302018-12-14T21:11:38+5:30

‘लोकमत’तर्फे देण्यात येणारे पत्रपंडित व लोकमतचे प्रथम संपादक पां. वा. गाडगीळ स्मृती आर्थिक-विकासात्मक लेखन आणि पत्रमहर्षी व लोकमतचे ज्येष्ठ संपादक म. य. उपाख्य बाबा दळवी स्मृती शोधपत्रकारिता स्पर्धा २०१६-१७ व १७-१८ चे पुरस्कार नुकतेच घोषित करण्यात आले होते. या दोन्ही वर्षीच्या विजेत्यांना हे पुरस्कार आज, शनिवारी सिव्हिल लाईन्स येथील प्रेस क्लब आॅफ नागपूरच्या सभागृहात सायंकाळी ४.३० वाजता आयोजित कार्यक्रमात प्रदान केले जाणार आहेत.

Lokmat P. V. Gadgil and Baba Dalvi Memorial Awards distribution on Saturday | लोकमत पां. वा. गाडगीळ आणि बाबा दळवी स्मृती पुरस्कारांचे शनिवारी वितरण

लोकमत पां. वा. गाडगीळ आणि बाबा दळवी स्मृती पुरस्कारांचे शनिवारी वितरण

Next
ठळक मुद्देकुमार केतकर, वसंत आबाजी डहाके यांची प्रमुख उपस्थिती

लोकमत न्यूज नेटवर्क
नागपूर : ‘लोकमत’तर्फे देण्यात येणारे पत्रपंडित व लोकमतचे प्रथम संपादक पां. वा. गाडगीळ स्मृती आर्थिक-विकासात्मक लेखन आणि पत्रमहर्षी व लोकमतचे ज्येष्ठ संपादक म. य. उपाख्य बाबा दळवी स्मृती शोधपत्रकारिता स्पर्धा २०१६-१७ व १७-१८ चे पुरस्कार नुकतेच घोषित करण्यात आले होते. या दोन्ही वर्षीच्या विजेत्यांना हे पुरस्कार आज, शनिवारी सिव्हिल लाईन्स येथील प्रेस क्लब आॅफ नागपूरच्या सभागृहात सायंकाळी ४.३० वाजता आयोजित कार्यक्रमात प्रदान केले जाणार आहेत.
या कार्यक्रमाला प्रमुख अतिथी म्हणून ज्येष्ठ संपादक कुमार केतकर व अध्यक्ष म्हणून ज्येष्ठ साहित्यिक वसंत आबाजी डहाके उपस्थित राहतील. या वेळी कुमार केतकर हे ‘भारतासमोरील आव्हाने’, तर वसंत आबाजी डहाके हे ‘आमचे संविधान आणि आम्ही’ या विषयांवर बोलतील. या स्पर्धांचे परीक्षक म्हणून अनुक्रमे ज्येष्ठ संपादक रमेश फडनाईक आणि विनोद देशमुख व ज्येष्ठ संपादक ल. त्र्यं. जोशी आणि ज्येष्ठ साहित्यिक आणि मराठीचे गाढे अभ्यासक प्रमोद मुनघाटे यांनी काम केले होते.

Web Title: Lokmat P. V. Gadgil and Baba Dalvi Memorial Awards distribution on Saturday

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.